Agripedia

आधुनिक काळात मोहगणी वृक्षाची लागवड शेतकऱ्यांसाठी वरदानच आहे. आजच्या या लेखात आपण जाणून घेणार आहोत मोहगणी शेती बद्दल बरंच काही. मोहगणी हे सदाहरित वृक्ष आहे. या झाडाच्या लाकडाला बाजारात बरीच मागणी आहे.

Updated on 06 May, 2022 6:17 PM IST

शेती व्यवसायातून अन्ना सारखी प्राथमिक गरज भागवली जाते. काळाच्या ओघात आपली जीवनशैली बदलली आणि सोबतच गरजाही वाढल्या. त्यामुळे शेतकरी नाविन्यपूर्ण शेतीकरण्याकडे वाळला आहे. आधुनिक काळासाठी लागणाऱ्या भौतिक सुविधांची जसे की फर्निचर इ. गरजा शेतीतून पूर्ण होत आहेत. अन्न उत्पादनाबरोबर इतर बरेच व्यवसाय शेतीतून करता येतात. फर्निचरसाठी सागवण लाकडाची मागणी मोठी असते. मात्र अशा पद्धतीसाठी मोहगणी लाकडाचासुद्धा वापर मोठ्या प्रमाणात केला जातोय.

आधुनिक काळात मोहगणी वृक्षाची लागवड शेतकऱ्यांसाठी वरदानच आहे. आजच्या या लेखात आपण जाणून घेणार आहोत मोहगणी शेती बद्दल बरंच काही. मोहगणी हे सदाहरित वृक्ष आहे. या झाडाच्या लाकडाला बाजारात बरीच मागणी आहे. कृषी तज्ञानच्या मते, शेतकऱ्यांनी मोहगणी वृक्षाची लागवड केली तर त्यांना हेक्टरी 50 लाखांचा उत्पादन मिळवून देऊ शकते. मोहगुणी झाडाच्या लाकडाचा प्रामुख्याने जहाज बांधण्यासाठी उपयोग केला जातो. बंदुकीचे दस्ते, संगीत क्षेत्रातील वाद्य साहित्य,फर्निचर,

कागद, नक्षीदार तावदान, आतील ट्रिम यासाठी मोहगणी च्या झाडाच्या लाकडाचा वापर केला जातो. लाकडातील टणकपण आणि लालसर रंग या गुणवैशिष्ट्यांमुळे त्याचा वापर फर्निचरसाठी उत्तम मानला जातो. शिवाय या वृक्षाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे याचे लाकूड पाण्याने खराब देखील होत नाही. त्यामुळे हे झाड टिकाऊ समजले जाते.  या लाकडाचा उपयोग हा दागिने,सजावट, फ्लायवूड आणि मुर्त्या बनविण्यासाठी याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. या झाडाची फळे,पाने,आणि सालींचा वापर तसेच फांद्यांचे अर्क हे औषधी आहेत.

औषधी गुणधर्म असल्यामुळे याचा वापर कर्करोग, मलेरिया, रक्तक्षय, अतिसार आणि मधुमेह या रोगांवरील औषधांसाठी वैद्यकीय क्षेत्रात मोठया प्रमाणात उपयोग केला जातो.  तसेच त्याच्या सालातून डिंकही मिळतो. हे झाड जवळपास 200 फूट उंचीपर्यंत वाढते. त्यामुळे या झाडाच्या लाकडाला बाजारात चांगला भाव मिळतो. ही वृक्ष लागवड केल्यानंतर शेतकऱ्यांना १२ ते १३ वर्षे याची चांगली जोपासना करावी लागणार.

ऐ हुई ना बात ! पदाने IAS अधिकारी असताना देखील करतात शेती; कारण...

या वृक्षाची लागवड ही जिथे जोरदार वाऱ्याचा धोका कमी असतो अशाच जागेवर करावी. या वृक्षाची लागवड करत असताना तुम्ही 3 ते 4 वर्ष आंतरिक पीक घेऊ शकता. तसेच ज्या जमिनीत पाण्याचा निचरा होतो अशा जमिनीत वृक्ष लागवड करणे फायद्याचे ठरते. शेतकरी बंधू शेती व्यवसायबरोबर वृक्ष लागवडीचा व्यवसाय देखील करत असतो. मोहगणी वृक्ष लागवडीतून जवळजवळ 12 ते 13 वर्षांनंतर शेतकऱ्यांना चांगलाच नफा मिळतो. जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या वृक्षापैकी महोगणी हे एक आहे.

महत्वाच्या बातम्या:
अजितदादा तुम्ही शेतकरी, तुम्हाला शेतीतील चांगले कळते : उद्धव ठाकरे
ठरलं तर! पीएम किसान योजनेचा 11 वा हप्ता 'या' तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार

English Summary: Mahogany farming: Farmer brothers, do mahogany farming and get lakhs of profit
Published on: 02 May 2022, 05:11 IST