Agripedia

महाराष्ट्र मध्ये बरेच शेतकरी आता फुलशेतीकडे वळू लागले आहेत. पॉलीहाउस मध्ये फुलशेती हा एक चांगला पर्याय शेतकऱ्यांसमोर असून या माध्यमातून शेतकऱ्यांना खूप चांगले उत्पन्न मिळत आहे. जर आपण फुलांच्या बाजारपेठेचा विचार केला तर यामध्ये प्रचंड संधी असून बाजारात वेगवेगळ्या कारणांनी फुलांना नेहमीच मागणी असते.

Updated on 08 July, 2022 2:02 PM IST

महाराष्ट्र मध्ये बरेच शेतकरी आता फुलशेतीकडे वळू लागले आहेत. पॉलीहाउस मध्ये फुलशेती हा एक चांगला पर्याय शेतकऱ्यांसमोर असून या माध्यमातून शेतकऱ्यांना खूप चांगले उत्पन्न मिळत आहे. जर आपण फुलांच्या बाजारपेठेचा विचार केला तर यामध्ये प्रचंड संधी असून बाजारात वेगवेगळ्या कारणांनी फुलांना नेहमीच मागणी असते.

आपल्याला माहित आहेच की, आपल्याकडे शेतकरी जर शेती करत असतील तर जास्त प्रमाणात झेंडू आणि गुलाब या दोन फुलांची लागवड मोठ्या प्रमाणात करतात.

यामधील गुलाब लागवड ही शेतकर्‍यांच्या जीवनात नक्कीच सुगंध दरवळण्याचे काम करेल यात शंका नाही. फुलशेतीकडे वळण्याचे दुसरे एक महत्त्वाचे कारण म्हणजे शासन स्तरावरून देखील शेतकऱ्यांना बऱ्याचदा अनुदान स्वरूपात मदत केली जाते. या लेखामध्ये आपण गुलाब शेती आणि त्यापासून बनणारे उत्पादने त्यांची माहिती घेऊ.

 शेतकऱ्यांना फायदेशीर अशी गुलाब शेती

 फुलांमध्ये गुलाबाच्या फुलाला प्रचंड मागणी असते. जर आपण गुलाबाच्या सुगंधाचा विचार केला तर तर तो मनमोहक असल्यामुळे तसेच फुलांचे रूप हे  देखणे असल्यामुळे शेतकरी बऱ्याच प्रमाणात गुलाबाची लागवड करतात व गुलाबाला बाजारपेठेत देखील मोठ्या प्रमाणात मागणी असते.

आता आपण यामागील कारणांचा विचार केला तर गुलाबाच्या फुलांचा वापर सजावट आणि सुगंध याव्यतिरिक्त अनेक उत्पादने बनवण्यासाठी केला जातो.

यामध्ये आपण गुलाब पाणी, गुलाब परफ्युम, अगरबत्ती, साबण, गुलकंद आणि इतर अनेक औषधे देखील गुलाबाच्या फुलांपासून बनवली जातात. बऱ्याचदा अनेक कंपन्या थेट शेतकऱ्यांकडून गुलाबाच्या फुलांचे खरेदी करतात.

नक्की वाचा:शेतीपूरक व्यवसायातून कमवा लाखो रुपये, जाणून घ्या नेमकं करायचं तरी काय..

एकदा लागवड आणि आठ ते दहा वर्षे उत्पादन

 एकदा गुलाबांची लागवड केली तर शेतकरी गुलाब शेतीच्या माध्यमातून कमीत कमी आठ ते दहा वर्ष सतत चांगले उत्पादन काढून नफा मिळवू शकतात.

गुलाबाच्या एका रोपापासून कमीतकमी दोन किलोग्रॅम फुलांचे उत्पादन मिळते. गुलाब लागवडीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे जर तुम्ही गुलाब फुलाची लागवड हरितगृह अथवा पॉलिहाऊस यासारख्या तंत्रज्ञान वापरून केली तर वर्षातील कुठल्याही हंगामात तुम्हाला गुलाब लागवड करता येते.

 गुलाबाच्या रोपांना सूर्यप्रकाशाची असते नितांत गरज

 जर तुम्हाला गुलाबाची लागवड करायची असेल तर तुम्ही जमिनीची निवड करताना जास्त विचार करायची गरज नाही. तसे पाहायला गेले तर गुलाबाची लागवड कोणत्याही प्रकारच्या जमिनीत करता येते.

फक्त यामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी की,ज्या जमिनीत तुम्ही गुलाबाची लागवड कराल ती जमीन उत्तम पाण्याचा निचरा होणारी असावी आणि ज्या ठिकाणी गुलाब लागवड केली आहे अशा ठिकाणी उत्तम सूर्यप्रकाश योग्य प्रमाणात असणे खूप महत्त्वाचे असते.

नक्की वाचा:Agri Bussiness: वर्मी कंपोस्ट करा तयार अन विकून कमवा बक्कळ नफा,वाचा माहिती

 गुलाबाची लागवड पद्धत

गुलाब लागवड करण्याच्या अगोदर चार ते सहा आठवडे गुलाबाच्या बिया रोपवाटिकेत लावून रोपवाटिकेत रोपे तयार करणे गरजेचे असते. तसेच तयार रोपे देखील रोपवाटिकेच्या माध्यमातून मिळतात.

त्यानंतर या रोपांची पुनर्लागवड शेतकरी पेन पद्धतीने करू शकतात.लागवड केल्यानंतर सात ते दहा दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या देणे महत्त्वाचे असते.

 गुलाब शेतीतून मिळणारे उत्पन्न

 गुलाबाच्या फुलांशिवाय त्याचे देठ देखील विकले जातात. कृषी तज्ञांच्या मते एका हेक्टर मध्ये एक लाख रुपये गुंतवून गुलाब लागवडीच्या माध्यमातून शेतकरी आरामात पाच ते सात लाख रुपयांचा नफा मिळवू शकतात.

नक्की वाचा:ड्रोन सबसिडी: 'या'सर्वोत्तम कृषी ड्रोनवर मिळू शकते तुम्हाला 100% सबसिडी, वाचा सविस्तर माहिती

English Summary: rose farming is so good option for the farmer to good income source
Published on: 08 July 2022, 02:02 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)