Agripedia

शेती म्हटले म्हणजे पक्के नाते येते ते मातीशी. माती ही शेती व्यवसायातील एक प्रमुख भांडवल आहे. माती सुपीक असेलतर शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुपीक होते असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

Updated on 25 March, 2022 3:00 PM IST

 शेती म्हटले म्हणजे पक्के नाते येते ते मातीशी. माती ही शेती व्यवसायातील एक प्रमुख भांडवल आहे. माती सुपीक असेलतर शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुपीक होते असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

वाचून आश्चर्य वाटेल एक इंचाचा  मातीचा थर  नैसर्गिक रीत्या तयार होण्यासाठी तीनशे ते पाचशे वर्षाचा कालावधी जायला लागतो. यावरून एकच गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे ती म्हणजे मातीची सुपीकता टिकवण्यासाठी आणि मातीच्या एक इंचाचा थरकिती आत्मीयतेने आणि प्रयत्नाने जमते महत्वाचे आहे ते.

 मातीमधील घटक आणि उपयुक्त पदार्थ                                     

 जर मातीचा विचार केला तर मातीची एकंदरीत रचना ही 45 टक्के रासायनिक पदार्थ, पाच टक्के सेंद्रिय पदार्थ, 25 टक्के पाणी व 25 टक्के हवा असते. हे जे माती मधील घटक आहेत त्या घटकांचे प्रमाण संतुलित पाणी टिकवून ठेवणे हे शेतीच्या उत्पादन वाढीसाठी खूप महत्त्वाचे आहे.

नक्की वाचा:10 वी उत्तीर्ण आहात आणि भारतीय सैन्य दलात जाण्याची अफाट इच्छा आहे! तर भारतीय सैन्यात आहे नोकरीची सुवर्णसंधी

परंतु आपण याकडे सातत्याने दुर्लक्ष करत गेल्यामुळेनेमके या घटकांचा संतुलन बिघडले व त्याचे परिणाम आपल्याला भोगायला लागत आहे. उदाहरणच द्यायचे झाले तर सेंद्रिय पदार्थ जर कमी झाले तर  सेंद्रिय पदार्थांवर जमिनीतील अनेक उपयुक्त जिवाणू व बुरशी व त्यासोबतच सूक्ष्मजीव यांचे जीवन अवलंबून असते. हे सगळे उपयुक्त जिवाणू, सूक्ष्मजीव जमिनीच्या  सुपीकतेसाठी काम करीत असतात. त्यांचं प्रमाण कमी होते व परिणामी जमिनीची प्रत खालावते.

ही कारणे आहेत जमिनीची सुपीकता कमी करण्यासाठी कारणीभूत

1- जमिनीमध्ये तिचा सामू हा फार महत्त्वाचा असतो. जमिनीचा सामू साहापेक्षा कमी आणि आठ पेक्षा जास्त असणे जमिनीसाठी घातक आहे.

2- सेंद्रिय कर्बाचे प्रमाण खूप कमी होणे.

3-बऱ्याचदा जमिनीमध्ये चुनखडीचे प्रमाण असते.हेच चुनखडीचे प्रमाण दहा टक्‍क्‍यांपेक्षा जास्त असणे हे जमिनीसाठी घातक आहे.

4-जमिनीची जलधारण क्षमता कमी असणे.

5- बऱ्याचदा जमिनी ह्या पाणथळ असतात किंवा फार खोल किंवा उथळ असतात. हेदेखील जमिनीची सुपीकता कमी होण्याचे प्रमुख कारण आहे.

6- तसेच क्षारयुक्त खाऱ्या पाण्याचा सतत वापर आणि भर खतांचा अजिबात किंवा कमीत कमी वापर करणे. निखिल जमिनीचे सुपीकता कमी करण्याचे  महत्त्वाचे कारण आहे.

 जमिनीची सुपीकता या मार्गाने वाढवता येईल

नक्की वाचा:शेळीपालनात महत्वाचे आहे शेळी माजावर येणे; वाचा शेळी माजावर येण्यासाठीचे उपाय

1-पिकांची फेरपालट करताना द्विदल पिकांचा वापर जास्त करावा.

2- भर खतांमध्ये शेणखत, कंपोस्ट खत, गांडूळ खत तसेच लेंडी खत यांचा वापर हेक्‍टरी कमीत कमी पाच टन तरी करावा.

3- हिरवळीच्या पिकांची लागवड करून जमिनीत गाडून या खतांचे प्रमाण वाढवावे.

 4- प्रेसमड, कोंबडी खत तसेच पाचटाचे खत यांचा  मोठ्या प्रमाणात खत म्हणून वापर शक्य असेल तर तो करावा.

5- सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे रासायनिक खत आणि सूक्ष्म अन्नद्रव्ययांचा वापर करताना तो अगदीच समतोलपणे करावा.

6-खारवट, सोपान जमिनी सुधारण्यासाठी भू सुधारकांचा वापर अवश्य करावा.

 जमिनीचे आरोग्य यासाठी खताचा शास्त्रीय पद्धतीने वापर

1- सेंद्रिय खते- जमिनीच्या सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्ब गरजेचे असून सेंद्रिय खतांबरोबर जिवाणू खतांचा वापर आवश्‍यक करावा. शेणखत  वापरताना ते पुर्णपणे कुजलेआहे ना हे पाहावे. नाहीतर जमिनीची बरीचशी ताकत शेणखत कुजवणे मध्ये जाते.आणि ते पिकांना त्वरित उपलब्ध होत नाही.

2- रासायनिक खते- आपण रासायनिक खते वापरतो पण याचा विचार करत नाही की याचे प्रमाण किती असायला हवे?रासायनिक खतांचा वापर करताना नत्रयुक्त खतांचा जास्त वापर करणे टाळावे.

या खतांचा अतिरिक्त वापरामुळे यातील बहुतांश शकत हे पाण्याचा सोबत वाहून जाते व जमिनीत निचरा होते किंवा सूर्याच्या उष्णतेने त्याचे वाक्यात रूपांतर होते. या सगळ्यांचा परिणाम हा जमीन, पाणी आणि हवा प्रदूषणात होतो  व जमिनीत ह्युमस तयार होत नाही.

 हे प्रमाण त्यांची कार्यक्षमता ठरते चांगली ठरवते

1- नत्रयुक्त खते- 30 ते 50 टक्के

2- जस्ट युक्त खते - दोन ते पाच टक्के

3-स्फुरदयुक्त खते - 15 ते 25 टक्के

4- लोह युक्त खते - एक ते दोन टक्के

5- पालाशयुक्त खते - 50 ते 60 टक्के

6- बोरॉनयुक्त खते - एक ते पाच टक्के

English Summary: maintain soil fertility is very crucial for growth crop productionand soil fertility
Published on: 25 March 2022, 02:57 IST