Agripedia

महाराष्ट्रामध्ये सोयाबीनची लागवड बऱ्याच ठिकाणी केली जाते.खास करून विदर्भ,पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या बऱ्याच भागात सोयाबीन लागवड केली जाते. या पिकाखालील क्षेत्र झपाट्याने वाढत असून शेतकऱ्यांना एक चांगला उत्पन्नाचे स्त्रोत म्हणून या पिकाकडे पाहिले जाते.

Updated on 15 June, 2022 1:01 PM IST

महाराष्ट्रामध्ये सोयाबीनची लागवड बऱ्याच ठिकाणी केली जाते.खास करून विदर्भ,पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या बऱ्याच भागात सोयाबीन लागवड केली जाते. या पिकाखालील क्षेत्र झपाट्याने वाढत असून शेतकऱ्यांना एक चांगला उत्पन्नाचे स्त्रोत म्हणून या पिकाकडे पाहिले जाते.

जर सोयाबीन पिकाचे व्यवस्थापन अगदी काटेकोरपणे आणि व्यवस्थित तंत्रशुद्ध पद्धतीने केले तर उत्पादन व गुणवत्ता नक्कीच वाढण्यास मदत होते. आता खरीप हंगामात सोयाबीनची पेरणी चा कालावधी चालू असून बऱ्याच पेरण्या होत आहेत.

परंतु बऱ्याचदा असे होते की जेव्हा पिक जोमदार वाढीच्या अवस्थेत असते किंवा फुल धारणेच्या अवस्थेत असते तेव्हाच नेमका पावसाचा खंड पडतो.

जर अशा वेळी पावसाचा खंड पडला तर उत्पादनात घट निश्चित येते हे तेवढेच खरे आहे. त्यामुळे आपण या लेखात  पावसाचा खंड पडल्यानंतर सोयाबीन पिकाचे व्यवस्थापन कसे करावे, याबाबत माहिती घेऊ.

नक्की वाचा:शेतकऱ्यांनो सोयाबीन पेरणीबाबत वाचा तज्ञांचा सल्ला, वाढेल उत्पादन

 पावसाचा खंड पडला तर सोयाबीन पिकाचे व्यवस्थापन

1- सर्वसाधारणपणे जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या कालावधीमध्ये पावसाचे दोन तीन मोठे खंड पडतातच. जर या कालावधीचा विचार केला तर यावेळी पिके वाढीच्या संवेदनशील अवस्थेत असते.

त्यामुळे पिकाच्या वाढीवर वाईट परिणाम होतो. यासाठी शिवारातील विविध प्रकारची माती व जलसंधारणाची कामे करून शेततळ्याच्या माध्यमातून संरक्षित पाण्याच्या एक ते दोन पाळ्या देण्याच्या सुविधा उपलब्ध करून ठेवाव्यात.  त्यामुळे उत्पादनात 30 ते 40 टक्के वाढ नक्की होते.

नक्की वाचा:उसावरील रसशोषक (पायरीला पांढरी माशी )किडींचे व्यवस्थापन

2- दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण शेताचीमशागत करतो आणि पेरणी करतो तेव्हा ती उताराला आडवी अशी करावी. ठराविक अंतरावर ज्या ठिकाणी पीक लागवड केलेली नाही म्हणजे पीक घेतले नाही अशा ठिकाणी मृत चर काढावेत.

3- पेरणी केल्यानंतर 30 ते 35 दिवसांनी जेव्हा आपण खुरपणी वगैरे अशा आंतरमशागतीची कामे आटोपतो त्यानंतर चार ओळींनंतर एका ओळीत दहा ते वीस सेंटीमीटर खोलीचा उथळ चर अथवा सरी काढावी. ज्यामुळे अतिरिक्त पाण्याचा निचरा होतो व कमी पाऊस झाल्यास पावसाचे पडणारे पाणी यामध्ये मुरवता येते.

4- जर पाण्याचा खंड मोठ्या प्रमाणात पडला तेव्हा पाण्याचा ताण जास्त पडला तर केओलीन(7 टक्के) या परावर्तकाचा किंवा पोटॅशिअम नायट्रेट 0.5 ते दहा टक्के फवारणी करावी.

नक्की वाचा:आज माती वाचवा उद्या माती आपल्याला वाचवेल

English Summary: small but important tips in gap of rain for soyabioen crop that give more benifit to farmer
Published on: 15 June 2022, 01:01 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)