Agripedia

तूर हे महत्त्वाचे डाळवर्गीय पीक असून खूप मोठ्या प्रमाणावर शेतकरी तूर पिकाचे लागवड करतात. महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये तुरीचे लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. आपल्याला माहित आहे की, तुर लागवडीमध्ये ज्या काही पिकाच्या वेगवेगळ्या अवस्था आहेत त्यामध्ये फुलधारणा ही अवस्था खूप महत्त्वाची असून यावरच तुरीचे पुढील उत्पादन अवलंबून असते. जर तुरीला फुलधारणा व्यवस्थित झाली नाही तर शेंगा देखील कमी प्रमाणात लागतात व उत्पादनात घट संभवते.

Updated on 04 October, 2022 9:36 AM IST

नक्की वाचा:Crop Management: मिरची पासून हवे भरघोस उत्पादन तर 'अशा'पद्धतीने करा खत व्यवस्थापन,मिळेल चांगले उत्पादन

 त्यामुळे शेतकऱ्यांनी तूर पिकाची फुलधारणा वाढवण्यासाठी उपाय योजना करणे गरजेचे असून जेणेकरून हातात येणारे उत्पादन हे चांगले येईल. त्यामुळे आपण या लेखात तूर पिकाची फळधारणा चांगली यावी यासाठी उपयुक्त उपाययोजना कोणत्या याची माहिती घेऊ.

 तूर पिकाची फुलधारणा वाढवण्यासाठीचे उपाययोजना

 जर आपण यावर्षी एकंदरीत पावसाचा विचार केला तर तो वेळेवर पडला व चांगल्या प्रमाणात पडला आहे. परंतु तरी देखील बऱ्याच ठिकाणी  तुर पिकाला फुल धारणा झालेली नाही.

त्यामुळे शेतकरी चिंतेत असून यावर जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार जर विचार केला तर ज्या ठिकाणी तूर पिकावर फुलधारणा झाली नाही अशा शेतकरी बांधवांनी दोन टक्के डीएपीची फवारणी करणे गरजेचे आहे. दुसरी महत्त्वाची एक समस्या आहे ज्या ठिकाणी फुलधारणा झालेली आहे.

नक्की वाचा:Crop Tips: शेतकरी बंधूंनो! ज्वारीचे 'हे'वाण देईल पशुसाठी पौष्टिक हिरवा आणि वाळलेला चारा, वाचा डिटेल्स

परंतु फुलगळ होत असल्यामुळे शेतकरी त्रस्त आहेत. फुलगळ होण्यामागील प्रमुख कारण म्हणजे जमिनीमध्ये पुरेशा ओलाव्याचा अभाव  हे होय. दुसरे म्हणजे पाऊस कमी झाला असेल व जमिनी उथळ असतील तर अशा ठिकाणी तूर पिकाची फुलगळीची समस्या अधिक असण्याची शक्‍यता जाणकारांनी सांगितले आहे.

समजा जमिनीमध्ये ओलावा कमी झाला व फुले लागल्यानंतर पाणी उशिरा दिले गेले तर फुलगळ होते. त्यामुळे शेतकरी बांधवांनी तुर पिकाला संरक्षित पाण्याच्या पाळ्या देणे गरजेचे असून जमिनीत ओलावा फार कमी होण्यापूर्वीच आणि फुले येण्याच्या सुरवातीलाच तुर पिकाला पाण्याची व्यवस्थापन करण्याचा देखील सल्ला दिला जातो.

नक्की वाचा:हरभरा पिकापासून जास्तीत जास्त उत्पादन घ्यावयाचे असेल तर वाचा या टीप्स

English Summary: this is so important management tips for growth flowring in pigeon pea crop
Published on: 04 October 2022, 09:36 IST