शेवगा पिकाचा विचार केला तर कमीत कमी वेळेत आणि कमी खर्चात जास्त उत्पादन देणारे पीक म्हणून त्याला ओळखले जाते. जर सध्या महाराष्ट्रातील किंवा भारतातील शेवगा शेतीचा विचार केला तर त्याचा व्यापारी दृष्टिकोनातून केली जात आहे व कमालीची यशस्वी देखील झाली आहे. शेवगा लागवडीचे दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर या मधील शेवग्याच्या जातींना खूप महत्त्व आहे.
चांगल्या उत्पादनक्षम जातींची लागवड केली तर शेवगा उत्पादनातून नक्कीच जास्त उत्पादन व त्या माध्यमातून आर्थिक उत्पन्न चांगले मिळते. त्यामुळे या लेखात आपण शेवग्याच्या महत्त्वपूर्ण दोन जातींची माहिती घेणार आहोत.
1- ओडिसी शेवग्याची एक महत्त्वपूर्ण जात- शेवग्याच्या या जातीचे सगळ्यात महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या जातीला वर्षातून दोनदा बहार येतो. तसेच लागवड केल्यानंतर अवघ्या चार ते पाच महिन्यांमध्ये फुले येतात. ओडिसी जातीला दीड ते दोन फूट लांबीच्या शेंगा अगदी घोसामध्ये लागतात.
या जातीच्या शेंगांमध्ये गराचे प्रमाण जास्त असून चवीला अतिशय उत्कृष्ट लागतात. ओडिसी जातीच्या शेंगा या देशांतर्गत व इतर देशांना निर्यात करण्यासाठी देखील खूप चांगले असून त्यांना त्या दृष्टिकोनातून मागणी आहे.
ओडिसी जातीच्या पूर्ण वाढ झालेल्या शेवग्याच्या झाडापासून सरासरी 25 ते 30 किलोपर्यंत शेंगांचे उत्पादन मिळते. त्यासोबतच काढणी केल्यानंतर या जातीच्या शेंगांचे टिकवणक्षमता चांगले असल्यामुळे बाजारात देखील दमदार भाव मिळतो.
2- शेवग्याची महत्त्वपूर्ण जात पी.के.एम 1( कोईमतूर 1) शेवग्याची ही जात तामिळनाडू कृषी विद्यापीठाच्या पेरिया कुलम फळबाग संशोधन केंद्राने विकसित केले आहे. खायला अतिशय चवदार वाण असून लागवडीनंतर सहा महिन्यात शेंगांचे उत्पादन सुरू होते. जर आपण महाराष्ट्राचा विचार केला तर आपल्याकडील वातावरणात एका वर्षात दोन वेळा शेंगांचे उत्पादन मिळते.
शेंगा वजनाला चांगले असतात व चविष्ट देखील असतात. दोन्ही हंगामांत विचार केला तर 650 च्या पुढे शेंगांचे उत्पादन ओलित क्षेत्रात मिळते.
नक्की वाचा:Gram cultivation: हरभरा पेरणीपूर्वी करा या पद्धतीचा अवलंब; उत्पादन होईल दुप्पट
Published on: 26 October 2022, 06:49 IST