उन्हाळ्यात दुभत्या म्हशींचे व्यवस्थापन हे करणे खूप गरजेचे असते. उष्णतेचा जनावरांना खूप त्रास होता. उष्णतामानातील वाढ होते तेव्हा ते नियंत्रित ठेवण्यासाठी गाईंना घामावाटे पाणी शरीरातून कमी होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गाई पाणी पितात.
म्हशींच्या बाबतीत कातडी जाड व घट्ट असते व घाम कातडीमधून बाहेर जात नाही. शरिरातील वाढलेले तापमान नियंत्रित करण्यासाठी पिण्याचे पाणी जास्त प्रमाणात लागते. शिवाय म्हशींना धुण्यासाठी व गोठा थंड ठेवण्यासाठी थंड पाण्याचे शॉवरचा किंवा म्हशी पोहण्यासाठी पाण्याचा हौद, टँकची सोय करणे उपयोगी ठरते.
आहारामध्ये हिरवा चारा जास्त प्रमाणात द्यावा. गोठ्याचे छतावर, झाडाच्या हिरव्या फांद्या टाकाव्यात. गोठ्यात म्हशींना जास्त मोकळी जागा उपलब्ध करावी. शक्यतो दुपारच्या वेळी झाडाच्या सावलीत ठेवावे. इतर पाळीव प्राण्यांपेक्षा म्हशींना पाण्याची गरज जास्त असते. सरासरी १०० ते १५० लीटर पाण्याची प्रतिदिनी गरज पाणी पिण्यासाठी लागते. तर सरासरी २०० ते २५० लिटर म्हशी व गोठे धुण्यासाठी लागते.
अजितदादा तुम्ही शेतकरी, तुम्हाला शेतीतील चांगले कळते : उद्धव ठाकरे
म्हशीचे विविध जातीमध्ये स्वयंरोजगार - म्हैसपालन व्यवसाय उन्हाळ्यातील तापमानानुसार ते नियंत्रित करण्यासाठी पिण्याचे पाणी व वापरण्याचे पाण्याची गरज लागेल. म्हशींना उन्हाळ्यात रोज थंड पाण्याने आंघोळ घालणे फायदेशीर ठरते.
ठरलं तर! पीएम किसान योजनेचा 11 वा हप्ता 'या' तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार
दुभत्या जनावरांमध्ये सर्वसाधारणपणे १ लिटर दूध तयार करण्यासाठी ४ लिटर पाण्याची गरज असते. एक किलो शुष्क आहार ( चारा ) पचविण्यासाठी ४ लिटर पाणी लागते. याशिवाय शरिरातील खाद्य पचण्याशिवाय इतर शारीरिक किंवा पाण्याची गरज असते. शरीरातील आहाराचे पचन करणे व नको असलेले पदार्थ विष्टेतून शरीराच्या बाहेर टाकण्यात येतात. लघवी वाटे देखील आहारातील काही घटक शरीराच्या बाहेर टाकले जातात.
नवजात वासराचे शरीरात ६५ ते ७० टक्के पाणी असते. प्रौढ जनावरांमध्ये ते ६० टक्के पाणी असते. रवंथ करणाऱ्या जनावराचे पचन संस्थेत ३० टक्के पाणी असते. हिरव्या चाऱ्यांच्या माध्यमातून दुभत्या म्हशींना पाणी मिळते. तथापी जिरायती शेतीमधून हिरव्या चाऱ्याची उपलब्धता कमी असते.
राजू शेट्टींचा शरद पवार आणि नितीन गडकरी यांच्यावर जोरदार घणाघात, म्हणाले...
हिवाळ्यात दुभत्या जनावरांना दिवसातून ३ वेळा पाणी द्यावे लागते. तर उन्हाळ्यात ४ ते ५ वेळा पाणी देण्याची गरज असते. याशिवाय पिण्याचे पाणी शुद्ध असावे कारण उन्हाळ्यात पाण्याची उपलब्धता कमी असते. प्रदुषीत पाण्यामुळे जनावरांमध्ये अनेक रोगांचा प्रसार होत असतो. विविध ठिाकणच्या धार्मिक यात्रा, आठवडी बाजार, साखर कारखान्यासाठी उसाची वाहतूक शेती मालाची वाहतूक यामुळे साथींचे आजार प्रसार होण्याची शक्यता असते.
