Agripedia

बरेच शेतकरी आपल्याकडे भाजीपाला पिकांची लागवड करून नगदी पैसा कमवतात. भाजीपाला वर्गीय पिकांमध्ये शेतकरी खूप वेगवेगळ्या प्रकारचे भाजीपाल्याची लागवड करतात. यामध्ये बरेच शेतकरी वांग्याचे लागवड मोठ्या प्रमाणात करतात.

Updated on 13 July, 2022 7:09 PM IST

बरेच शेतकरी आपल्याकडे भाजीपाला पिकांची लागवड करून नगदी पैसा कमवतात. भाजीपाला वर्गीय पिकांमध्ये शेतकरी खूप वेगवेगळ्या प्रकारचे भाजीपाल्याची लागवड करतात. यामध्ये बरेच शेतकरी वांग्याचे लागवड मोठ्या प्रमाणात करतात.

परंतु प्रत्येक पिकाप्रमाणे वान चांगले तर मिळणारे उत्पन्न देखील खूप चांगले असते. हेच तत्व वांग्याच्या बाबतीत देखील लागू होते. या लेखामध्ये आपण वांग्याच्या काही चांगल्या प्रतीचे आणि दर्जेदार जातींची माहिती घेणार आहोत.

 वांग्याच्या चांगल्या उत्पन्न देणाऱ्या जाती(Veriety Of Brinjaal)

1- मांजरी गोटा- या जातीचे झाड बुटके आणि पसरट असून पाने लहान ते मध्यम आकाराचे असतात. या जातीच्या झाडाचे खोड, पाने आणि फळांच्या देठावर मोठ्या प्रमाणात काटे असतात.

या जातीची फळे जांभळट गुलाबी रंगाचे असून फळांवर पांढरे पट्टे असतात. तसेच आकार हा मध्यम ते गोल असतो. या जातीचे वांगे खायला रुचकर असतात तसेच काढणीनंतर चार ते पाच दिवस आरामात टिकतात. हेक्‍टरी सरासरी उत्पादन 300 ते 400 क्विंटल येते.

नक्की वाचा:सल्ला तज्ञांचा! पेरणी करण्याअगोदर वाचा 'हा' तज्ञांचा सल्ला,वाचेल दुबार पेरणीचे संकट

2- वैशाली- या जातीचे झाड बुटके आणि पसरट असते. त्यासोबतच पाने, खोड आणि पानांच्या देठावर काटेरी असून फळे आणि फुले झुबक्यांनी येतात.

फळांचा रंग आकर्षक जांभळा असून त्यावर पांढरे सरमिसळ पट्टे असतात. या झाडाची फळे मध्यम आकाराची असून अंडाकृती असतात. सरासरी हेक्‍टरी उत्पादन 300 क्विंटल पर्यंत येते.

3- प्रगती- या जातीचे वांग्याचे झाडे उंच आणि काटक असून पाने गडद हिरव्या रंगाचे असतात. पाने, फळे आणि फांद्यांवर गाठी असतात.

या जातीच्या वांग्याची फुले आणि फळे झुबक्यांनी येतात. फळेही अंडाकृती आकाराचे असून फळांचा रंग आकर्षक जांभळा व पांढरा रंगाचे पट्टे वांग्यावर असतात. या जातीच्या वांग्याची काढणीचा कालावधी 175 दिवस असून 12 ते 15 तोडे आरामात मिळतात. हेक्‍टरी उत्‍पादन 250 ते 300 क्विंटल मिळते.

नक्की वाचा:आहे कडवट परंतु आयुष्यात गोडवा आणण्याची आहे ताकत! करा या पिकाचे लागवड, मिळेल बक्कळ नफा

4- अरुणा- या जातीच्या वांग्याची झाडे मध्यम उंचीची असतात तसेच फळे भरपूर आणि झुबक्यांनी लागतात. फळे मध्यम आकाराची आणि अंडाकृती असून त्यांचा रंग चमकदार जांभळा असतो.

या जातीच्या वांग्याचे हेक्‍टरी सरासरी उत्पादन तीनशे ते साडेतीनशे क्विंटलपर्यंत येते. या जातीच्या वांग्यांचे रोपांची पुनर्लागवड केल्यानंतर दहा ते बारा आठवड्यांनी  फळे तयार होतात. फळे पूर्ण वाढून टवटवीत आणि चकचकीत असताना काढणी करावी.

कोवळी फळे काढल्यास उत्पादनात घट येते तसेच जुने फळ ग्राहकांच्या पसंतीस उतरत नाही. चार ते पाच दिवसांच्या अंतराने दहा ते बारा वेळा वांग्याची तोडणी करता येते. वांग्याचे उत्पादन सुरू झाल्यानंतर तीन ते साडेतीन महिने चालू राहते. काय काही शेतकरी व्यवस्थित व्यवस्थापन करून बाराही महिने उत्पादन घेतात.

नक्की वाचा:इको-पेस्ट ट्रॅप लावा आणि करा पिकांचे कीटकांपासून रक्षण,फवारणीची नाही गरज

English Summary: this is the brinjaal crop veriety give more production and profit
Published on: 13 July 2022, 07:09 IST