शेतकऱ्यांना शेती (agriculture) करताना अनेक अडचणींना व वेदनांना सामोरे जावे लागते. त्यात आपण पाहिले तर काही अळी किंवा किडी अशा असतात ज्या अधिक प्रमाणात शरीराला हानी पोहचवतात. अशा त्रासदायक विषारी अळीविषयी आपण माहिती घेणार आहोत.
ही बातमी शिराळ आणि शेरी येथील आहे. येथील शेतकऱ्यांना उसावरील अळीने अचानक चावा घेतल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. या अळीच्या प्रादुर्भावाने (worm infestation) पिके तर संकटात आहेतच. यासह शेतकऱ्यांना देखील नाहक त्रास सोसावा लागत आहे.
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; वन्य प्राण्यांनी हल्ला केल्यास मिळणार 20 लाख रुपये
तालुक्यातील शिराळ येथील शेतकऱ्यांना शेतात काम करीत असताना त्यांच्या हाताला एक विषारी अळी चावली असल्याने या ठिकाणच्या शेतकऱ्यांना तीव्र स्वरूपाच्या वेदना, खाज आली. दोन्ही रुग्णांवर शिराळ येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले.
विशेष म्हणजे विंचू चावल्यावर जो वैद्यकीय उपचार (Medical treatment) करतात तशाच प्रकारची उपचार पद्धती या शेतकऱ्यांना वापरण्यात आली, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ सुजित लहाने यांनी दिली.
शेतकऱ्यांचे अच्छे दिन; सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात तुरीचे दर वाढणार 3 हजार रुपयांनी
बंदोबस्त असा करा
ही अळी विशेषता उस पिकावर दिसून येते आहे. कृषी तज्ञांच्या मते (According to agricultural experts) या अळीचा माणसांच्या शरीरावर संपर्क आल्यास आग होणे, खाज येणे असा प्रकार होऊ शकतो. पिकांवर जास्त प्रमाण आढळून आल्यास डायक्लोरोवोस या कीटकनाशकाची 20 मिली प्रति पंप या प्रमाणे फवारणी करा.
महत्वाच्या बातम्या
पोस्ट ऑफिसच्या योजनेतील गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; सरकार व्याजदरात करणार मोठी वाढ
गणपतीत 'या' लोकांचे सोनेरी दिवस सुरू होणार; कारण बाप्पाची असते विशेष कृपा
ढगाळ हवामानामुळे पिकांवर रोगराई वाढण्याची शक्यता; असे करा नियंत्रण
Published on: 31 August 2022, 10:36 IST