Agripedia

ढगाळ वातावरणामुळे आणि पावसाच्या उघडझापमुळे कापूस पिकावर किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. कापूस पिकावर (Cotton Crop) पडणाऱ्या वेगवेगळ्या किडींमुळे पिकाचे सरासरी ५० ते ६० टक्के नुकसान होते. त्यामुळे वेळीच किडीचे नियंत्रण करणे गरजेचे असते.

Updated on 05 August, 2022 3:59 PM IST

ढगाळ वातावरणामुळे आणि पावसाच्या उघडझापमुळे कापूस पिकावर किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. कापूस पिकावर (Cotton Crop) पडणाऱ्या वेगवेगळ्या किडींमुळे पिकाचे सरासरी ५० ते ६० टक्के नुकसान होते. त्यामुळे वेळीच किडीचे नियंत्रण करणे गरजेचे असते.

किडींमुळे (insects) पिकाचे सरासरी ५० ते ६० टक्के नुकसान होते. त्यापैकी १६ ते २७ टक्के नुकसान रसशोषक किडींमुळे होते, तर ३८ ते ७३ टक्के नुकसान बोंड अळ्यांमुळे होते. त्यामुळे रसशोषक किडींचे नियंत्रण करायचे कसे? याविषयी सविस्तर माहिती घेऊया.

सर्वसामान्यांना मोठा दिलासा; खाद्य तेल होणार स्वस्त, जाणून घ्या आजच्या किमती

रसशोषक किडींच्या प्रादुर्भावाची ही आहेत करणे

1) किडीच्या नियंत्रणासाठी फवारणीमध्ये केलेला बदल.

2) निओनिकोटीनॉइड उदाहरणार्थ इमीडाक्लोप्रीड गटातील कीडनाशकांची किडींमध्ये निर्माण झालेली प्रतिकारशक्ती.

3) एकापेक्षा अधिक कीडनाशके, विद्राव्य खते, संप्रेरके तसेच बुरशीनाशके यांचे मिश्रण करून फवारणी करणे.

4) पिकावर कीडनाशकाची आवाजवी फवारणी करणे.

5) कीडनाशकाचे अयोग्य प्रमाण वापरणे.

6) नत्रयुक्त खताचा अतिवापर.

7) किडीला पोषक हवामान.

MSEDCL: शेतकऱ्यांना मोठा दिलासा; राज्यात 24 तास वीज पुरवठा होणार, जाणून घ्या

रसशोषक किडींचा प्रादुर्भाव असा टाळा

शक्य असेल तर पिकाच्या सुरूवातीच्या अवस्थेत केवळ रासायनिक कीडनाशकांचा वापर टाळा. पतंगवर्गीय दुय्यम किडी जसे कापसाची पाने गुंडाळणारी अळी आणि कापसावरील उंटअळी यांचे नियंत्रण करण्यासाठी फवारणी करू नका.

इमिडॅक्लोप्रीड, क्लोथीयानीडीन आणि थायामिथॉक्झाम या नियोनीकोटिनॉइड गटातील कीडनाशके किडींची प्रतिकारशक्ती वाढवतात. त्यामुळे त्यांचा वापर टाळा. जागतिक आरोग्य संघटनेने अतिशय घातक वर्गामध्ये समाविष्ट केलेल्या कीडनाशकांचा जसे की मिथाईल पॅराथीयॉन, फोरेट, मोनोक्रोटोफॉस, कार्बोफ्युरॉन आणि मेटॉक्सिटॉक्स यांचा वापर करू नका.

पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव (Outbreak) टाळण्यासाठी पायरेथ्रॉइड्स यांचा वापर टाळावा. कीडनाशकांचे मिश्रण (Mixture of pesticides) करणे टाळा. शिफारस केलेल्या रासायनिक किडनाशकांची फवारणी (Spraying of pesticides) तज्ज्ञांच्या सल्ल्याने करा.

महत्वाच्या बातम्या 
Agriculture Cultivation: ऑगस्टमध्ये करा 'या' शेतीची लागवड; मिळेल दुप्पट उत्पन्न
ऊसतोडणी यंत्राला मोठी मागणी; शेतकऱ्यांचा कल ऊसतोडणी यंत्राकडे..
Horoscope: तुमचा आजचा दिवस कसा असेल? जाणून घ्या राशिभविष्य

English Summary: Infestation insects cotton crop immediate action otherwise huge damage
Published on: 05 August 2022, 02:57 IST