सध्या जर आपण शेवगा पिकाचा विचार केला तर गेल्या काही वर्षापासून व्यापारी तत्त्वावर शेवग्याची लागवड मोठ्या प्रमाणावर शेतकरी करत आहेत. जरा पण एकंदरीत महाराष्ट्राचा विचार केला तर सर्व ठिकाणी शेवग्याची लागवड उत्तम प्रकारे करता येते. शेवगा पिकाचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे मार्च ते मे या तीन महिन्यांमध्ये शेवगा पिकाला अजिबात पाणी पुरवठा केला नाही तरी झाडाच काही होत नाही.
जर तुमच्याकडे पाण्याची सोय असेल तर शेवगा लागवडीच्या माध्यमातून एक चांगला उत्पन्नाचा स्त्रोत तुमच्यासाठी निर्माण होऊ शकतो. साधारणतः वर्षभर पाणी असेल अशा ठिकाणी नोव्हेंबर ते जून असे सात ते आठ महिने शेवगा शेंगांचे उत्पादन शेतकऱ्यांना मिळते. शेवग्याची लागवड करण्यासाठी महत्वाच्या अशा दोन जातींची या लेखात आपण माहिती घेणार आहोत.
शेवग्याच्या चांगले उत्पादन देणाऱ्या महत्त्वाच्या दोन जाती
1- जाफना- या शेवग्याचा वाण देशी शेवगा म्हणून देखील ओळखला जातो. या जातीच्या शेंगा खायला खुप चविष्ट लागतात. एका देठावर एकच शेंग येते तसेच ती 20 ते 30 सेंटिमीटर लांब असते. आपण शेवग्याच्या या वानाचा विचार केला तर वर्षातून फक्त फेब्रुवारीत फुले लागतात
व मार्च ते एप्रिल या कालावधीत शेंगांचे उत्पादन मिळते. या जातीच्या शेंगांचे एका किलोमध्ये 20 ते 22 शेंगा बसतात. जर आपण एका झाडाचा प्रति हंगामाचा विचार केला तर एका झाडापासून 150 ते 200 शेंगांचे उत्पादन मिळते.
2- रोहित 1- या जातीचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या जातीची लागवड केल्यापासून अवघ्या सहा महिन्यात उत्पन्न सुरू होते. या जातीच्या शेंगांची लांबी मध्यम प्रतीची म्हणजे 45 ते 55 सेंटिमीटर असते व शेंगा सरळ व गोलाकार असतात. त्यांचा रंग गर्द हिरवा व चवीला अतिशय स्वादिष्ट असते. या जातीचे दुसरे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे इतर जातींपेक्षा 30 टक्के अधिक उत्पन्न मिळते.
एकंदरीत उत्पन्न देण्याचा कालावधी सात ते आठ वर्षाचा असून एका झाडापासून एका वर्षात सरासरी 15 ते 20 किलो शेंगा मिळतात व एक महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या जातीपासून 80% शेंगा या एक्सपोर्ट क्वालिटीच्या मिळतात.
Published on: 15 October 2022, 04:56 IST