Agripedia

बियाणे निरोगी असणे खूप गरजेचे असून शेतकरी बंधूंच्या हंगाम बियाण्यांच्या शुद्धतेवर आणि दर्जावर अवलंबून असतो. आपण बऱ्याचदा पाहतो की, पेरणी किंवा लागवड केली जाते. परंतु लागवड केलेले बियाणे पुरेशा प्रमाणात उगवत नाही किंवा त्याची उगवण फार कमी प्रमाणात होते. त्यामुळे शेतक-यांना खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसतो.

Updated on 13 September, 2022 2:11 PM IST

बियाणे निरोगी असणे खूप गरजेचे असून शेतकरी बंधूंच्या हंगाम बियाण्यांच्या शुद्धतेवर आणि दर्जावर अवलंबून असतो. आपण बऱ्याचदा पाहतो की, पेरणी किंवा लागवड केली जाते. परंतु लागवड केलेले बियाणे पुरेशा प्रमाणात उगवत नाही किंवा त्याची उगवण फार कमी प्रमाणात होते. त्यामुळे शेतक-यांना खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसतो.

एवढेच नाही तर परत दुबार पेरणीचे संकट येते. वरून कष्ट आणि वेळ वाया जातो ते वेगळेच. यासाठी बियाण्याची खासकरून सोयाबीन बियाण्याची पेरणीपूर्वीच उगवणशक्ती तपासून मग पेरणी करणे फायद्याचे ठरते. या लेखात आपण या संबंधी महत्त्वाची माहिती घेऊ.

नक्की वाचा:मक्याचे 4 नवीन संकरीत वाण लॉन्च; शेतकऱ्यांसाठी ठरणार फायदेशीर

सोयाबीन बियाण्याची उगवणशक्ती तपासण्यासाठीची गोणपाट पद्धत

 बियाण्याची उगवणशक्ती तपासण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती आहेत. परंतु गोणपाट पद्धत ही सगळ्यात साधी व सोपी पद्धत असून सहज करता येण्यासारखे आहे. 

यासाठी शेतकरी बंधुंनी एक मोठे पोते घ्यावे व एक पाण्याने भरलेली बादली घ्यावी.  घेतलेल्या पोत्याला कात्रीच्या साह्याने व्यवस्थित कापून घ्यावे व या कापलेल्या पोत्याला पाण्यात भिजवून नंतर व्यवस्थित पिळून घ्यावे.

त्यानंतर सोयाबीन बियाणेच्या पिशवीत मध्यभागी हात घालून एक मूठभर सोयाबीन बियाणे घ्यावे व त्यातील शंभर दाणे तपासणीसाठी घ्यावेत.

नक्की वाचा:Soil Management: शेतात गाळ टाकतांना कोणती काळजी घ्यावी? कोणता गाळ टाकू नये? फायदे, वाचा सविस्तर

 हे शंभर दाणे त्या पोत्यावर व्यवस्थित  ओळीत घेऊन ठेवायचे आहेत. नंतर त्या पोत्याची व्यवस्थित गुंडाळी करून घ्यायचे आहे व एखाद्या दोरीने बांधून घ्यायचे आहे. हि पोत्याची केलेली गुंडाळी माठाजवळ थंड ठिकाणी ठेवायचे आहे व त्यावर दररोज दोन वेळेला पाणी शिंपडायचे आहे.

आठ दिवस झाल्यानंतर हे गुंडाळी उघडायची असून आठव्या दिवशी बियाण्याची उगवण झालेली असते. उगवण झालेले बियाणे एकदम सरळ उगवल असेल तर समजायचं ते बियाणे दर्जेदार असून लागवडीस व्यवस्थित आहे.

नक्की वाचा:Soyabean Rate: सोयाबीनच्या वायदेबंदीमुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना बसू शकतो का फटका? वाचा सविस्तर

English Summary: this is method is so important to check germination to seed
Published on: 13 September 2022, 02:11 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)