Agripedia

भारतात तसेच महाराष्ट्रात बऱ्याच प्रमाणात भाजीपाला लागवड केली जाते.भाजीपाला शेती मधून अगदी कमी कालावधीत चांगला दर सापडला तर खूप चांगला पैसा मिळतो.

Updated on 15 June, 2022 9:01 AM IST

भारतात तसेच महाराष्ट्रात बऱ्याच प्रमाणात भाजीपाला लागवड केली जाते.भाजीपाला शेती मधून अगदी कमी कालावधीत चांगला दर सापडला तर खूप चांगला पैसा मिळतो.

परंतु भाजीपाल्याचे व्यवस्थापन काटेकोरपणे करायला लागते. तेव्हा उत्पादनात अपेक्षित वाढ साध्य करणे शक्य होते.

भाजीपाल्याचे उत्पादन वाढावे यासाठी विविध प्रकारचे तंत्रज्ञान बरेच शेतकरी वापरतात.कारण या तंत्रज्ञान वापराने भाजीपाल्याचे उत्पादन वाढावे व पर्यायाने आर्थिक उत्पन्नात वाढ व्हावी हा एक उद्देश असतो.असाच एक तंत्रज्ञान भाजीपाला लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचे आहे.

बऱ्याचदा वेलवर्गीय भाजीपाला जमिनीवर पसरल्याने बर्‍याच कारणाने ते सडते. ही समस्या जास्त करून भाजीपाला पिकांमध्ये येतच असते.हे समस्या टाळायचे असेल व भाजीपाल्याचे उत्पादन वाढवायचे असेल तर स्टॅकिंग तंत्रज्ञान खूप महत्त्वाचे ठरते.

यासाठी बरेच राज्य सरकारांकडून मदत देखील केली जाते. कारण हे तंत्रज्ञान किंवा ही पद्धत शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचे आहे.

नक्की वाचा:ही शेती करा आणि कमवा लाखो रूपये, जाणून घेण्यासारखी गोष्ट

यामध्ये आपण हरियाणा सरकारचा विचार केला तर स्टॅकिंग पद्धतीसाठी भाजीपाल्यामध्ये बांबू आणि लोखंडाचा वापर शेतकऱ्यांनी करावा यासाठी 50 ते 90 टक्के अनुदान देत आहे.

फक्त एक ऑनलाईन अर्ज करून या योजनेचा लाभफलोत्पादन पोर्टलवर अर्ज करून शेतकऱ्यांना घेता येतो.स्टेकिंग तंत्रज्ञानाचा अवलंब हजार शेतकऱ्यांनी भाजीपाला शेती मध्ये केला तर ते फायद्याचे ठरते.

स्टॅकिंग हे भाजीपाला शेतीतील एक पद्धतीच्या नाव असून भाजीपाला शेती चांगले उत्पादन मिळविण्याच्या संदर्भातील एक  खूप महत्त्वपूर्ण गोष्ट आहे.

या पद्धतीमध्ये भाजीपाला शेती करणारे शेतकरी बांबूच्या साह्याने तार आणि दोरीच्या सहाय्याने एक जाळे तयार करतात व त्यावर वनस्पतींच्या वेली चढवतात. ही पद्धत करवंद, मिरची, वांगी तसेच टोमॅटो या भाजीपाला पिकांना या पद्धतीचा अवलंब केल्यास उच्च उत्पादन मिळते.

या तंत्रज्ञानासाठी लागणाऱ्या बांबू आणि लोखंडी अशा दोन्ही पद्धतीचे स्टॅकिंग साठी सरकार स्वतंत्र अनुदान देत आहे.

नक्की वाचा:खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर बाजरी पिकाचे व्यवस्थापन, शेतकऱ्यांचे उत्पादन वाढणार

 या तंत्रज्ञानाचा फायदा

 अगोदर बरेच शेतकरी जुन्या पद्धतीने भाजीपाला व फळांचे लागवड करत. परंतु आता भाजीपाला शेती मध्ये शेतकरी स्टॅकिंग तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करत आहेत.

कारण हे तंत्रज्ञान अगदी सोपे आहे. या तंत्रज्ञानात फार कमी साहित्य  वापरले जाते. या तंत्रज्ञानात बांबू आणि लोखंडे यांच्या  साह्याने तार आणि  दोरी चे जाळे तयार करून भाजीपाला पिकवला जातो. या पद्धतीमुळे भाजीपाल्याचे उत्पादनही वाढत आहे.

वेलवर्गीय भाजीपाला मध्ये वेली जास्त फळांचे वजन सहन करू शकत नाही. अशा परिस्थिती मध्ये स्टॅकिंग तंत्रज्ञान झाडांना भरपूर आधार देतो व त्यामुळे फळधारणा देखील चांगली होते. भाजीपाला पीक जमिनीवर लोळत नसल्याने ओलाव्याच्या परिस्थितीत ते कुजत नाही.

नक्की वाचा:1634 आणि 1636 या गव्हाच्या दोन जाती जास्त उष्णतेत देखील देतील बंपर उत्पादन, वाचा याविषयी सविस्तर माहिती

English Summary: staking technology is so useful in vegetable cultivation and farming
Published on: 15 June 2022, 09:01 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)