Agripedia

चांगल्या पिकासाठी झाडांना सतत पोषण मिळत राहणे आवश्यक असते. त्यासाठी वेळोवेळी शेतात खतांची फवारणी केली जाते. ज्यामुळे शेतातील मातीची गुणवत्ता सुधारते आणि सुपीकता वाढते. आज-काल रासायनिक खते व खतांचा अति वापर होत आहे. अशा परिस्थितीत जमिनीची गुणवत्ता दिवसेंदिवस खालावत चालली आहे.

Updated on 20 July, 2022 3:30 PM IST

चांगल्या पिकासाठी झाडांना सतत पोषण मिळत राहणे आवश्‍यक असते. त्यासाठी वेळोवेळी शेतात खतांची फवारणी केली जाते. ज्यामुळे शेतातील मातीची गुणवत्ता सुधारते आणि सुपीकता वाढते. आज-काल रासायनिक खते व खतांचा अति वापर होत आहे. अशा परिस्थितीत जमिनीची गुणवत्ता दिवसेंदिवस खालावत चालली आहे.

त्यासाठी शेतकऱ्यांनी पिकासाठी सेंद्रिय खतांचा वापर करणे गरजेचे आहे. आज आपल्या लेखात असेच महत्त्वाचे द्रावण जे पिकांसाठी खूप फायदेशीर ठरते, अशाच जीवामृत बनवण्याबद्दल माहिती घेणार आहोत.

 जीवामृत म्हणजे काय?

 एक पारंपारिक भारतीय सेंद्रिय खत आणि जैव कीटकनाशक आहे. जे शेणापासून बनवले जाते. गोमूत्र, मसुराचे पिठ, गुळ, माती आणि पाणी यांचे मिश्रण करून जीवामृत तयार केले जाते.

हे नैसर्गिक कार्बन, बायोमास, नायट्रोजन, फास्फोरस, पोटॅशियम आणि पिकांसाठी आवश्यक असलेल्या इतर सूक्ष्म अन्नद्रव्यांचा उत्कृष्ट स्त्रोत आहे. जीवामृत हे सेंद्रिया असण्यासोबतच स्वस्त देखील आहे त्यामुळे शेतकरी आणि शेत या दोघांसाठी ते फायदेशीर आहे.

नक्की वाचा:Nano Urea: अरे व्वा! युरियाच्या काही थेंबांनी दुप्पट उत्पन्न निघणार; जाणून घ्या कसे ते...

 जीवामृताचे तीन प्रकार

लिक्विड  जीवामृत कसे बनवायचे?

1- जीवामृत तयार करण्यासाठी एका डब्यात शेण, गोमूत्र, गुळ, बेसन आणि माती सुमारे तीन लिटर पाण्यात मिसळा.

2- यानंतर सर्व साहित्य काठीने ढवळत राहा. जेणेकरून द्रावणात गुठळ्या होणार नाहीत.

3- नंतर मिश्रण तयार झाल्यावर त्यात आणखी सात लिटर पाणी घाला.

4- यानंतर मिश्रणाचा तयार डबा बाहेर सावली ठेवा आणि कापडाने झाकून ठेवा. हे मिश्रण दररोज सकाळी आणि संध्याकाळी सुमारे पंधरा मिनिटे ढवळत राहा.

5- त्यानंतर तुमचे जीवामृत दोन दिवसात तयार होईल व त्यानंतर ते शेतात वापरता येते.

 अर्ध घन जीवामृत

1- अर्ध घनजीवामृत बनवण्यासाठी तुमच्याकडे शेणाचे प्रमाण जास्त असणे गरजेचे आहे.

2- हे जिवाअमृत तयार करण्यासाठी 50 किलो शेण दोन लिटर गोमूत्र, अर्धा किलो गूळ आणि मैदा आणि थोडी सुपीक माती मिसळावी.

3- त्यानंतर या मिश्रणात थोडे पाणी मिसळावे आणि त्यानंतर मिश्रणाचे गोळे बनवा.

नक्की वाचा:काळ्या आईची निर्मिती!250 कोटी वर्षाहून अधिक काळ लागला माती तयार होण्यासाठी,कसं बरं चालेल मातीकडे दुर्लक्ष करून

4- नंतर तयार केलेले गोळे उन्हात वाळवा त्यानंतर थोड्या अंतराने हलके पाणी शिंपडत राहा. कारण त्यातील ओलावा टिकून राहून फायदेशीर सूक्ष्मजंतू सक्रीय होतात.

 सुकवलेले जीवामृत

1- वाळलेल्या जीवामृतला घन जीवामृत असे देखील म्हणतात. हे बनवण्यासाठी पाण्याची गरज नाही. त्यासाठी सर्वप्रथम तुम्ही पन्नास किलो शेण जमिनीवर चांगली पसरवा व त्यानंतर त्यामध्ये पाच लिटर लिक्विड  जीवामृत घाला.

2- तयार झालेले मिश्रण ज्यूटच्या गोणीने झाकून ठेवा. त्यानंतर दोन दिवसात आंबायला सुरुवात होते.

3- नंतर हे जमिनीवर पसरवा आणि उन्हात किंवा सावलीत वाळवा.

4- सुकल्यावर तागाच्या गोणीत ठेवा.

5- घनजीवामृत सहा महिने साठवता येते. पेरणीच्या वेळी घनजीवामृत वापरणे खूप फायदेशीर आहे. प्रति किलो बियाण्यासाठी दोन मूठभर घन जीवामृत वापरावे.

नक्की वाचा:Agriculture Technology: बियाणे तपासणीसाठी करा 'या' खास तंत्राचा वापर! शेतकऱ्यांना ठरेल वरदान; उत्पन्नही वाढणार

English Summary: jivamrut is so benificial for crop to improve quality and production
Published on: 20 July 2022, 03:30 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)