Agripedia

नमस्कार मंडळी थोडं पण महत्वाचं तुम्हाला आठवत असेल आपले पुर्वज सांगत होते शेणखताने पीक चांगले येतं होते व पिकावर कीड व रोगसुद्धा कमी येत होते पण तो काळ आता बदलला आहे. आपन गुरा-ढोरांची संख्या कमी केली व तसा शेणखताचा वापरसुद्धा कमी व्हायला सुरुवात झाली आणि वडीलधाऱ्यांनी सांगितलेल्या गोष्टीला दुजोरा मिळाला.

Updated on 16 August, 2022 1:27 PM IST

नमस्कार मंडळी थोडं पण महत्वाचं तुम्हाला आठवत असेल आपले पुर्वज सांगत होते शेणखताने पीक चांगले येतं होते व पिकावर कीड व रोगसुद्धा कमी येत होते पण तो काळ आता बदलला आहे. आपन गुरा-ढोरांची संख्या कमी केली व तसा शेणखताचा वापरसुद्धा कमी व्हायला सुरुवात झाली आणि वडीलधाऱ्यांनी सांगितलेल्या गोष्टीला दुजोरा मिळाला.

आता आपन शेतीमध्ये खर्च वाढवून सुद्धा उत्पादनात मात्र वाढ होईनाशी झाली.असे का बरे झाले असेल ! असे काय होते त्या शेणखतात की त्याची पुनरावृत्ती करावे असे वाटू लागले आहे !याचे उत्तर शोधायचा प्रयत्न मात्र शेतकऱ्यांनी केला नाही, हे लक्षात येते.

नक्की वाचा:सुमिलचे 'ब्लॅकबेल्ट' करेल भात आणि इतर पिकांचे किडींपासून संरक्षण आणि होईल उत्पादनात वाढ, शेतकऱ्यांना होईल फायदा

शेणखत असो, कंपोस्ट खत असो, यामध्ये पिकाला लागणाऱ्या १६-१७ अन्नद्रव्यांसोबतच अन्नद्रव्ये उपलब्ध करून देणारे रोगप्रतिकारकशक्ती वाढविणारे अर्थातच जमिनीची उपजाऊ शक्ती वाढविणारे जिवाणू असतात.

परंतु पिकाला आवश्यक असणाऱ्या अन्नद्रव्यांची मात्रा आपल्याकडे आता तरी उपलब्ध असलेल्या शेणखता मधून आपण पूर्ण करू शकत नाही.परंतु याला पर्याय तर शोधावाच लागेल ना.

याला पर्याय म्हणजे बाजारात उपलब्ध असलेल्या जिवाणू खताचा योग्य प्रकारे वापर! मग ही जिवाणू खते आहेत तरी काय?निर्सगाच्या शक्तीला कमी लेखू नका!

निसर्गाने सर्व अडचणींवर उपाययोजना करून ठेवलेलीच आहे.काहि गोष्टी अजुन ही आपल्याला माहीत नाही.नवनविन तंत्रज्ञान विकसित झाले आहे.

त्याच आधारे बी.टी. तंत्रज्ञानाने नैसर्गिकरीत्या अळीवर नियंत्रण मिळविले गेले. परिणामी, कीटकनाशकाचा एकरी हजारो रुपयांचा खर्च वाचवून आपले होणारे नुकसान तर टळलेच.

नक्की वाचा:Chilli Crop Management:'या' रोगाचे नियंत्रण कराल तरच मिळेल मिरचीपासून भरघोस उत्पादन, वाचा त्याबद्दल सविस्तर माहिती

शिवाय उत्पादनात मोठ्या प्रमाणात भर पडली. हा झाला कीटकनाशकाचा भाग!यासोबतच आपल्या शेती व्यवसायात रासायनिक खतांचा वापर-गैरवापर, नुकसान-फायदे, वारेमाप वाढलेल्या किमती हा एक  प्रश्न निर्माण झाला;

परंतु वर सांगितल्याप्रमाणे प्रत्येक अडचणीवर निसर्गाने निसर्गतःच उपाययोजना करून ठेवल्यात. गरज आहे त्या शोधण्याची, आत्मसात करण्याची! रासायनिक खतांचा वापर आपणास कमी करता येईल. आपल्या शेती व्यवसायात उत्पादनाच्या २५% खर्च रासायनिक खतावर होत असावा.

गैरवापर, अतिरेकी वापर यामुळे आपला उत्पादन खर्च तर वाढतो आहेच. शिवाय जमिनीचा कस दिवसेंदिवस खालावत आहे. बाबी ज्यामुळे यावर उपाययोजना शोधणे आज काळाची गरज झाली आहे.....

 धन्यवाद

विचारांची दीशा बदला जिवनाची दशा आपोआप बदलेल

 the soil all together

मिलिंद जि गोदे

milindgode111@gmail.com

Agriculture development and technology  (social media )

नक्की वाचा:Bamboo Cultivation: दुष्काळात देखील शेतकऱ्यांना बांबू पीक देते भक्कम आर्थिक आधार, वाचा उत्पन्नाचे स्वरूप

English Summary: manure and farming is related to each other and do effect on more crop production
Published on: 13 August 2022, 07:45 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)