तुर पीक हे महत्वपूर्ण पीक असून संपूर्ण भारतात आणि महाराष्ट्रातील सर्व ठिकाणी तुरीची लागवड जवळजवळ सर्व हंगामांमध्ये केली जाते. परंतु जास्त करून खरीप हंगामामध्ये तुरीची लागवड खूप मोठ्या प्रमाणावर होते. तूर हे पीक हवामानाला जास्त संवेदनशील असून त्याप्रमाणे याचे व्यवस्थापन करणे गरजेचे असते.
प्रत्येक शेतकरी बंधू खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन याकडे बारकाईने लक्ष देतात. परंतु काही छोट्या छोट्या बाबी असतात त्या दुर्लक्षिल्या जातात व त्यामुळे देखील उत्पादनाला फटका बसण्याची शक्यता असते. या लेखामध्ये आपण अशाच काही छोट्या परंतु महत्त्वाच्या व्यवस्थापनातील बाबी समजून घेऊ.
तूर पिकाच्या व्यवस्थापनातील महत्त्वाच्या बाबी
1- सगळ्यात अगोदर तूरीचे तण व्यवस्थापन आहे महत्त्वाचे- बऱ्याचदा आपण पाहतो की तूर पिकाच्या लागवडी नंतर साधारणतः वीस ते पंचवीस दिवसांनी तुरीमध्ये तण देखील वाढायला लागते.
यामुळे तुर पिकाला आवश्यक असणारे जे काही पोषक घटक असतात ते तणाच्या माध्यमातून शोषले जातात. त्यामुळे तुरीची झाडे कमकुवत होतात. त्यामुळे सगळ्यात आगोदर पेरणीनंतर शेतात हेक्टरी एक ते दीड किलो पेंडामिथिलीनची फवारणी करणे गरजेचे आहे.
तसेच वेळोवेळी पिकातील निंदणी करून तण काढत राहणे गरजेचे आहे. त्यामुळे पिकांच्या मुळांमध्ये ऑक्सिजनचा संचार वाढतो आणि तणांचा नाश देखील होतो.
तसेच तूर पिकाच्या संरक्षणासाठी व निकोप वाढीसाठी जीवामृत फवारावे. तसेच काही शेतकरी शेत तयार करताना युरियाचा वापर करतात अशा शेतकऱ्यांनी युरीयाचा दुसरा डोस 31 ते 35 दिवसांचे झाल्यावर द्यावा.
नक्की वाचा:Crop Tips: टोमॅटोपासून हवे भरपूर उत्पादन तर वापरा 'या' टिप्स, मिळेल भरपूर उत्पादन आणि नफा
2- शेतातील पाण्याचा निचराची सोय- जर आपण या पिकाचा विचार केला तर यांच्या काही जाती जास्त पाणी सहन करणारे असतात परंतु पाणी साचेल इतके देखील पाणी हे पीक सहन करू शकत नाही.
बरेचदा पावसाळ्यामध्ये शेतामध्ये पावसाचे पाणी तुंबून राहते व पिकाला याचा फटका बसतो. त्यामुळे पावसाळ्यात पाण्याचा योग्य निचरा व्हावा यासाठी 15 ते 20 मीटर अंतरावर चर तयार करावेत म्हणजे छोटी नाली तयार करावी व पाणी थेट शेताच्या बाहेर काढावे.
3- तूर पिकावरील रोग आणि कीटकांचे नियंत्रण- जेव्हा हे पीक लहान आणि नाजूक अवस्थेत असते अशा स्थितीत पिकावर खूप काळजीपूर्वक लक्ष ठेवणे गरजेचे असते. जर पिकामध्ये कोणत्याही प्रकारची कीड व रोगाचे लक्षणे दिसत असतील तर लवकरात लवकर कीड व्यवस्थापनाचे नियंत्रण करणे गरजेचे असते.
कारण बऱ्याचदा किडींचा प्रादुर्भाव बऱ्यापैकी वाढतो नंतर नियंत्रणाचे प्रयत्न केले जातात. परंतु असे न करता अगदी सुरुवात जरी दिसली तरी सुद्धा उपाय करणे गरजेचे आहे.
तूर पिकावर कडुलिंबाचे तेल किंवा कडुलिंबाचे कीटकनाशक पाण्यात मिसळून फवारले तर चांगला फायदा होतो. यामुळे जास्त पावसात जे काही पिकावर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होतो ते बुरशीजन्य रोग नष्ट होतात.
नक्की वाचा:News: हळद पिकाला बसत आहे कंदमाशीचा मोठा फटका, अशा पद्धतीने करा व्यवस्थापन तरच होईल फायदा
Published on: 08 October 2022, 05:30 IST