शेतीमध्ये आता वेगवेगळ्या पद्धतीचे बदल होत असून शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणावर होऊ लागला आहे. खूप वेगवेगळ्या प्रकारचे तंत्रज्ञान शेतीमध्ये येऊ घातले आहे. आपल्याला माहित आहेच की शेतीमध्ये उत्पादन वाढावे यासाठी आणि शेतीचे उत्पादन वाढावे यासाठी सुपर कम्प्युटर, स्मार्ट डिव्हाइसेस इत्यादी तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे.
आपण शेतामध्ये विविध प्रकारच्या निविष्ठा वापरतो. त्यांचा वापर हा योग्य प्रमाणात होत आहे की नाही केवळ त्या ठिकाणी व्हायचा त्या ठिकाणी वापर करून शेतीचे उत्पादन वाढवणे आणि कीटकनाशके व खते इत्यादी निविष्ठांचा शास्त्रशुद्ध पद्धतीने वापर करून शेतीमध्ये पिकांचे उत्पादन व एकंदरीत उत्पादकता वाढवणे म्हणजेच प्रिसिजन फार्मिंग होय.
जाणून घेऊ काय आहे नेमकी ही संकल्पना?
या संकल्पनेमध्ये आपल्या भोवतालच्या निसर्गावर कुठल्याही प्रकारचे अतिक्रमण किंवा निसर्गाला नुकसान होईल अशी कुठलीही गोष्ट न करता आपल्या जवळ उपलब्ध जी काही साधन सामग्री आहे त्या साधनसामग्रीचा अगदी नियोजनबद्ध पद्धतीने आणि काटेकोरपणे वापर करून मानवाच्या गरजा कशा पूर्ण करता येतील या तत्त्वावर ही संकल्पना आधारलेली आहे.
आता भारतामध्ये सीमांत शेतकऱ्यांची संख्या खूप जास्त प्रमाणात आहे. अशा छोट्या शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील उत्पन्न हे शाश्वत पद्धतीने मिळवण्यासाठी प्रिसिजन फार्मिंग महत्त्वाची भूमिका निभावू शकते. कृत्रिम पद्धतीने त्याचा वापर करून उत्पादन खर्च कमी होऊन शेती उत्पादनामध्ये शाश्वतता आणणे हे प्रमुख उद्देश प्रिसिजन फार्मिंग चे आहेत.
नक्की वाचा:यूरासील म्हणजे काय? आणि त्याच्या वापराने काय होते?
प्रिसिजन फार्मची साधने
1- सेंसर टेक्नॉलॉजी- इलेक्ट्रोमॅग्नेटिक, कण्डक्टिविटी, अल्ट्रासाउंड, फोटो इलेक्ट्रिसिटी इत्यादी वर आधारित तंत्रज्ञानाच्या मदतीने हवेचा वेग, हवेतील बाष्पाचे प्रमाण, हवेतील आद्रताआणि तापमान तसेच वनस्पतींची होणारी शाकीय वाढ इत्यादी समजण्यास मदत होते.
तसेच यामध्ये सुदूर संवेदन तंत्रज्ञानाचा वापर करून पिकाच्या जाती, पिकांमध्ये निर्माण झालेला ताण तसेच पिकांवरील कीड व त्या किडींची ओळख, दुष्काळसदृश्य परिस्थितीत नियोजन, जमीन तसेच पिकांची परिस्थिती समजून घेण्यास या तंत्रज्ञानाने मदत होते.
सेंसर टेक्नॉलॉजी च्या मदतीने प्रचंड प्रमाणात डाटा अनालिसिस सह उपलब्ध होतो.या सगळ्या घटकांचा अभ्यास करून शेतकऱ्यांना पीक नियोजन करणे सोपे होते.
2- जीपीएस सिस्टिम- जीपीएसचा वापर करून शेताची स्थाननिश्चिती,अक्षांश रेखांश असल्या बद्दल माहिती मिळण्यास मदत होते.
जमिनीचा प्रकार, किडींचचा होणारा प्रादुर्भाव, तनाचे वाढते प्रमाण इत्यादी माहितीचे पृथक्करण स्थाननिश्चिती सोबत जीपीएसच्या मदतीने केले जाते.
नक्की वाचा:इको-पेस्ट ट्रॅप लावा आणि करा पिकांचे कीटकांपासून रक्षण,फवारणीची नाही गरज
3- ग्रीड सोईल सॅम्पल आणि व्हेरिएबल रेट टेक्नॉलॉजी- शेताचा आकार जर खूप मोठ्या प्रमाणात विस्तीर्ण असेल तर संपूर्ण गावांमधील ग्रीड अशा पद्धतीने माती नमुने काढून त्यांचे परीक्षण अहवाल कम्प्युटरच्या मदतीने जीआयएस नकाशात नोंदवले जातात.
संगणक जीआयएस नकाशे यांच्या वापराने शेतीमधील निविष्ठा वापराचे प्रमाण नियंत्रित केले जाते. त्यासाठी जीपीएस यंत्रणा उपयोगात आणले जाते.
4- सॉफ्टवेअर-प्रिसिजन फार्मिंग करताना शेतीमधील विविध प्रकारची कामे पूर्ण करण्यासाठी सॉफ्टवेअरचा वापर करावा लागतो.
म्हणजेच विविध संस्थांकडून जी काही माहिती येते त्याचे विश्लेषण करणे, जीआयएस आधारित नकाशे तयार करणे व या सर्व प्रक्रियेमधून तयार झालेली माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोचवणे ही सर्व प्रकारची कामे सॉफ्टवेअरच्या माध्यमातून पार पाडली जातात.
5- दर नियंत्रक- पिकांना द्यायची खते, तणनाशके, कीटकनाशके हे स्वयंचलित यंत्रांच्या मार्फत देताना वेगवेगळ्या दर नियंत्रकयंत्राचा वापर केला जातो.
नक्की वाचा:Farming Idea:एकदा लावा गुलाब आणि कमवा दहा वर्ष,गुलाबा पासून बनतात 'ही'उत्पादने
Published on: 11 July 2022, 07:19 IST