पाण्याची सोय असली की वर्षभर तुम्ही अळू चे उत्पादन घेऊ शकता. आपल्याला अळूची लागवड करायची असेल तर त्यासाठी बगल कंद किंवा मातृकंद लागते. जर अळू च्या लागवडीसाठी तुम्ही बगल कंद चा वापर केला तर त्यापासून जास्तीत जास्त उत्पादन निघते मात्र लागवडीसाठी कंदाचे वजन जवळपास ४५ ते ५० ग्रॅम असणे आवश्यक आहे.
या गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे :
अळूच्या लागवडीसाठी तुम्ही सरी वरंबा तसेच सपाट वाफे किंवा गादि वाफे या तीन पद्धतीचा वापर करू शकता.जेव्हा तुम्ही लागवड करणार आहात त्यावेळी कंद मध्ये सरासरी ८ ते १० सेमी खोलीवर लावावे आणि त्यास मातीने चांगले झाकून घ्यावे. महाराष्ट्र राज्यात काळ्या देठाचा लहान तसेच मध्यम पानाचा अळू चांगल्या प्रतीचा मानला जातो.अळूची (taro)वडी तयार करण्यासाठी चांगल्या प्रतीचा अळू ची जात कोकण हरितपर्णी किंवा दापोली -१ ही वापरली जाते. अळू चे पीक जर तुम्ही १ एकर मध्ये लावले असेल तर त्यास तुम्हाला १०० किलो स्फुरद, १०० किलो नत्र आणि पालाश ची पूर्ण मात्रा आणि नत्र ची अर्धी मात्रा अळू च्या लागवडी वेळी द्यावी. बाकी राहिलेल्या नत्राची अर्धी मात्रा लागवडीच्या ३५ ते ४० दिवसानंतर द्यावी.
हेही वाचा:योग्य नियोजन करून शेतामध्ये लावा पपई, वर्षाकाठी मिळवा 15 लाखाचे उत्पन्न
जेवढ्या जास्त दिवस ओलावा टिकून राहतो तेवढ्या जास्त प्रमाणात अळू चे उत्पादन मिळते त्यामुळे अळू च्या पिकाला जमिनीच्या अंदाजाने पाणी द्यावे लागते. अळूच्या पानावर मावा किडीचा प्रादुर्भाव किंवा कुरतडणारी अळी चा प्रादुर्भाव होतो त्यासाठी तुम्हाला थायोडेन 0.2 टक्के किंवा मेलॅथिऑन 0.1 टक्के या प्रमाणे तुम्हाला फवारणी करावी लागेल तेव्हा ही कीड नियंत्रणात येईल.हुमणी अळी किंवा वाळवीचा उपद्रव जर अळू वर आढळला तर क्लेरोपायरीफॉस कीटकनाशक चा वापर केला पाहिजे.
तसेच पावसाळा मध्ये काही वेळा करपा रोगाचा प्रादुर्भाव होतो त्यासाठी तुम्ही जी पाने रोगग्रस्त झाली आहे ती काढून टाकावी आणि १ टक्के प्रमाणत बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी. अळू च्या पानाची लागवड केल्यानंतर दीड ते दोन महिन्यानंतर ती काढायला येतात जे की पूर्ण वाढ झालेली अळू तुम्ही देठापासून कापून त्याच्या गड्ड्या बांधव्या आणि विक्रीला पाठवावे. ज्यावेळी तुम्ही पहिल्यांदा पाने काढता त्या नंतर १५ दिवसात दुसऱ्या वेळी पाने काढायला येतात. एकदा अळू ची लागवड केली की सुमारे दीड ते दोन वर्षे पाने येत राहतात आणि त्यापासून बाजारात चांगल्या प्रकारे भाव मिळून चांगल्या प्रमाणत नफा सुद्धा मिळतो.
Published on: 26 September 2021, 11:05 IST