Agripedia

महाराष्ट्रामध्ये भाजीपाला लागवड फार मोठ्या प्रमाणात केली जाते.भाजीपाला लागवडीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कमी कालावधीमध्ये चांगले आर्थिक उत्पन्न हातात येते. भाजीपाला लागवडीमध्ये आता शेतकरी परंपरागत पद्धती सोडून देत नवीन नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करत आहेत.जसे की, शेडनेट मधील भाजीपाला लागवड शेतकऱ्यांसाठी वरदान ठरली आहे.

Updated on 26 July, 2022 1:20 PM IST

महाराष्ट्रामध्ये भाजीपाला लागवड फार मोठ्या प्रमाणात केली जाते.भाजीपाला लागवडीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कमी कालावधीमध्ये चांगले आर्थिक उत्पन्न हातात येते. भाजीपाला लागवडीमध्ये आता शेतकरी परंपरागत पद्धती सोडून देत नवीन नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करत आहेत.जसे की, शेडनेट मधील भाजीपाला लागवड शेतकऱ्यांसाठी वरदान ठरली आहे.

त्यासोबतच आपल्याला माहिती आहेच की, विना माती च्या साह्याने हायड्रोपोनिक तंत्रज्ञानाने देखील भाजीपाला उत्पादन चांगल्या पद्धतीने घेता येत आहे. असेच एका फायदेशीर तंत्राचा या लेखात आपण माहिती घेणार असून जे भाजीपाला व फळे उत्पादनासाठी  फायदेशीर ठरू शकते.

नक्की वाचा:Planting vegetables! शेतकरी मित्रांनो, ऑगस्ट महिन्यात करा 'या' भाज्यांची लागवड; मिळेल भरघोस उत्पन्न

 प्रो ट्रे नर्सरी

 प्रो ट्रे हे तंत्रज्ञानाचा फायदा शेतकऱ्यांना होणार असून शेतकऱ्यांना या माध्यमातून कमीत कमी खर्चात व कमीत कमी जागेमध्ये चांगले उत्पादन मिळणे शक्‍य आहे.

प्रो ट्रे नर्सरी जर तुम्हाला तयार करायचे असेल तर त्यासाठी प्रो ट्रे, कंपोस्ट तसेच कॉकपिट नारळ खताची आवश्यकता भासेल.

यासाठी सर्वप्रथम तुम्हाला कॉकपीट ब्लॉक लागते. हे ब्लॉक नारळाच्या फोडि पासून बनवले जाते. हा कॉकपिट ब्लॉक 5 तास पाण्यामध्ये भिजत घालावा व नंतर पूर्णपणे स्वच्छ करा. असे केल्यामुळे त्यामध्ये असणाऱ्या काडीकचरा किंवा घाण निघून जाते व झाडांना कुठल्याही प्रकारची इजा होत नाही.

त्यानंतर त्याला चांगले कोरडे करावे व एखाद्या भांड्यात वाळलेले कॉकपीट द्यावे आणि त्यामध्ये 50 टक्के गांडूळखत आणि 50 टक्के कोकोपीट मिक्स करावे. त्यानंतर यांचे सर्व एकत्रित चांगले मिश्रण तयार करून घ्यावे.

नक्की वाचा:Cultivation of jojoba! जोजोबा शेतीतून शेतकरी होणार मालामाल; जाणून घेऊया हे पीक कसे पिकवणार..

 बियाण्याची लागवड

 नंतर हे मिश्रण तुम्ही ट्रेमध्ये भरू शकतात. यासाठी ट्रे मध्ये हॉल बनवावे व ते खूप खोल नसावेत. त्यानंतर तुम्ही यामध्ये बियाणे लावू शकतात. बियाणे लावल्यानंतर ते झाकून एका अंधाऱ्या खोलीत ठेवा. यामध्ये बी पेरल्यानंतर त्याला पाणी द्यावे लागत नाही हे लक्षात ठेवावे.

जेव्हा रोपांची उगवण होईल व ते थोडे वाढतील तेव्हा त्यांना बाहेर ठेवावे. नंतर झाडांना पहिले पाण्याचा  पुरवठा करावा. अशा पद्धतीने तुम्ही एक दहा ते पंधरा दिवसात भाजीपाल्याचे रोपवाटिका तयार करू शकता.

 'या' भाजीपाला पिकांची रोपवाटिका तयार करता येते

या तंत्राच्या सहाय्याने तुम्ही मिरची,वांगी, कोबी, काकडी, मिरची, सिमला मिरची तसेच बटाटे, कोथिंबीर, पालक, गाजर त्यानंतर इतर अनेक प्रकारचे फळांचे रोपवाटिका तयार करता येते.

नक्की वाचा:Vidhrbha Farmer:आता शेतकरी करतील मातीच्या गुणधर्मानुसार पीक लागवड, होईल उत्पादन खर्चात बचत, वाचा सविस्तर

English Summary: pro tray technology is so benificial for create vegetable nursury
Published on: 26 July 2022, 01:20 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)