Agripedia

शेतकरी आपल्या शेतीमध्ये नवनवीन खतांचा वापर करीत असतात. ज्यामधून शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळते. मात्र पिकांची प्रतिकारक क्षमता वाढविण्यासाठी गांडूळ खत उपयुक्त मानला जातो. या खताच्या वापराने शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळते.

Updated on 29 October, 2022 11:35 AM IST

शेतकरी आपल्या शेतीमध्ये (agriculture) नवनवीन खतांचा वापर करीत असतात. ज्यामधून शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळते. मात्र पिकांची प्रतिकारक क्षमता वाढविण्यासाठी गांडूळ खत उपयुक्त मानला जातो. या खताच्या वापराने शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळते.

गांडूळांच्या ३०० हून अधिक जाती असल्या तरी प्रामुख्याने ईसिना फोडटीडा युड्रीलस युजेनिया, पेरीनोक्सी, एक्झोव्हेटस, फेरीटीमा इलोंगेटा या गांडूळांच्या महत्वाच्या आणि योग्य जाती आहेत. या जातीची वाढ चांगली होऊन खत तयार करण्याची प्रकिया ४० ते ४५ दिवसात पूर्ण होते.

गांडूळ खाताचे हे आहेत फायदे

गांडूळ खतामुळे जमिनीचा पोत सुधारतो. गांडुळाच्या बिळांमुळे झाडाच्या मुळांना इजा न होता उत्तम मशागत केली जाते. जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. जमिनीची धूप कमी होते. बाष्पीभवनाचे प्रमाण (Evaporation rate) कमी होते. गांडूळ खालच्या थरातील माती वर आणतात व तिला उत्तम प्रतीची बनवतात.

गांडुळखतामध्ये ह्युमसचे प्रमाण भरपूर असल्यामूळे नत्र, स्फुरद, पालाश व इतर सुक्ष्मट्रव्य झाडांना भरपूर व लगेच उपलब्ध होतात. जमिनीतील उपयुक्त जिवाणूंचा संख्येत भरमसाठ वाढ होते. मातीचा कस टिकून राहतो, मातीमधील सूक्ष्मजीव टिकून राहतात, जमिन सुपीक राहते.

गांडूळखत ढीग आणि खड्डा या दोन्ही पद्धतींनी तयार करता येते. मात्र दोन्ही पद्धतींमध्ये कृत्रिम सावलीची गरज आहे. सूर्यप्रकाश व पावसापासून त्यांचे संरक्षण करण्यासाठी छपराचे शेड तयार करा.

सर्वसामान्यांसाठी महत्वाची बातमी! फक्त 35 हजारांची इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च; वाचा वैशिष्ट्ये...

खड्डा पद्धत

छपराच्या अथवा झाडांच्या दाट सावलीत खड्डे तयार करावेत. या पद्धती मध्ये सिमेंटच्या खड्ड्यांची लांबी ३ मीटर, रुंदी २ मीटर आणि खोली ६० सें. मी. ठेवा. खड्ड्यांच्या तळाशी नारळाचा काथ्या, गवत, भाताचे तूस, गव्हाचा कोंडा ३ ते ५ सें. मी. जाडीचा अर्धवट कुजलेल्या शेणाचा, कंपोस्ट खताचा अथवा बागेतील चाळलेल्या मातीचा थर द्या.

दोन्ही थर पाण्याने पूर्ण ओले करून त्यावर साधारणतः १०० कि. ग्रॅम सेंद्रिय पदार्थापासून (organic matter) गांडूळ खत तयार करण्यासाठी ७००० प्रौढ गांडुळे सोडवीत. त्यावर अर्धवट कुजलेल्या सेंद्रिय पदार्थांचा जास्तीत-जास्त ५० सें.मी. जाडीचा थर रचावा. त्यावर गोणपाटाचे आच्छादन देऊन नेहमी ते ओले ठेवावे. गांडुळांच्या वाढीसाठी खड्ड्यातील सेंद्रिय पदार्थांमध्ये हवा खेळती राहणे आवश्यक आहे.

शेतकऱ्यांसाठी सागवानची शेती ठरेल फायदेशीर; काही वर्षातच शेतकरी होतील करोडपती

ढीग पद्धत

साधारणतः २.५ ते ३.० मी. लांबीचे आणि ९० सें.मी. रूंदीचे ढीग तयार करावेत. प्रथम जमीन पाणी टाकून ओली करून घ्या. ढिगाच्या तळाशी नारळाचा काथ्या, गवत, भाताचे तूस यासारख्या लवकर न कुजणार्‍या पदार्थांचा ३ ते ५ सें. मी. जाडीचा थर रचावा, त्यावर पुरेशे पाणी शिंपडून ओला करावा. या थरावर ३ ते ५ सें. मी. जाडीचा अर्धवट कुजलेल्या शेणाचा, कंपोस्टचा अथवा बागेतील चाळलेल्या मातीचा थर द्या.

या थरावर पूर्ण वाढलेली गांडुळे सोडा. दुसर्‍या थरावर पिकांचे अवशेष, जनावरांचे मलमूत्र, धान्याचा कोंडा, शेतातील तण, गिरीपुष्प शेवरी या द्विदल हिरवळीच्या झाडांची पाने, मासोळी खत, कोंबड्यांची विष्ठा इत्यादींचा वापर करावा. या सेंद्रिय पदार्थांचे बारीक तुकडे करून आणि अर्धवट कुजलेल्या स्वरूपात वापरले तर अधिक चांगले असते. संपूर्ण ढिगाची उंची ६० पेक्षा अधिक होणार नाही याची दक्षता घ्या.

महत्वाच्या बातम्या 
आनंदाची बातमी! सौर पंप खरेदीवर शेतकऱ्यांना मिळणार 90% अनुदान
कापसाला 12 हजार रुपयांचा हमीभाव द्या; शेतकऱ्यांची मागणी
'या' राशीच्या लोकांच्या मनातल्या इच्छा होणार पूर्ण; जाणून घ्या आजचे राशीभविष्य

English Summary: methods produce vermicompost Cost time saved
Published on: 29 October 2022, 11:30 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)