Agripedia

1 ऑगस्ट पासून मोबाईवरून ई-पीक पाहणीची नोंद प्रक्रिया सुरू झाली आहे. सरकारच्या धोरणांनुसार ई-पीक पाहणीनुसार नुकसान भरपाई देणार असा निर्णय घेण्यात आला असल्याने शेतकर्‍यांसाठी ई-पीक नोंदी अत्यंत महत्वाची आहे.

Updated on 19 August, 2022 10:13 AM IST

1 ऑगस्ट पासून मोबाईवरून ई-पीक पाहणीची (e-peak inspection) नोंद प्रक्रिया सुरू झाली आहे. सरकारच्या धोरणांनुसार ई-पीक पाहणीनुसार नुकसान भरपाई देणार असा निर्णय घेण्यात आला असल्याने शेतकर्‍यांसाठी ई-पीक नोंदी अत्यंत महत्वाची आहे.

ई-पीक (e-crop) पाहणीच्या माध्यमातून शेतकर्‍यांनी केलेला पेरा थेट शासनाकडे (government) नोंदवला जाणार आहे. त्याअनुशंगाने कोणत्या पिकाचे किती क्षेत्रावर उत्पादन घेतले आहे. तसेच शेतकरी नुकसानभरपाईसाठी पात्र आहे, अशा राज्यात पीकपेरा किती याची माहिती सरकारकडे राहणार आहे.

शेतकऱ्यांना 'या' योजनेतून मिळणार 65 हजार मानधन; अंतिम मुदत 22 ऑगस्ट, त्वरित घ्या लाभ

'ई-पीक पाहणी व्हर्जन २' अ‍ॅपवरुन पीक पाहणी

1) सर्वप्रथम 'प्ले स्टोअर' मधून 'ई-पीक पाहणी व्हर्जन २' (E-Peak Inspection Version 2) असं नाव टाकून हे अ‍ॅप डाऊनलोड करुन घ्या.अ‍ॅप ओपन केल्यानंतर ई-पीक पाहणी नावाचे होम पेज ओपन होईल. यामध्ये आपला महसूल विभाग टाकून पुढची प्रक्रिया करा. यानंतर नवीन खातेदार नोंदणी हा पर्याय निवडा.

2) खातेदार होण्यासाठी समोर विचारण्यात आलेली माहीती शेतकर्‍यांना भरा. यामध्ये विभाग, जिल्हा, तालुका आणि गाव हे पर्याय निवडा. त्यानंतर शेतकऱ्यांनी आपले नाव, मधले नाव, आडनाव, खाते क्रमांक किंवा गट क्रमांक टाकून शोधा या पर्यायावर क्‍लिक करावे. त्यानंतर सांकेतिक नंबर टाकून प्रत्यक्ष ई-पीक पाहणी (E-Peak Inspection) या प्रक्रियेला सुरवात करा.

Walnut Cultivation: अक्रोडाच्या लागवडीतून शेतकरी होतील करोडपती; जाणून घ्या संपूर्ण पद्धत

3) यानंतर होमपेजवरील पीक (crops) माहिती नोंदवा हा पर्याय निवडा. यामध्ये खाते क्रमांक, गट क्रमांक, जमिनीचे एकूण क्षेत्र, हंगाम, पेरणीसाठी उपलब्ध क्षेत्र, पिकाचा वर्ग, क्षेत्र, जल सिंचनाचे साधन, सिंचन पध्दती, पेरणीची तारिख आदी माहिती भरा. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अक्षांश-रेखांश मिळवा.

4) त्यानंतर शेतकर्‍यांना आपण निवडलेल्या गटात जाऊन पिकाचा फोटो काढावा लागणार आहे. पिकाचा फोटो अपलोड केला की, सर्वकाही सहमती आहे का? असे विचारले जाते त्यानुसार आपली माहिती अपलोड करीत आहोत थोड्याच वेळात ती पूर्ण होईल असे सांगितले जाते. ही प्रक्रीया पूर्ण झाल्यावर तुमची ई-पीक पाहणी (E-Peak Inspection) पूर्ण होते.

महत्वाच्या बातम्या 
Horoscope: 'या' 5 राशीच्या लोकांना मिळणार प्रचंड यश; वाचा आजचे राशीभविष्य
शेतकरी मित्रांनो 'या' जातीच्या देशी कोंबड्या पाळून मिळवा बंपर नफा; जाणून घ्या
Use Fertilizers: शेतकरी मित्रांनो खते वापरताना 'या' गोष्टींची काळजी घ्या; अन्यथा होईल मोठे नुकसान

English Summary: Process through new app e-peak inspection big loss
Published on: 19 August 2022, 10:04 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)