Agripedia

शेतकरी आपल्या शेतीमध्ये नवनवीन पिके घेऊन चांगले उत्पादन घेत असतात. मात्र पिकांच्या कापणीवेळी शेतकऱ्यांना भरपूर कष्ट घ्यावे लागतात. खरीप हंगामातील मुख्य पीक भात पीक आहे. त्यामुळे आज आपण भात पिकाच्या कापणीच्या मशीनबद्दल माहिती जाणून घेऊया.

Updated on 02 October, 2022 11:48 AM IST

शेतकरी आपल्या शेतीमध्ये नवनवीन पिके घेऊन चांगले उत्पादन घेत असतात. मात्र पिकांच्या कापणीवेळी शेतकऱ्यांना (farmers) भरपूर कष्ट घ्यावे लागतात. खरीप हंगामातील मुख्य पीक भात पीक आहे. त्यामुळे आज आपण भात पिकाच्या कापणीच्या मशीनबद्दल माहिती जाणून घेऊया.

भात पिकाच्या मशीनबद्दल सांगायचे झाले तर या मशीनमुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि श्रम दोन्ही वाचणार आहे. कंबाइंड हार्वेस्टर मशीनबद्दल बोलत आहोत.

कम्बाइंड हार्वेस्टर मशिन (Combined Harvester Machine) हा पिकांच्या काढणीसाठी उत्तम पर्याय आहे. या यंत्राच्या सहाय्याने भात कापणी उत्तम प्रकारे करता येते आणि शेतकऱ्यांचे कष्ट देखील वाचतात.

विशेष म्हणजे हरभरा, सूर्यफूल, मोहरी, सोयाबीन, गहू या पिकांची काढणी देखील करता येते. महत्वाचे म्हणजे शेत साफसफाईसाठीही याचा वापर करता येईल. कम्बाइंड कापणी मशीन अगदी कमी वेळेत करता येते. या मशीनचा खर्च देखील शेतकऱ्यांना पडवडत आहे.

महात्मा गांधींची आज 153 वी जयंती; गांधीवादातून 'हे' पाच धडे तुम्ही घेतले पाहिजेत...

शॉर्टी मशीन

कडधान्य, हरभरा, सोयाबीन यासारख्या लहान पिकांच्या काढणीसाठी शेतकऱ्यांना कष्ट घ्यावे लागतात. यामध्ये शेतकऱ्यांनाही तोटा सहन करावा लागतो. मात्र आता शेतकऱ्यांना काळजी करण्याची गरज नाही. ही समस्या मिटविण्यासाठी बाजारात एक शॉर्टी मशीन आहे. ज्याला रीपर मशीन (Reaper Machine) देखील म्हणता येईल.

दिलासादायक! 'या' बाजार समितीत सोयाबीनला मिळतोय सर्वाधिक बाजारभाव; जाणून घ्या दर

ही मशिन लहान रोपेही सहज कापते. या मशीनमध्ये 50 सीसी 4 स्ट्रोक इंजिन आहे. विशेष म्हणजे इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले स्थापित केला आहे, जे काम कसे करायचे याची माहिती देते. हे मशीन (machine) शेतकऱ्यांना फक्त 30 हजार रुपयांमध्ये मिळेल, यामध्ये 1 वर्षाची वॉरंटीदेखील आहे.

महत्वाच्या बातम्या 
धनु आणि मकर राशींना होणार धनलाभ; जाणून घ्या आजचे राशीभविष्य
कीटकनाशकांच्या फवारणीसाठी वापरा 'हे' अफलातून जुगाड; पैशांची होणार बचत
शेतकऱ्यांनो रब्बीत कमी खर्चात पिकांचे उत्पादन दुप्पट करा; फक्त 'या' टिप्स कराव्या लागतील फॉलो

English Summary: Launch cheapest machine crop harvesting money time saved
Published on: 02 October 2022, 11:48 IST