Agripedia

गुजरातमध्ये लम्पी स्किन डिसीज (Lumpy Skin Disease) मुळे तब्बल 1,431 गुरे मरण पावली आहेत. हा आजार राज्यातील 20 जिल्ह्यांमध्ये पसरला असल्याचे राज्य सरकारचे सांगितले आहे.

Updated on 02 August, 2022 4:40 PM IST

गुजरातमध्ये लम्पी स्किन डिसीज (Lumpy Skin Disease) मुळे तब्बल 1,431 गुरे मरण पावली आहेत. हा आजार राज्यातील 20 जिल्ह्यांमध्ये पसरला असल्याचे राज्य सरकारचे सांगितले आहे.

सरकारने 8.17 लाख गुरांना लसीकरण केले आहे. रोगाचा सामना करण्यासाठी एक टास्क फोर्स तयार केला असून बाधित जिल्ह्यांमध्ये गुरांच्या हालचालीवर निर्बंध लादले आहेत.

हे ही वाचा 
Ration Card Holders: रेशन कार्ड धारकांना मोठा धक्का; मोफत धान्य सुविधा बंद होणार

कच्छ, जामनगर, देवभूमी द्वारका, राजकोट, पोरबंदर, मोरबी, सुरेंद्रनगर, अमरेली, भावनगर, बोताड, जुनागढ, गीर सोमनाथ, बनासकांठा, सुरत, पाटण, अरवळ यासह 20 जिल्ह्यांतील 1935 गावांतील 54,161 गुरांमध्ये एलएसडीची (Lumpy Skin Disease)नोंद झाली आहे.

हे ही वाचा 
Crop Production: 'या' पाच पिकांच्या शेतीमधून शेतकरी कमवतोय लाखों रुपये; जाणून घ्या 'या' पिकांविषयी...

या 54,161 गुरांवर उपचार करण्यात आल्याची माहिती राज्याचे कृषिमंत्री (Agriculture Minister) राघव पटेल यांनी दिली. यामुळे सरकारने बाधित 14 जिल्ह्यांमध्ये निर्बंध लादले आहेत. यासाठी २६ जुलै रोजी औपचारिक अधिसूचना जारी केली आहे.

या आजारामुळे पशूपालकांना (animal husbandry) जनावरांची काळजी घेण्यासाठी सूचना देखील दिल्या आहेत. जनावरे आजारी जाणवल्यास त्वरित उपचार करणे गरजेचे आहे. तसेच आजाराबद्दल शंका वाटल्यास जनावरांना वेगवगेळे मोकळ्या जागेत बांधा.

महत्वाच्या बातम्या 
Eknath Shinde: एक जिल्हा एक उत्पादनासाठी नियोजन सुरू; मुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश, जाणून घ्या
Money Transfer: चुकून दुसरीकडे पैसे ट्रान्सफर झाले तर त्वरित करा 'ही' प्रोसेस; पैसे जमा होतील खात्यात
Fertilizers: शेतकरी मित्रांनो पिकांना खत देताना 'या' गोष्टींकडे लक्ष द्या; होईल फायदाच फायदा

English Summary: Lumpy Skin Disease virus spread 20 districts 1 thousand 400 cattle died
Published on: 02 August 2022, 04:27 IST