Agripedia

कांदा बीजोत्पादनासाठी एकात्मिक परागीभवन कांदा पिकात परागीभवन होऊन बीजधारणा होते. बीजोत्पादनात पराग वाहक म्हणून मधमाश्यांची भूमिका महत्वाची असते. परागीकरण चांगले होण्याकरिता व्यवस्थापनामध्ये आवश्यक बदल करणे गरजेचे आहे. फुलकिडींच्या व्यवस्थापनासाठी शिफारशीत कीटकनाशकांचा वापर पीक फुलोऱ्यात येण्यापूर्वीच करावा.

Updated on 02 February, 2023 10:47 AM IST

कांदा बीजोत्पादनासाठी एकात्मिक परागीभवन कांदा पिकात परागीभवन होऊन बीजधारणा होते. बीजोत्पादनात पराग वाहक म्हणून मधमाश्यांची भूमिका महत्वाची असते. परागीकरण चांगले होण्याकरिता व्यवस्थापनामध्ये आवश्यक बदल करणे गरजेचे आहे. फुलकिडींच्या व्यवस्थापनासाठी शिफारशीत कीटकनाशकांचा वापर पीक फुलोऱ्यात येण्यापूर्वीच करावा.

फवारणी शक्यतो सायंकाळी करावी. मधमाश्यांना आकर्षित करण्यासाठी मोहरी, बडीशेप, कोथिंबीर यांसारखी पिके बीजोत्पादन क्षेत्राच्या सभोवती लावावीत. कांदा पीक फुलोऱ्यात येण्यापूर्वी त्यांची कापणी करावी. जमिनीत अतिरिक्त ओलावा किंवा अधिक कोरडेपणा असल्यास मधमाश्या येण्याचे प्रमाण कमी होऊ शकते.

यासाठी जमिनीच्या मगदुरानुसार १० ते १२ दिवसांच्या अंतराने पुरेसे पाणी द्यावे. शेतामध्ये फुलोऱ्यात असणारी सर्व तणे काढून टाकावीत. चांगल्या परागीभवनासाठी १० टक्के फुले उमलल्यानंतर, शेतात मधमाश्यांच्या पेट्या (एपिस मेलीफेरा/ एपिस सेराना जातीच्या ४ ते ६ पेट्या किंवा टेट्रागोनुला स्पे. ८ ते १२ पेट्या प्रति एकर) ठेवाव्यात. शेतात आणि सभोवतालच्या क्षेत्रात मधमाशी पेटीचे तोंड शेताच्या आतील दिशेने ठेवावे.

केळीच्या दरात तेजी, शेतकऱ्यांना दिलासा..

कांद्यांमध्ये हंगाम (Onion) आणि रंगानुसार अनेक जाती आहेत. कांदा व लसूण संशोधन संचालनालयाने भीमा डार्क रेड, भीमा रेड, भीमा राज, भीमा सुपर, भीमा शक्ती, भीमा किरण, भीमा लाईट रेड, भीमा शुभ्रा, भीमा श्‍वेता आणि भीमा सफेद अशा दहा जाती विकसित केल्या आहेत.

Budget 2023 Agriculture : पशुसंवर्धन, दुगधव्यवसाय आणि मत्स्यपालनासाठी अर्थसंकल्पात २० लाख कोटींची तरतुद

बीजोत्पादनासाठी (Onion Seed Production) उत्तम प्रतीच्या कांद्यांची निवड करणे आवश्यक असते. अनेकदा चांगले कांदे बाजारात विकले जातात आणि खराब कांदे बीजोत्पादनासाठी वापरले जातात. त्यामुळे कांद्याच्या नवीन पिढीमध्ये अनेक वैगुण्ये वाढतात. चांगला वाण टिकवून ठेवणे, सुधारणा करण्याच्या दृष्टीने बियाण्यासाठी चांगल्या कंदाची लागवड करावी.

महत्वाच्या बातम्या;
टोमॅटो लागवड तंत्र
शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होणार होते, त्याचे काय झाले? अर्थसंकल्पावर शेतकरी नेते राजू शेट्टी यांची टीका
अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांना केवळ स्वप्न दाखवले? अर्थसंकल्पात भरीव काहीही नाही..

English Summary: Onion seed production management by farmers
Published on: 02 February 2023, 10:47 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)