Agripedia

शेतकरी आधुनिक पद्धतीनं शेती करण्यासाठी आपल्या शेतीत अनेक नवनवीन बदल करत आहेत. मात्र चांगल्या उत्पादनासाठी पिकांचे योग्य व्यवस्थापन करणे हे देखील तितकेच महत्वाचे आहे.

Updated on 21 August, 2022 10:39 AM IST

शेतकरी आधुनिक पद्धतीनं शेती (Modern farming) करण्यासाठी आपल्या शेतीत अनेक नवनवीन बदल करत आहेत. मात्र चांगल्या उत्पादनासाठी पिकांचे योग्य व्यवस्थापन करणे हे देखील तितकेच महत्वाचे आहे.

पिकांच्या व्यवस्थापनामध्ये कीड व रोगापासून पिकाचे संरक्षण (Protection crop disease) हे सर्वात महत्वाचे काम आहे. फवारणीसाठी आवश्यक अवजारे कमी खर्चात उपलब्ध आहेत. ज्यामुळे सुलभपणे फवारणी शेतकरी सहज करू शकतो.

आपण ज्या यंत्राची माहिती घेणार आहो, ते सौरचलित बॅटरी फवारणी यंत्र (Solar Powered Battery Sprayer) आणि मनुष्यचलित सायकल फवारणी यंत्र आहे. सोयाबीन पिकाच्या फवारणी आणि काढणीसाठीची ही आधुनिक यंत्रे वापरली जातात. याविषयी आपण माहिती जाणून घेऊया..

Farmer Income : शेतकऱ्यांच्या शेतमालाला मिळणार योग्य दर; 22 ऑगस्ट रोजी होणार बैठक

१) मनुष्यचलित सायकल फवारणी यंत्र

सोयाबीन पिकांवरील कीटक व रोग नियंत्रणासाठी (Disease control) पाणी मिश्रित कीडनाशकांची फवारणीसाठी करणे गराजेचे असते. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी मनुष्यचलित सायकल फवारणी यंत्र हाताळण्यास सोईस्कर आहे.

द्रावण आणि भुकटीच्या स्वरूपात कीटकनाशकांचा वापर करता येतो. फवारणीसाठी लागणारा वेळ व खर्चात बचत होते. या टाकीची क्षमता ११.५ लिटर आहे. या यंत्राचा वापर बरेच शेतकरी करत असतात. यामधून शेतकऱ्यांच्या पैशांची मोठी बचत होऊ शकते.

Onion Market Price: कांद्याच्या दरात चढ की उतार? जाणून घ्या बाजारभाव

2) सौरचलित बॅटरी फवारणी यंत्र

विशेष म्हणजे सौरचलित बॅटरी फवारणी (Solar Powered Battery Sprayer) यंत्राची बॅटरी शेतातील पिकांवर फवारणी करत असतानाही चार्ज होते. चार्जिंगसाठी सौरऊर्जेचा वापर होतो. या यंत्रामध्ये सौरऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत केले जाते. या यंत्रासाठी सोलर पॅनेल आणि १२ व्होल्ट बॅटरीची आवश्यकता असते. या टाकीची क्षमता- १५ लिटर आहे.

महत्वाच्या बातम्या 
शेतकऱ्यांनो 'या' कारणाने दुधाची फॅट होते कमी; फॅट वाढविण्यासाठी वापरा हे तंत्र
'या' राशीच्या लोकांचे भाग्य सूर्य प्रकाशासारखे चमकणार; वाचा तुमचे राशीभविष्य
ड्रोन बनवण्यात स्वदेशी नारा!! भारतात तयार होत आहेत मोठ्या प्रमाणावर ड्रोन, अनुदानही जास्त

English Summary: spray crop machine low cost saving money
Published on: 21 August 2022, 10:21 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)