Agripedia

नमस्कार मंडळी आपन शेतामध्ये पीकावर फवारणी करतो पण आपण कधी कधी विचार न करुन फवारणी करतो.

Updated on 22 April, 2022 1:22 PM IST

नमस्कार मंडळी आपन शेतामध्ये पीकावर  फवारणी करतो पण आपण कधी कधी विचार न करुन फवारणी करतो.

शेती या क्षेत्रात अनेक गोष्टींचा विचार करूनच कोणते काम केले पाहिजे मग ती  फवारणी असो की खत व्यवस्थापन असो आपन तसे पाहिले तर फवारणी ही शेवटच्या टप्प्यातल्या प्रश्न आहे सांगायचे झाले तर पिकांवर जर भरपूर प्रमाणात कीटक असेल तर या गोष्टीचा वापर योग्य आहे.म्हणजे जर एखादा प्रश्न आपल्याला साध्या मार्गाने सोडवता येत असेल तर आपण तो प्रश्न साध्या सोप्या पद्धतीने सोडवायचा प्रयत्न करायला पाहिजे. काही शेतकरी पिकावर फुले येण्या अगोदरच फवारणी करतात.पण कोणकोणते पीक असे असतात कि त्याला वेळेवर उपचार किंवा फवारणी करावा लागते.

नक्की वाचा:कृषीत येणार महिलाराज! कृषी क्षेत्रातील 50 टक्के योजना या महिला शेतकऱ्यांसाठी असणार राखीव

आपन शेती मधे फवारणी करतो त्या मागे वेगवेगळी कारणे असतात.परंतु कारण जाणून घ्यायला पाहिजे. म्हणजेच पिकावर काही कीड पहिल्यांदा पडतात त्याचे निवारण शक्यतो नैसर्गिक पद्धतीनेच करायला पाहिजे. मात्र आपण तसे करत नाही आपण सूरवात इतकी खतरनाक करतो की  सुरुवातीलाच घातक विषारी रसायनांची फवारणी करून सर्व कीटक मारून टाकतो त्यामध्ये काय होते कि शत्रू किटकासोबत मित्र किटकही मारल्या जातात ही  चुकीची पद्धत आहे.आपन एकाच हंगामाचा विचार करून चालणार नाही.

पुढच्या पिढ्यीचा सुद्धा आपल्याला विचार करावा लागणार आहे.असे आपन केले नाही तर त्याचे परिणाम आपल्या भोगावे लागतील.नैसर्गिक पद्धती किंवा रासायनिक पद्धतीने सर्वेक्षण करून योग्य फवारणी चे नियोजन महत्त्वाचे आहे.

आपल्या पिकांवर कीटकांचा प्रादुर्भाव झाला असेल तरच फवारणी करण्यासाठी योग्य कालावधी झाला असे म्हणता येईल.परंतु आपला शेतकरी वर्ग  झाडावर किटक नसेल तरी फवारणी करतो हे चुकीचे आहे या मधे दोन गोष्टी अपव्यय आहे एक म्हणजे पैसा दूसरे म्हणजे वेळ आपण उगाच रासायनिक फवारणी करण्यात वेळ वाया गमावतो. फवारणी करण्याचे योग्य वेळ आली का हे पाहणे गरजेचे आहे. तर फवारणी करण्याच्या अगोदर आपल्या शेतातील पाच सहा झाडांचे सुक्ष्म निरीक्षन करायचं पण कसे करायचे ?त्या झाडाच्या तिनं भागातले पान जसे वरचे पान, मधले पान आणि सर्वात खालचे पान घेऊन त्याच्या मागच्या बाजूला त्यावर रस शोषून घेणारे किडे आहे का ते पहावे

आपल्याला आठ ते दहा किडे दिसले किंवा मावा अळीचा प्रादुर्भाव दिसला तरच फवारणी करणे उपयोगाचे ठरेल.परंतु पहिल्यांदाच आपण रासायनिक फवारणी न करता नैसर्गिक पद्धतीने म्हणजेच पिवळे चिकट सापडे किंवा निळे चिकट सापडे असतील तर त्याचा उपयोग आपण करायला पाहिजे. तसेच तुडतुडे जर आपल्याला त्या पानावर तीन ते चार पाहायला मिळाले असेल तरच फवारणी करायला पाहिजे.

कारण की हे तुडतुडे पानातील रस शोषून घेतात आणि पिकांना मोठे नुकसान पोहोचवतात. तसेच पांढऱ्या माशीचे संकट सुद्धा पिकाच्या झाडावरती येते. तर पानाच्या मागच्या बाजूला आठ दहा कीड किंवा दहा ते पंधरा पांढऱ्या माशीचे किट आढळले असेल तर फवारणी करण्याचे योग्य वेळ आहे.

नक्की वाचा:आता झोपो आंदोलन!! महावितरण विरोधात आता शेतकरी आक्रमक

 कारण की ते आपल्या पिकांना हानी पोहोचवतात याच्या व्यतिरिक्त ही कीड मिक्स पद्धतीने सुद्धा झाडावर पडत असते. म्हणजेच मावा, तुडतुडे, पांढरी माशी, फुलकिडे, रस शोषक किडे हे सर्व एकत्र येऊ शकतात. तर त्यासाठी निरीक्षण करण्यासाठी झाडाचे वरचे पान, मधले पाण, खालचे पान घ्यायचे आणि त्याचे निरीक्षण करायचे. त्यावर तुम्हाला दहा ते पंधरा किडे आढळून आले तर फवारणी नक्की करा.कारण की हे एकत्रित मिश्रण जरी असला तरीसुद्धा हे पिकासाठी हानीकारक आहेत.

परंतु जोपर्यंत रस शोषक किडी आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसून येत नाही, तोपर्यंत तुम्ही नैसर्गिक पद्धतीनेच कीड नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करा आणि शेतीला वाचवा, अनेक पिढ्यांना देखील वाचवा, आपल्या काळ्या आईला वाचवा आणि निसर्गाचा समतोल राखून ठेवणे आवश्यक आहे...,

विचारांची दीशा बदला जिवनाची दशा आपोआप बदलेल

... मिलिंद जि गोदे...

Save the soil all together

9423361185

English Summary: the management of crop like as sprey depend on observation and planing
Published on: 22 April 2022, 01:22 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)