Agripedia

सध्या जमिनीची सुपीकता दिवसेंदिवस खालावत चालली असून जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण प्रचंड प्रमाणात खालावले आहे. त्यामुळे पीक उत्पादनावर अनिष्ट परिणाम होत असून एकंदरीत जमिनी पासून मिळणारी पिकांची उत्पादकता कमी होत आहे. त्यामुळे आता बरेच शेतकरी याला पर्याय म्हणून सेंद्रिय खतांचा वापर मोठ्या प्रमाणावर करू लागले आहेत. सेंद्रिय खतांमध्ये हिरवळीचे खत हा एक चांगला पर्याय शेतकऱ्यांसमोर उभा आहे.

Updated on 09 August, 2022 12:18 PM IST

सध्या जमिनीची सुपीकता दिवसेंदिवस खालावत चालली असून जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण प्रचंड प्रमाणात खालावले आहे. त्यामुळे पीक उत्पादनावर अनिष्ट परिणाम होत असून  एकंदरीत जमिनी पासून मिळणारी पिकांची उत्पादकता कमी होत आहे. त्यामुळे आता बरेच शेतकरी याला पर्याय म्हणून सेंद्रिय खतांचा वापर मोठ्या प्रमाणावर करू लागले आहेत. सेंद्रिय खतांमध्ये हिरवळीचे खत हा एक चांगला पर्याय शेतकऱ्यांसमोर उभा आहे.

आपल्याला माहित आहेच कि हिरवळीच्या खतासाठी चवळी सारखी पिके जमिनीत गाडली जातात परंतु त्यातल्या त्यात जमिनीमध्ये सेंद्रिय खतांचे प्रमाण कायम ठेवण्यासाठी तागाचे पीक जमिनीत गाडणे गरजेचे आहे.

ताग हे द्विदल वर्गातील पीक असल्याने वातावरणातील  नत्र कमी कालावधीत शोषून घेण्याची क्षमता या पिकात आहे.या लेखात आपण ऊस लागवडीपूर्वी जमिनीत ताग पीक गाडण्याचे काय फायदे होतात ते पाहू.

नक्की वाचा:शेतकरी मित्रांनो गायीच्या गोमूत्राचा शेतीत अशाप्रकारे वापर करा; मिळेल भरघोस उत्पन्न

 हिरवळीच्या खतासाठी ताग उपयुक्त

1- आपण सेंद्रिय खतासाठी शेण खत, गांडूळ खत, प्रेसमड तसेच शेळी किंवा मेंढी यांचे लेंडीखत आपण वापर करतो.परंतु यामध्ये हिरवळीच्या खतासाठी तागाचा वापर हा एक उत्तम पर्याय आहे.

2- उसाचे पीक देण्याअगोदर तागाचे पीक घेतल्याने हमखास उत्पादनात वाढ झाल्याचे विविध ठिकाणी झालेल्या निष्कर्षांमध्ये दिसून आले आहे. ताग हे कमी कालावधीत जलद वाढणारे व भरपूर पाला येणारे पीक आहे.

वातावरणातील नत्र कमी कालावधीत शोषून घेत असल्याने नत्र जमिनीत स्थिर होण्यास मदत होते.

3- झाडाच्या फांद्या एकदम कोवळ्या आणि लुसलुशीत असल्याने त्यामध्ये तंतुमय पदार्थांचे प्रमाण कमी असते त्यामुळे जमिनीत गाडल्यानंतर कुजण्याची प्रक्रिया जलद होते.

पिकांची मुळे खोलवर जात असल्यामुळे जमिनीच्या खालच्या थरातील अन्नद्रव्य शोषून घेतली जातात व पीक गाडल्यानंतर वरच्या थरात मिसळली जातात.

नक्की वाचा:वांग्याच्या शेतीतून होईल बंपर कमाई! फक्त या तीन जातींची करा निवड व्हाल मालामाल

3- पीक गाडल्यानंतर अवघ्या दीड महिन्याच्या कालावधीत नत्रयुक्त अन्नद्रव्ये उपलब्ध होत असल्यामुळे उसाच्या पिकाला फुटवे फुटने व वाढीच्या काळात हमखास यांना द्रव्य उपयोगी ठरते व

दुसरे वैशिष्ट्य म्हणजे जास्तीचे अन्नद्रव्य अगदी कमी कालावधीत तागानंतर जे पीक आपण घेतो त्याला उपलब्ध होत असल्यामुळे पिकांना त्याचा फायदा होतो.

4- ताग पिकापासून हेक्‍टरी 30 टनांपेक्षा जास्त बायोमास मिळतो. त्यामुळे त्यांच्यासाठी विशेष उत्पादन तंत्र वापरण्याची गरज नाही.

5- एवढेच नाही तर जमिनीतील अन्नद्रव्य, ह्यूमस, सेंद्रिय कर्ब नत्र वाढवण्यासाठी तागाचा खूप फायदा होतो.

नक्की वाचा:Soil Fertility: शेतातील मातीची सुपिकता 'या' सोप्या मार्गांनी वाढवा; जाणून घ्या

English Summary: jute cultivation is so important for organic fertilizer for growth of crop
Published on: 09 August 2022, 12:18 IST