हरभरा हे रब्बी हंगामातील प्रमुख पीक असून महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये हरभऱ्याचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते.
इतर पिकांप्रमाणेच चांगले उत्पादन यावे यासाठी संबंधित पिकाच्या चांगल्या जातीची लागवड आवश्यक ठरते. 'शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी' या उक्तीप्रमाणे जर तुमची बियाणे किंवा जाती या उत्तम व दर्जेदार असतील तर येणारे उत्पादन हे भरघोस व दर्जेदार येते. हीच बाब हरभरा पिकाला देखील लागू होते. हरभरा लागवड करायची असेल तर हरभऱ्याच्या काही निवडक जातीच्या खूप उत्पादन देणारे आहेत. या लेखामध्ये आपण अशाच शेतकऱ्यांना उपयुक्त हरभरा जात यांची माहिती करून घेणार आहोत.
1) सुधारित वाण :(Veriety Of Gram Crop)
1) देशी हरभरा :- हा हरभरा मुख्यत्वे डाळी करिता आणि बेसनाकरिता वापरतात. या प्रकारामध्ये साधारणात: दाण्यांचा रंग फिकट काथ्या ते पिवळसर असतो. दाण्याचा आकार मध्यम असतो.
2) भारती ( आय. सी. सी. व्ही.10 ):- हा वाण जिरायती, तसेच बागायती परिस्थितीत चांगला येतो. हा वाण मर रोग प्रतिबंधक असून, 110 ते 115 दिवसांत कापणीस तयार होतो. जिरायती हेक्टरी 14 ते 15 क्विंटल तर ओलीता मध्ये 30 ते 32 क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन मिळते.
3) विजय( फुले जी 81-1-1):- जिरायती ओलिताखाली तसेच उशिरा पेरणी करता प्रसारित केला आहे. मर रोगास प्रतिकारक्षम असून,पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता. जिरायतीत हेक्टरी 15 ते 20 क्विंटल व ओलिताखाली 35 ते 40 क्विंटल उशिरा पेरणी केल्यास 16 ते 18 क्विंटल प्रति हेक्टर अशी उत्पादन क्षमता आहे.
4) जाकी 9218:- हा देशी हरभऱ्याचा अति टपोर दाण्याचा वाण आहे. हा वाण लवकर परिपक्व होणारा ( 105 ते 110 दिवस ) आणि मर रोग प्रतिबंधक आहे. सरासरी उत्पादन 18 ते 20 क्विंटल प्रति हेक्टर एवढे आहे. हा वाण शून्य मशागतीवर पेरणीसाठी उपयुक्त आहे. हा वाण विदर्भामध्ये लागवडीसाठी प्रसारित करण्यात आला.
2) काबुली हरभरा:
1) हारभरा छोले भटोरे बनविण्यासाठी वापरतात. या हरभऱ्याच्या प्रकारामध्ये दाण्याचा रंग पांढरा असतो.
2) श्वेता ( आय. सी. सी.व्ही.-2):- मर रोगास प्रतिकारक्षम आहे. दाणे टपोरे असून, जिरायतीमध्ये 85 ते 90 दिवसात तर ओलिताखाली 100 ते 105 दिवसात परिपक्व होते. जिरायतीमध्ये 8 ते 10 तर ओलिताखाली 20 ते 22 क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन मिळते.
3) पीकेव्ही काबुली -2 :- मर रोग प्रतिकारक्षम पेरणीस उशीर व पाण्याचा ताण पडल्यास टपोरे पणा वर परिणाम होतो म्हणून या वाणाची लागवड योग्य वेळी ओलिताखाली करावी. ओलिताखाली उत्पादन 12 ते 15 क्विंटल प्रति हेक्टर मिळते.
4) विराट:- हा काबुली वाण टपोऱ्या दाण्यांचा आहे. हा वाण रोग प्रतिकारक्षम असून, ओलिताखाली 30 ते 32 क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन मिळते
5) पीकेव्ही काबुली - 4 :- या वाणाच्या दाण्याचा आकार अति टपोर आहे. मर रोगास साधारण प्रतिकारक्षम. या बाळाचे सरासरी उत्पादन 15 क्विंटल एवढे मिळते.
3) गुलाबी हरभरा गुलक :- टपोऱ्या दाण्याचा वाण मूळकुजव्या व मर रोगास प्रतिकारक्षम असून, दाणे चांगले टपोरे गोल व गुळगुळीत असतात.
फुटाणे तसेच डाळ तयार केल्यास त्यांचे प्रमाण डी - 8 पेक्षा जास्त आहे.
महत्वाच्या बातम्या
नक्की वाचा:ही माहिती असणे गरजेचे! तलाठीला कोणते अधिकार असतात? कोणते नसतात? वाचा सविस्तर
नक्की वाचा:शेतात गाळ टाका! परंतु घ्या ही काळजी अन नका वापरु 'ही' गाळमाती
Published on: 18 May 2022, 03:34 IST