Agripedia

शेतकऱ्यांना बऱ्याच योजनेची माहिती नसते त्यामुळे कित्येक शेतकरी लाभ मिळण्यापासून वंचित राहतात. अशीच एक महत्वाची माहिती समोर आली आहे, ज्यातून अनेक शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

Updated on 28 July, 2022 1:15 PM IST

शेतकऱ्यांना (farmers) बऱ्याच योजनेची माहिती नसते त्यामुळे कित्येक शेतकरी लाभ मिळण्यापासून वंचित राहतात. अशीच एक महत्वाची माहिती समोर आली आहे, ज्यातून अनेक शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

ही घटना आहे मध्य प्रदेशातील पाटण येथील स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India) शाखेतील. येथील एका शेतकऱ्याचा मृत्यू होतो यानंतर त्यांचा मुलगा वडिलांचे खाते बंद करण्यासाठी बँकेत पोहचतो तेव्हा त्याला बँक 15 लाख रुपये देते.

हे ही वाचा 
Agriculture Officer: ...आणि कृषी अधिकारी लाच घेताना जाळ्यात अडकला; वाचा नेमकं काय झालं

नेमके प्रकरण काय

याबाबत बँकेला (bank) विचारणा केली असता कळले की, शेतकऱ्याने एसबीआयच्या या शाखेत किसान क्रेडिट कार्ड (Kisan Credit Card) खाते उघडले होते, ज्यामध्ये त्याचा 15 लाख रुपयांचा जीवन विमा होता.

मध्यप्रदेशातील पाटण जिल्ह्यातील बांदा गावात राहणारे शेतकरी जनवेश कुमार यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा आजोबांसोबत बँक खाते बंद करण्यासाठी बँकेत पोहोचला होता.

बँकेत पोहोचल्यानंतर वडिलांनी 15 लाखांची विमा पॉलिसी घेतल्याची माहिती त्यांना मिळाली. शेतकरी जनवेश कुमार यांनी SBI मध्ये ₹ 15 लाखांची किसान क्रेडिट कार्ड पॉलिसी ₹ 1800 मध्ये घेतली होती.

काही वेळापूर्वी गच्चीवर काम करत असताना शेतकरी घसरला आणि खाली पडला आणि त्याचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर, त्यांच्या कुटुंबातील कोणालाही माहित नव्हते की त्यांनी 15 लाख रुपयांचा जीवन विमा काढला आहे.

हे ही वाचा 
Gas cylinder free: सरकार 3 गॅस सिलिंडर मोफत देणार; पहा तुम्ही आहात का लाभार्थी

विशेष म्हणजे शेतकरी कुटुंबातील कोणालाही याची माहिती नव्हती. त्यानंतरही किसान क्रेडिट कार्ड बंद करण्यासाठी बँकेत मृत्यू प्रमाणपत्र सादर केल्यानंतर विमा दाव्याची रक्कम कुटुंबीयांना देण्यात आली.

एसबीआयच्या पाटण शाखेत तैनात असलेल्या बँक अधिकाऱ्यांनी शेतकऱ्याच्या मुलाला सांगितले की त्याचे वडील जनवेश कुमार यांनी KCC खाते उघडल्यानंतर ₹15 लाखांची विमा पॉलिसी घेतली होती.

कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर बँकेने 15 लाखांचा धनादेश शेतकऱ्याच्या मुलाला दिला. मयत शेतकऱ्याने आपल्या मुलाला या विमा पॉलिसीचे नॉमिनी केले होते.

महत्वाच्या बातम्या 
Solar Panel: शेतकरी मित्रांनो; सोलर पॅनल बसवून मिळवा 24 तास मोफत वीज, सरकार देतंय 'इतके' अनुदान
Crop Management: शेतकरी मित्रांनो; आडसाली उसाचे करा 'असे' व्यवस्थापन, मिळेल भरघोस उत्पन्न
Heavy Rain: सावधान! पुढील दोन दिवस मुसळधार पाऊसाचा इशारा; शेतकऱ्यांना बसू शकतो फटका

English Summary: Kisan Credit Card bank paid 15 lakh son after death farmer father
Published on: 28 July 2022, 01:15 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)