Agripedia

मिरची लागवड करताना मिरची विषयी संपूर्ण माहिती असणे सर्वात महत्त्वाचे ठरते. मिरची कोणती लावली योग्य जातीचा प्रकार माहिती असावी उन्हाळ्यात मिरचीची लागवड केल्यास पाणी जास्त प्रमाणात द्यावे लागते.

Updated on 18 May, 2022 3:26 PM IST

 मिरची लागवड करताना मिरची विषयी संपूर्ण माहिती असणे सर्वात महत्त्वाचे ठरते. मिरची कोणती लावली योग्य जातीचा प्रकार माहिती असावी उन्हाळ्यात मिरचीची लागवड केल्यास पाणी जास्त प्रमाणात द्यावे लागते.

 पाण्याची कमतरता असल्याने मिरचीची लागवड पावसाळ्यात करावी.

1) मिरचीच्या जातीची विविध प्रकारानुसार माहिती :(Information About Chiili Veriety)

1) तेजस्विनी मिरची:- ही एक तिखट मिरचीची जात आहे. ही जात कोणत्याही शेत जमिनीवर येते. बाजारात या मिरचीला योग्य भाव मिळतो.

 एकरी उत्पन्न- 8 ते 10 क्विंटल प्रति एकर

 मर रोग व थ्रिप्स कमी प्रमाणात येते.

 जमिनीनुसार खतांचा वापर करावा.

2) तेजा फोर मिरची :- ही जात काळ्या जमिनीत चांगल्या प्रकारे येते. तोडा करण्यास उपयुक्त ठरते. बाजारभाव चांगला मिळतो.

 एकरी उत्पन्न- 10 ते 12 क्विंटल प्रति एकर

 थ्रिप्स व हिरवा तुडतुडा रोखण्यास प्रतिकारक करते .

3) राशी मिरची :- ही जात काळ्या व मध्यम स्वरूपाच्या जमिनीत येते. उपयुक्त व मध्यम तिखट तोडा करण्यासाठी अतिशय सोपी

 एकरी उत्पन्न- 8 ते 10 क्विंटल प्रति एकर

 खतांचा वापर करताना सिंचनाद्वारे द्यावे. ह्युमिक ऍसिड 19:19:19 असे खते वापरावी.

4) अग्निरेखा मिरची :- हिरवी मिरची तोडण्यास उपयुक्त ठरते.

 एकरी उत्पन्न 8 ते 10 क्विंटल प्रति एकर

 भुरी आणि मर रोग यावर प्रतिकारक करते.

5) फुले ज्योती मिरची :- मसाला पावडर बनविण्यासाठी मिरची जास्त वापरली जाते.

 वाळलेल्या मिरचीचे एकरी उत्पन्न 10 ते 12 क्विंटल प्रति एकर

 भुरी रोग कमी प्रमाणात पडतो, फुलं किडी व पांढरी माशी ला प्रतिकारक करते.

6) ब्याडगी मिरची:- लाल मिरचीसाठी ही जात वापरली जाते. दीर्घ काळ साठवून ठेवता येते, रंग फिकट होत नाही. मिरचीवर सुरकुत्या जास्त असतात. मिरचीची साल जाड राहते त्यामुळे वजन जास्त राहते.

7) ज्वाला मिरची:- लागवडीसाठी योग्य जात आहे.

 तिखटपणा जास्त आहे.

8) पंत सी -1 मिरची :- हिरव्या व लाल मिरचीसाठी ही जात वापरली जाते जाते.

 तिखटपणा जास्त आहे.

9) फुले सई मिरची:- या मिरचीचा रंग वाळल्यानंतर गर्द लाल होतो.

 तिखटपणा मध्यम आहे.

10) संकेश्वरी 32 मिरची :- या मिरचीची लागवड मुख्यत: लाल मिरचीच्या उत्पादनासाठी केले जाते. तिचा रंग लाल व आकर्षक असतो. तिखट मध्यम आहे.

 

 ही जात प्रामुख्याने कोरडवाहू जमिनीत लावली जाते.

 महत्वाच्या बातम्या

नक्की वाचा:Solar Farming: जर शेतकऱ्यांनी ठरवले तर, सोलर फार्मिंग ही संकल्पना शेतकऱ्यांसाठी खूपच ठरेल फायदेशीर

नक्की वाचा:टाकळीभान उपबाजारातील प्रकार! कांद्याला मिळाला प्रतिकिलो 1 रुपये भाव; शेतकऱ्याचा विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न

नक्की वाचा:सावधान..! तापमान वाढीची धक्कदायक कारणे आली समोर; दुर्लक्ष केल्यास...

English Summary: this is chilli variety is so important for chilli cultivation that give more production and profit to farmer
Published on: 18 May 2022, 03:26 IST