Agripedia

तूर पीक हे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात घेण्यात येणारे पीक आहे. या पिकासाठीमध्यम ते भारी जमीन निवडली तर तूर या पिकाची वाढ अशा जमिनीत चांगली होते. महाराष्ट्रामध्ये ज्या तूरीच्या जाती लावल्या जातात त्या जातींचा कालावधी हा 110 ते दोनशे दिवसा पर्यंतचा आहे.

Updated on 15 April, 2021 10:31 PM IST

तूर पीक हे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात घेण्यात येणारे पीक आहे.  या पिकासाठीमध्यम ते भारी जमीन निवडली तर तूर या पिकाची वाढ अशा जमिनीत चांगली होते.  महाराष्ट्रामध्ये ज्या तूरीच्या जाती लावल्या जातात त्या जातींचा कालावधी हा 110 ते दोनशे दिवसा पर्यंतचा  आहे.  तुरीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे की,  तुरीची मुळे जमिनीत खोलवर जात असल्यामुळे ती जमिनीत अंतर स्तरावरील ओलावा व अन्नद्रव्ये शोषण घेत.

तुरीची सुधारित वाण

 तूरीचे पीक तयार होण्यास लागणा-या कालावधीनुसार तुरीच्या वाणांचे कमीत कमी चार प्रकारात वर्गीकरण करता येते.

  • अति लवकर तयार होणारे वाण( कालावधी 110 ते 115 दिवस)

  • लवकर तयार होणारे वाण( कालावधी 135 ते 160 दिवस)

  • मध्यम उशिरा तयार होणारे वाण( कालावधी 160 ते 200 दिवस)

  • उशिरा तयार होणारे वाण( दोनशे दिवसांपेक्षा जास्त कालावधी)

 त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीची प्रत आणि पावसाचे पडणारे प्रमाण यानुसार योग्य वाणाची निवड करावी.  साधारणपणे उधळ व हलक्या जमिनीतपाणी साठवून ठेवण्याची क्षमता कमी असते.  त्यामुळे पावसाळा संपण्याच्या वेळीपिकाला जास्त पाणी उपलब्ध होत नाही. म्हणुन अशा जमिनीत लवकर तयार होणारे वाण घेणे अधिक चांगले. याउलट खोल व भारी जमिनीत ओलीताची सोय असल्यास दुबार पिक पद्धतीसाठी अति लवकर किंवा लवकर येणारे वाण सोयीचे ठरतात.    तुरीची लागवड करण्याकरिता तुरीच्या हळव्या किंवा गरव्या या वाणांची निवड करताना प्रामुख्याने त्या वानांचा कालावधी,  जमिनीचा पोत,  पर्जन्यमान आणि पीक पद्धती हे बाबींचा विचार करून सर्वसाधारणपणे खालील प्रमाणे वाणांची निवड करावी.

हेही वाचा : लाल रंगाची भेंडी –काशी लालिमाचे लागवड तंत्रज्ञान

जमीन आणि पर्जन्यमानाच्या प्रमाणे योग्य वाण

  • मध्यम जमीन, मध्यम पर्जन्यमान- हळवे आणि अति हळव्या वाणा ची निवड करावी. उदा. टी ए टी- 10, आय सी पी एल- 87( प्रगती),  टी विशाखा-1,  ए केटी 88 11 विपुला

  • मध्यम ते भारी जमीन व खात्रीचे पर्जन्यमान- यासाठी मध्यम कालावधीत येणारे वाण निवडावेत. जसे की उदा. बी डी एन 2, मारुति(आय सी पी 88 63),  बी एस एम आर 736, बीडी एन  708 इत्यादी.  

  • भारी जमीन आणि खात्रीचे पर्जन्यमान- उशिरा तयार होणारी वाणांची निवड करावी. उदा. C11, आशा(आय सी पी एल- 87 119),  बी एस एम आर 853 इत्यादी वाणाची निवड करावी.

पीक पद्धतीप्रमाणे वाणांची निवड

  • दुबार पीक- दुबार पीक घ्यायचे असेल तर अति लवकर आणि लवकर तयार होणारे वाण निवडावे. जसे की टी ए टी 10, टी विशाखा- आय सी पी एल 87( प्रगती)
  • आंतरपीक- जरा अंतर पीक घ्यायचे असेल तर उशिरा तयार होणारे वाण निवडावे. जसे की,  c11, आशा बीएसएमआर 853 इत्यादी.

