कुठल्याही पिकाच्या उत्पादन वाढीसाठी खतांची आवश्यकता असते. शेतकरी जास्त प्रमाणात रासायनिक खतांचा वापर उत्पादन वाढीसाठी करतात. जर आपणही रासायनिक खतांचा विचार केला तर, यामध्ये नत्र, स्फुरद आणि पालाश हे तीनही मुख्य अन्नद्रव्य खूप उपयुक्त आहेत.
परंतु खताचा वापर करताना ते कितपत पिकांना लागू होतात हे देखील पाहणे गरजेचे असते. खतांचा कार्यक्षम वापर व्हावा यासाठी सगळ्यात अगोदर माती परीक्षण करणे खूप गरजेचे असते.
माती परीक्षण अहवालानुसार नत्र,स्फूरद व पालाशची मात्रा देणे गरजेचे असते. तसेच पिकांना खते देण्याची देखील योग्य वेळ असावी व एकूण मात्राची विभागणी करणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे.
या लेखामध्ये आपण पिकांना आवश्यक मुख्य अन्नद्रव्य पैकी नत्राची कार्यक्षमता वाढवण्यासाठी कुठल्या उपाययोजना कराव्यात, याबद्दल माहिती घेऊ.
या उपाययोजनांनी वाढेल नत्रयुक्त खतांची कार्यक्षमता
1- नत्र हे पिकांना उपयुक्त असे अन्नद्रव्य असून सर्व प्रकारच्या जमिनीमध्ये कमी-अधिक प्रमाणात का होईना नत्राची कमतरता ही दिसून येते. परंतु त्या दृष्टिकोनातून पिकांना लागणारी मात्रा देखील जास्त असते.
नक्की वाचा:ऑरगॅनिक कार्बन+वापरा13 नुट्रीयंट आणि 7 लाख कोटी बॅक्टेरिया प्रति मिली, मिळेल भयानक रिझल्ट
आपण जे काही नत्रयुक्त खतांचा पुरवठा करतो, ते नत्र वेगवेगळ्या मार्गांनी वाया जाते. जर आपण पिकांना देण्यात येणाऱ्या एकूण नत्राचा विचार केला तर त्यापैकी 35 ते 55 टक्के ते पिकांना लागू होते.
यासाठी पाण्यात विरघळणारा आणि वायू रुपात जाणारा अमोनियम कमी करून नत्रयुक्त खतांची कार्यक्षमता वाढवता येते.
2- जर तुम्ही जिरायती शेतीमध्ये नत्रयुक्त खतांचा वापर करत असाल तर ती पिकांना देताना पेरून देणे फायद्याचे ठरते.
3- या भागामध्ये जास्तीचा पाऊस होतो अशा भागात जास्त कालावधी असणारे पिकांसाठी नत्राची मात्रा ही दोन ते तीन टप्प्यात विभागून देणे फायद्याचे ठरते.
नक्की वाचा:सोयाबीन वरील खोडमाशीच्या प्रतिबंधात्मक म्हणून ही गोष्ट करूनच पेरणी करा
4- धान पिकामध्ये युरियाचा वापर करत असाल तर तो सुपर ग्रेनुल्सचा करावा.
5- नायट्रेट युक्त खते दिली असतील तर ते वाहून जाऊ नयेत यासाठी नियंत्रित आणि हलकी पाण्याची पाळी द्यावी.
6- नत्राचा पुरवठा करण्यासाठी शेतकरी युरियाचा वापर मोठ्या प्रमाणात करतात. या युरिया मधील नत्राचा हळुवार पिकांना उपलब्धता होण्यासाठी युरियाच्या सोबत 20 टक्के निंबोळी पेंडीचा वापर करणे खूप फायद्याचे ठरते.
7- नत्रयुक्त खत देताना माती परीक्षण अहवालानुसार ज्या अन्नद्रव्यांची कमतरता आहे त्यांची मात्रा संयुक्त खतांद्वारे द्यावी.
Published on: 27 June 2022, 08:51 IST