शेतकरी जेव्हा शेतामध्ये पिकांची लागवड करतात त्यावेळेस वेगवेगळ्या प्रकारच्या पिकांची लागवड करण्यासाठी मातीत देखील त्या पिकाला आवश्यक असणारे गुणधर्म असणे आवश्यक असते. तरच उत्पादन देखील चांगले येते. परंतु बऱ्याचदा मातीचे गुणधर्म न पाहता पिकांची लागवड केली जाते व अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढतो परंतु हव्या त्या प्रमाणात उत्पादन निघत नाही.
यावरच उपाय म्हणून शेतकऱ्यांना मातीचे गुणधर्म कोणत्या प्रकारचे आहेत हे लक्षात घेऊन पीक लागवडी संदर्भातील निर्णय घेता येणार आहे.
यामध्ये विदर्भातील सर्व गावा गावात असलेल्या पीक पद्धती कोणत्या असाव्यात याकरिता जमीन संसाधनांचा अभ्यास पूर्ण आराखडा तयार करण्यात आला असून त्यानुसार आता मातीचे गुणधर्म लक्षात घेऊन गावनिहाय पिके घेणे संदर्भातील निर्णय घेण्यात येणार आहे.
काय आहे नेमका हा आराखडा?
ICAR अंतर्गत असलेले राष्ट्रीय मुद्दा सर्वे आणि जमीन वापर नियोजन या संस्थेने विदर्भातील गावांचा आराखडा तयार केला आहे व त्यानुसार संबंधित विदर्भातील सर्व 11 जिल्ह्यातील शेतशिवारामध्ये कोणते पिक पद्धती शेतकऱ्यांना फायद्याची ठरेल या विषयाच्या बाबींचा अंतर्भाव या आराखड्यात करण्यात आला असून या संदर्भातील अहवालाचे प्रकाशन ऑगस्टमध्ये होणार आहे.
या संस्थेकडून जवळजवळ विदर्भातील 11 जिल्ह्यातील मातीच्या गुणधर्माचा अभ्यास करण्याचे काम हे मागच्या वर्षापासून सुरू करण्यात आले.
नक्की वाचा:शेतकऱ्यांनो सावधान! पाऊस पडल्यानंतर तूर पिकात करा हे काम; अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान
यामध्ये त्यांनी रिमोट सेंसिंग यंत्रणेचा अवलंब केला. त्यामुळे विदर्भातील 11 जिल्ह्यातील डिजिटल नकाशे आहेत ते उपग्रहाच्या मार्फत प्राप्त झाले. रिमोट सेन्सिंग च्या माध्यमातून संबंधित जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी कोणत्या प्रकारची माती आहे हे लगेच कळते. फायदा
या सगळ्या गोष्टींचे विश्लेषण करून माती संबंधित सविस्तर अहवाल तयार करण्यात आला आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये या संस्थेचा वर्धापन दिन असून या दिवशी अहवालाचे प्रकाशन करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.
नक्की वाचा:कपाशीवर होतो सुरुवातीला रसशोषक किटकांचा मोठा प्रादुर्भाव, अशा पद्धतीने करा नियंत्रण होईल
Published on: 25 July 2022, 03:30 IST