      तुरीचे हळवे सुधारीत वाण

  • टी ए टी 10- हे वाण 110 ते 120 दिवसांत तयार होते. दाण्याचा रंग लाल असुन दाण्याचा आकार मध्यम आहे. 100 दाण्यांचे वजन 8.4 ग्रॅम तसेच उत्पन्न सुमारे आठ ते नऊ क्विंटल हेक्टरी मिळते.

  • आय सी पी एल 87- हे संकरित वाण 120 ते 125 दिवसात तयार होते. ओलिताची सोय उपलब्ध असल्यास पहिल्या बहाराच्या शेंगा तोडून दुसर्‍या आणि तिसर्‍या बहाराचे नियोजन करून पीक मिळु शकते. परंतु विदर्भामध्ये उष्ण  तापमानामुळे बहुतेक दुसऱ्या बहारा पासून मिळणारे पीक फार कमी येते. एव्हाना चा पहिला  बहारा पासून 9 ते दहा क्विंटल उत्पादन मिळते. या वाणाचे दाणे चांगले टपोर व लाल असतात.

  • एके पीएच 4101- हे संकरित वाण 135 ते 140 दिवसांत तयार होते.  दाणे हे मध्यम टपोर व लाल असून100 दाण्यांचे वजन सुमारे 9.5 ग्रॅम आहे.  या वाणाची शिफारस प्रामुख्याने महाराष्ट्र,  गुजरात,  मध्यप्रदेश या राज्यांसाठी राष्ट्रीय स्तरावरून करण्यात आले आहे.

  • एके टी 88 11- हे वान सुमारे 145 ते 150 दिवसांत पक्व होते. केलाल व मध्यम टपोरी दाण्याचे वाण मर रोगास प्रतीबंधक आहे.  तसेच त्यापासून सरासरी दहा ते अकरा क्विंटल हेक्टरी उत्पादन मिळते. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने सन 1995 साली  या वाणाची शिफारस केली होती.

निमगरवे सुधारीत वाण

  • बी डीएन दोन- हे वान पांढऱ्या रंगाच्या असून मर रोगास प्रतीबंधक आहे. या वाणाच्या 100 दाण्याचे वजन दहा ग्राम आहे. 170 ते 175 दिवसात पक्व होते. या वाणापासून सरासरी दर हेक्‍टरी 15 ते 16 क्विंटल उत्पादन मिळते.

  • संतूर 1- हे संकरित वाण 165 ते 175 दिवसात तयार होते.  या वाणाचे दाणे लाल असून 100 दाण्यांचे वजन सुमारे दहा ग्राम असते. या वाहनापासून मिळणारे उत्पन्न हे बी  डी एन दोन किंवा c11 या वाणा   पेक्षा सुमारे 24 टक्के जास्त येते.

  • आशा( आय सी पी एल 87 19) हे वाण मध्यम टपोर लाल दाण्याचा असून मर आणि वांझ रोगास प्रतीबंधक आहे.  हे वान 180 ते 200 दिवसात तयार होते. आंतरपीक पद्धतीत तसेच अर्ध रब्बी किंवा रबी हंगामाचे पेरणीसाठी योग्य आहे.

  • बीएसएमआर 736- हे वान 170 ते 180 दिवसांत तयार होते. वांझ रोगास प्रतीबंधक असून वांझ रोगग्रस्त क्षेत्रासाठी उपयुक्त आहे.  या वाणाच्या परिपक्वतेचा पूर्वी शेंगा चट्टा  विरहीत व पूर्णपणे हीरव्या असतात.  वाळलेल्या दाण्याचा रंग लाल आहे,

  • मारोती ( आयसीपी 88 63) हेवान लाल दाण्याच्या असून मर रोगग्रस्त क्षेत्रासाठी महत्त्वाचे आहे. कारण ते प्रभावी मर प्रतिबंधक आहे.

  • बीएसएमआर 853- हे वाण 180 ते 200 दिवसात तयार होते. हे वाण वांझ रोग प्रतीबंधक आहे.  या वाणाच्या वाळलेल्या दाण्याचा रंग पांढरा असतो.

English Summary: Select varieties of tur pulses according to the soil type, read varieties of information
Published on: 15 April 2021, 10:27 IST