गतवर्षी राज्यात मोठ्या प्रमाणावर उसाचे क्षेत्र वाढले. यामुळे कारखान्यांवर मोठा ताण आला आहे. असे असताना आता अजूनही अनेक शेतकऱ्यांचा ऊस अजूनही शेतात आहे. यामुळे आता आपला ऊस घालवण्यासाठी शेतकऱ्यांची पळापळ सुरु आहे. अनेकांचे ऊस तुटून गेल्याने आता खोडव्याची तयारी शेतकऱ्यांनी सुरु केली आहे.
असे असताना खोडव्याच्या वजनात मोठी घट होत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे टनीजवर देखील याचा परिणाम होत आहे. खोडवा पिकाची जोपासणा आधुनिक तंत्राने केल्यास खोडव्याचे उत्पादन हे लागणीच्या उसाएवढेच मिळू शकते. योग्य व्यवस्थापन झाले तर यामध्ये शेतकऱ्यांच्याच फायदा होणार आहे. मात्र, त्यासाठी आत्याधुनिक पध्दतीचा अवलंब होणे गरजेचे आहे.
यामध्ये सुरुवातीला ऊस पीक हे विरळ झाल्यास ते क्षेत्र भरुन काढण्यासाठी तयार केलेले रोपे वापरावी. खोडवा पिकात पाचटाचा पूर्ण वापर करणे सहज शक्य होते. यामुळे पाचटाकुटी केली तर ती फायदेशीर ठरते आणि पाण्याची देखील गरज यामुळे कमी लागले. पाचटामध्ये 0.42 ते 0.50 टक्के नत्र 0.17 ते 0.20 टक्के स्फुरद, 0.90 ते 1.00 टक्के पालाश आणि 32 ते 40 टक्के सेंद्रीय कर्ब असते. एक हेक्टर क्षेत्रामधून 7 ते 10 टन पाचट मिळते आणि त्यापासून 31.5 ते 50 किलो नत्र, आणि 3 ते 4 हजार किलो सेंद्रीय कर्ब जमिनीत घातले जाते.
खोडव्यासाठी रासायनिक खतांची मात्रा दोन समान हप्त्यात द्यावी. पहिली खत मात्रा खोडवा ठेवल्यानंतर 15 दिवसांच्या आतच पूर्ण करावी व दुसरी खतमात्रा 130 दिवसांनी करावी. यामुळे खोडवा वाढीस फायदा होणार आहे. शक्यतो ऊसाचे उत्पादन हेक्टरी 100 टन असलेल्या उसाचा खोडवा ठेवावा. खोड किडींच्या नियंत्रणासाठी 35 टक्के एण्डोसल्फॉन प्रवाही 700 मि. ली. 500 लिटर पाण्यास मिसळून प्रति हेक्टरी मारावे.
महत्वाच्या बातम्या;
आता पशुधन विमा योजना लवकरच होणार सुरु, अनेकांना होणार फायदा
क्षणात झाले होण्याचे नव्हते, कोकणातील शेतकरी मोठ्या संकटात
शेतकऱ्यांनो 'या' म्हशीच्या जातींचे करा संगोपन, होईल बक्कळ फायदा..
Published on: 25 April 2022, 03:32 IST