विविध भाजीपाला पिकांमध्ये वांगी लागवड शेतकऱ्यांसाठी खूप फायद्याचे भाजीपाला पीक आहे. जर आपण वांग्याच्या एकंदरीत बाजारपेठेचा विचार केला तर वर्षभर मागणी असणारे भाजीपाला पीक असून शेतकरी वर्गाला वांगी लागवडीतून चांगला आर्थिक नफा मिळवू शकतात. आपल्याला माहित आहे कि प्रत्येक पिकापासून जास्त उत्पादन मिळविण्यासाठी व्यवस्थापन खूप गरजेचे असते.
हे शेतकरी बंधूंना वेगळे सांगायची गरज नाही. परंतु काही छोट्या गोष्टी परंतु महत्त्वाच्या जर वेळेत केल्या तर नक्कीच उत्पादन वाढ होते. या लेखात आपण वांगी उत्पादनवाढीसाठी करावयाच्या काही बाबी समजून घेऊ.
नक्की वाचा:कांद्याच्या दरात घसरण, तरीही राज्यात मोठ्या प्रमाणावर लागवड
वांगी उत्पादन वाढीतील महत्त्वाच्या गोष्टी
1- जातींची निवड महत्त्वाची- तुम्हाला वांग्याची लागवड करायची असेल तर सगळ्यात अगोदर तुम्ही ज्या भागात राहतात त्या ठिकाणी ग्राहकांची वांग्याला असलेली मागणी आणि बाजारपेठेमध्ये कुठल्या वांग्याच्या वाणाला जास्त मागणी असते
अशा वाणांची निवड करणे खूप गरजेचे आहे. त्यासोबत रोगांना व किडींना कमी प्रमाणात बळी पडणारे व आपल्या परिसरातील हवामानाशी टिकाव धरू शकणारे वाण खूप महत्त्वाचे असतात.
2- काही महत्त्वाच्या जाती- वांगा लागवडीसाठी मांजरी गोटा, कृष्णा, फुले हरीत फुले अर्जुन इत्यादी जाती खूप महत्त्वाचे आहेत.
3- लागवडीचा हंगाम- कुठल्याही पिकाच्या उत्पादनासाठी लागवडीचा अचूक कालखंड किंवा हंगाम खूप महत्त्वाचा असतो. जर तुम्हाला वांगी लागवड करायची असेल व खरीप हंगामात करायचे असेल तर रोपवाटिका जूनच्या दुसऱ्या आठवड्यात व रोपांची पुनर्लागवड जुलै-ऑगस्टमध्ये करावी.
रब्बी किंवा हिवाळी हंगामात करायचे असेल तर रोपवाटिका सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत तयार करावी आणि तक रोपांची पुनर्लागवड ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्ये करावी. उन्हाळी वांगी लागवड करायची असेल तर रोपवाटिका निर्मिती जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात व रोपांची पुनर्लागवड फेब्रुवारीत केली जाते.
Bussiness Idea: 'आईस फॅक्टरी' उभारा आणि मिळवा उत्कृष्ट नफा, वाचा सविस्तर माहिती
4-बियाण्याचे प्रमाण देखील असते महत्त्वाचे- वांगा लागवडीमध्ये बियाण्याचे प्रमाण देखील खूप महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडते.
वांग्याच्या काही जाती खूप कमी वाढतात अशा जातीसाठी प्रति हेक्टरी 400 ते 500 ग्रॅम बियाणे पुरेसे होते व जास्त वाढणार्या किंवा संकरित जातींसाठी हेक्टरी 120 ते दीडशे ग्रॅम बियाणे पुरेसे ठरते.
5- खतांचे व्यवस्थापन- लागवड केल्यानंतर खत व्यवस्थापन खूप महत्त्वाचे असते.तूमच्या जमिनीचा प्रकार म्हणजे मगदूर कसा आहे त्याप्रमाणे खतांचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. समजा तुमची जमीन मध्यम काळी असेल तर हेक्टरी 150 किलो नत्र, 50 किलो स्फुरद व 50 किलो पालाश द्यावे.
उरलेले अर्धे नत्र लागवडीनंतर तीन समान भागात विभागून द्यावे. पहिला हप्ता लागवड केल्यानंतर एक महिना, दुसरा हप्ता पहिल्या हपत्यानंतर एक महिन्यांनी आणि तिसरा आणि शेवटचा हप्ता लागवडीनंतर तीन ते साडेतीन महिन्यांनी द्यावा. खतांची मात्रा दिल्यानंतर लगेच पाणी द्यावे.
आंतरमशागतमध्ये पिक तणमुक्त ठेवणे खूप गरजेचे असून लागवडीनंतर 30 ते 40 दिवसांनी रोपांना मातीची भर द्यावी व वेळोवेळी खुरपणी करणे गरजेचे आहे.
6- सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे संजीवकांचा वापर- वांग्यामध्ये संजीवकांचा वापर करून फळधारणा वाढवण्यासाठी 2,4- डी आणि एनएए ( नेपथ्यलिक ऍसिटिक ऍसिड) हे दोन संजीवके उपयुक्त आहेत. वांग्याचे बियाणे 2,4 डीच्या पाच पीपीएम द्रावणात 24 तास भिजवून मगच बी पेरावे.
किंवा हे द्रावण पिकाला फुलधारणा सुरू झाल्यानंतर 60 ते 70 दिवसांत पर्यंत एक आठवड्याच्या अंतराने संपूर्ण झाडावर फवारावे.
7- काही महत्त्वाच्या गोष्टी- रोपवाटिकेत रोपांची व्यवस्थित काळजी घेतली तर रोगाचा प्रसार होत नाही. तुडतुड्यांचा नियंत्रणासाठी रोपवाटिकेत कार्बारिल ( 50% ) 30 ग्रॅम आणि दहा ग्रॅम कार्बेन्डाझिम प्रति दहा लिटर पाण्यातून फवारणी करावी. रोगग्रस्त झाडे दिसतात ती उपटून समूळ नष्ट करावे.
सूत्रकृमीच्या नियंत्रणासाठी झेंडू, कांदा अशा प्रतिकारक पिकांची फेरपालट करावी. उन्हाळ्यामध्ये दोन ते तीन वेळा जमिनीची चांगली नांगरट करून जमीन तापू द्यावी. मर रोग हा बुरशीपासून होत असल्यामुळे पीक फेरपालट करणे, निरोगी झाडांचे बी वापरणे तसेच कॉपर ऑक्सिक्लोराईड सारख्या बुरशीनाशकाचे ड्रेंचिंग करून घेणे खूप महत्त्वाचे आहे.
Published on: 16 September 2022, 11:58 IST