गेल्या काही दिवसांपासून कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. याचे कारण म्हणजे कांद्याला सध्या कवडीमोलाचा बाजार मिळत आहे. तसेच पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचा कांदा खराब झाला आहे. असे असतानाही खरीप हंगामात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड केली आहे.
यामुळे आता या नवीन कांद्याला तरी बाजार मिळणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. फक्त जळगावच्या खानदेशात सुमारे १३ हजार हेक्टरवर कांद्याची लागवड झाली आहे. यामुळे हा कांदा बाजारात आल्यावर अजूनच दर कोसळतील असे म्हटले जात आहे.
येणाऱ्या सणासुदीत भावात सुधारणा होण्याची आशा असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. राज्यातील कांदा हे नगदी पीक असून, त्याचे भाव रातोरात बदलतात, यामुळे आता कांद्याचे दर कधी बदलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कांद्याचे भाव घसरल्याने महाराष्ट्रातील सुमारे १५ लाख शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
Lumpy Diseases: लम्पी रोगावर स्वदेशी लस विकसीत, पंतप्रधान नरेंद्र मोदींची घोषणा..
शेतकरी जितका धोका पत्करतो तितका क्वचितच कोणी घेतो घेत असेल. कांद्याचा दर एक रुपये किलोवर असतानाही पुढच्या पिकाची लावणी मोठ्या धोक्यापेक्षा कमी नाही. मात्र शेतकऱ्यांना पर्याय नसल्याने कष्ट तर करावेच लागत आहे.
अनेक शेतकऱ्यांनी कांदा लागवड कमी केली, पण थांबलेली नाही. यावर्षी कांदा लागवड महाग झाल्याचे कांदा उत्पादकांचे म्हणणे आहे. कारण यावर्षी बियाणांचे भाव 1000, 1200 ते 2000 रुपये प्रतिकिलो होते. महागडे बियाणे आणि लागवडीचा खर्च वाढला आहे.
यातच औषधे देखील महागली आहेत. यातच सध्या सरासरी 1 ते 8 रुपये किलोपर्यंतच भाव मिळत आहे. यामुळे शेती परवडत नाही. नाशिक, सोलापूर, धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यातील खान्देश कांदा लागवडीसाठी प्रसिद्ध आहेत.
लम्पीरोग झालेल्या गाई म्हशींचे दूध प्यावे का? दुधाबाबतच्या अफवेला आलाय ऊत...
याबाबत महाराष्ट्र कांदा उत्पादक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भरत दिघोळे म्हणाले, सरकारने स्वत: शास्त्रोक्त पद्धतीने कांदा उत्पादनासाठी किलोमागे किती खर्च येतो हे पाहावे. त्यानंतर इतर पिकांप्रमाणे त्यावर ५० टक्के नफा निश्चित करून किमान आधारभूत किंमत निश्चित करा.
त्यापेक्षा कमी दराने खरेदी करणे थांबवा. तरच कांदा उत्पादक शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारेल. भाव वाढण्याच्या आशेने शेतकऱ्यांनी खरीप हंगामात कांद्याच्या लागवडीवर भर दिला आहे. यामुळे कांद्याचे भाव कधी वाढणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या;
'काटामारीतून कारखानदार टाकतात ४५८१ कोटींचा दरोडा'
लम्पी रोगानंतर शेतातही आला चायनीज व्हायरस, शेतकऱ्यांनी पिके केली नष्ट
साखरेची किमान विक्री किंमत 3100 वरून 3600 रुपये प्रति क्विंटल करण्याची मागणी, कारखान्यांना अतिरिक्त बँक कर्ज मिळेल..
Published on: 13 September 2022, 04:06 IST