आपल्याला माहित आहेच की, पिकांना उत्पादनवाढीसाठी मुख्य अन्नद्रव्यांमध्ये नत्र,स्फुरद आणि पालाश यांची गरज असते. या मुख्य अन्नद्रव्यांसोबत काही सूक्ष्म अन्नद्रव्य देखील तितकेच महत्वाचे असतात.
या सगळ्यांचा संतुलित वापर केला तर पिकांच्या उत्पादनात वाढ होते. हीच बाब ऊस या पिकासाठी सुद्धा लागू होते. ऊस उत्पादन वाढीमध्ये उसाच्या खत व्यवस्थापनाला खूपच महत्त्व आहे. कारण आपल्याला माहित आहेच की ऊस या पिकाला जास्त अन्नद्रव्यांची गरज असते. त्यामुळे सेंद्रिय खतांसोबत रासायनिक खतांच्या देखील शिफारसीनुसार मात्र द्यावे लागतात. अगदी लागवडीपासून ऊसाला मोठ्या प्रमाणात खतांची आवश्यकता असते. यामध्ये मुख्य अन्नद्रव्य तसेच दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्ये योग्य वेळेत व संतुलित प्रमाणात देणे आवश्यक असते. अन्नद्रव्य नुसार जर आपण पिकांच्या गरजेचा विचार केला तर जोमदार उगवन, तसेच उसाला मुळ्या फुटण्यासाठी स्फुरद आणि पालाश आवश्यक असते तर जोमदार फुटवे येण्यासाठी नत्राची आवश्यकता असते. तसेच सल्फर चा वापराने क्लोरोफिल व प्रोटीनचे योग्य नियोजन होते व प्रकाशसंश्लेषण क्रिया चांगल्या पद्धतीने होते त्यामुळे पानांमध्ये अन्नाची निर्मिती मोठ्या प्रमाणात होते व पर्यायाने रसाची शुद्धता वाढून साखरेचा उतारा वाढतो.
ऊस उत्पादन वाढीत गंधकाचे कार्य
दाणेदार गंधक खत जास्त प्रमाणात वापरले जाते यामध्ये 90 टक्क्यांपर्यंत मूलभूत गंधक व 10 टक्के बेन्टोनाईट असते. याचा मातीमध्ये ओलाव्याशी संपर्क आल्यावर याच्या पेस्टाइलचे जलद विघटन होते व मूलभूत गंधक पिकांना त्वरित उपलब्ध होते.
ज्या गंधकाचे विघटन होते त्याचे ऑक्सिडेशन होऊन त्याचे सल्फेट मध्ये रूपांतर होते. या स्वरूपामध्ये उसाला त्याच्या संवेदनशिल वाढीच्या अवस्थेत उपलब्ध होते. गंधक हे पीकाला समप्रमाणात जमिनीत पेरून देता येते.
1- गंधक पिकांना जलद उपलब्ध होते व उसाची वाढ होते.
2-यामुळे नत्राचे कार्यक्षमता वाढते.
3- जमिनीचा सामू सुधारल्याने स्फुरद, लोह व जस्त या अन्नद्रव्याची उपलब्धता वाढते.
4- जमिनीचा पोत देखील सुधारतो तसेच जमिनीची खत वापर क्षमता वाढते.
5- ऊस पिकाच्या महत्त्वाच्या वाढीच्या टप्प्यांमध्ये पिकांची अल्पकालीन व दीर्घकालीन गंधकाची गरज पुरवली जाते व पिकाची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
6- उसाच्या रसाची शुद्धता वाढते व साखरेचा उतारा देखील वाढतो. उसाची गुणवत्ता सुधारण्यास मदत होते पर्यायाने उत्पादनात वाढ होते.
ऊस पोषणामधील गंधकाची भूमिका
1- मुख्य अन्नद्रव्यांसोबत गंधक वापरल्याने उसाचे उत्पादन क्षमता वाढते.
2- जमिनीतील सामू पातळी नियंत्रित करते व क्षारयुक्त जमिनीची गुणवत्ता वाढवते.
3-पानातील हरितद्रव्य मध्ये सुधारणा होते तसेच प्रकाश संश्लेषणाची क्रिया अधिक प्रभावी होते. पिकांमधील स्टार्च, शर्करा, मेद आणि जीवनसत्व या सगळ्यात सुधारणा होते
4-वनस्पतीमधील आवश्यक अमिनो आम्लाच्या 90 टक्के भाग यामुळे बनतो.
महत्वाच्या बातम्या
नक्की वाचा:पाणी प्या परंतु बसूनच! यामुळे होतात आरोग्याला खूपच काही फायदे, वाचा आणि घ्या जाणून
Published on: 25 April 2022, 01:07 IST