उष्णतेचा ताण कमी करण्यासाठी
1) प्रथिने जर आहारातून कमी प्रमाणात प्रथिने मिळाली तर दूध उत्पादनावर याचा परिणाम होतो व ते घटते आणि प्रथिनांचे प्रमाण वाढल्यास उर्जेचा अपव्यय जास्त होतो . जास्तीची प्रथिने शरिरातून बाहेर टाकली जातात व जास्त प्रथिनामुळे प्रजनन संस्थेच्या कार्यावर विपरित परिणाम होतो. प्रथिनाची कमी चाऱ्यातून गरज भागविण्यासाठी प्रथिनांचा जास्त वापर काळजीपूर्वक करावा.
2) तंतूमय पदार्थ उष्ण हवामानात जनावराच्या आहारात तंतूमय पदार्थांचा जास्त वापर केल्यास जनावरांच्या शरीरात मोठ्या प्रमाणात उष्णता तयार होते. यामुळे चारा व तंतूमय पदार्थ यांचे योग्य प्रमाण असणे आवश्यक असते.
3) क्षार मिश्रण उन्हाळ्याची सुरवात होताच आहारातील क्षारांचे योग्य प्रमाण राहील याची स्वयंरोजगार काळजी घ्यावी म्हणजे गरजेनुसार त्यांना आहारातून क्षार मिळतील. आहारात क्लोराईडचे प्रमाण जास्त असू नये तसेच क्लोराईड सोबत पोटॅशियमचा वापर करू नये.
4) पिण्याचे पाणी शुद्ध व प्रदुषमुक्त असावे. पाण्याचे नमुने प्रयोग शाळेतन तपासून घ्यावे व तज्ज्ञांचे शिफारशीप्रमाणे पाणी शुद्धीकरणासाठी योग्य औषधी वापरावी.
5) पिण्याचे भांडे हौद इत्यादी वेळोवेळी स्वच्छ करून घ्यावे. पिण्याच्या पाण्यामध्ये बर्फ टाकून थंड पाणी पिण्यासाठी द्यावेयामुळे दुध उत्पादनात निश्चित वाढ हाते.
6) खाद्य देण्याच्या वेळेत अंतर कमी ठेवावे चाऱ्याची प्रत उत्तम असावी. चारा रूचकर असावा चान्यातील पोषणमुल्यांचे संतुलन राखावे. जास्त पोषण मुल्य असलेला चारा द्यावा. पशुखाद्य तयार करताना खाद्यातून जास्तीत जास्त पोषणमुल्य दुध उत्पादनासाठी मिळावी याची दक्षता घ्यावी.
7) स्निग्ध पदार्थ कमी आहारातून जास्त ऊर्जा मिळविण्यासाठी आहारात स्निग्ध पदार्थाचा वापर करावा. जास्तीत जास्त ५ ते ७ टक्के स्निग्ध पदार्थांचा वापर करावा. वनस्पती तेलाचा जास्त वापर करू नये. या काळात तंतूमय पदार्थ व स्निग्ध पदार्थाचा वापर करावा.
8) उर्जा उन्हाळ्यात सर्व पोषण मुल्याबरोबरच खाद्यातील ऊर्जेचे प्रमाण वाढवावे. आहारातील प्रमाण कमी करून खुराकाचे / पशुखाद्याचे प्रमाण पचनिय कर्बोदकाचे प्रमाण ३५ ते ४० टक्क्यांपर्यंत असावे.
डॉ. दिलीप कळमकर
पशुवैद्यकीय अधिकारी,
मांडगवण, ता.श्रीगोंदा. जि. अहमदनगर.
Published on: 03 May 2022, 09:38 IST