Agripedia

शेतीतील पीक पद्धती आणि शेती करायच्या पद्धती यामध्ये आमूलाग्र बदल घडत आहे. पारंपरिक शेती करण्याचा आणि पिके घेण्याचा काळ कधीच मागे पडला आहे. अगदी नवनवीन तंत्रज्ञानाने पिके शेतकरी घेत असून याचा फायदा उत्पादन वाढण्यात होत असून शेतकऱ्यांचे उत्पन्न देखील वाढत आहे.

Updated on 05 July, 2022 11:10 AM IST

शेतीतील पीक पद्धती आणि शेती करायच्या पद्धती यामध्ये आमूलाग्र बदल घडत आहे. पारंपरिक शेती करण्याचा आणि पिके घेण्याचा काळ कधीच मागे पडला आहे. अगदी नवनवीन तंत्रज्ञानाने पिके शेतकरी घेत असून याचा फायदा उत्पादन वाढण्यात होत असून  शेतकऱ्यांचे उत्पन्न देखील वाढत आहे.

काही पिकांच्या बाबतीत आपल्याला माहित आहेच की, भारताच्या विशिष्ट भागात जास्त प्रमाणात काही पिके घेता येतात.कारण तेथील वातावरण त्यांना योग्य असते.

जसे आपण सफरचंदाचे उदाहरण घेतले तर सफरचंद हे फळपीक जास्त करून हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीर या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घेतले जाते.

परंतु आता आपण पाहतो आहे की महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांनी सफरचंद लागवडीचा प्रयोग यशस्वी केला आहे. तसेच केशरच्या बाबतीत सुद्धा आहे.

केशर चे नाव जरी उच्चारले तरी आपल्या डोळ्यासमोर  येते की काश्मीर मध्ये याची लागवड होते. परंतु आता तंत्रज्ञानाच्या मदतीने कुठलीही पीक कोणत्याही ठिकाणी शेतकरी घेऊ लागले आहेत किंवा घेण्याचे धाडस करत आहेत. धाडसच नव्हे तर यशस्वी देखील होत आहेत. आता केशर चा विचार केला तर एका बंद खोलीत देखील केशर उत्पादित करता येऊ शकते. याबाबत आपण या लेखात माहिती पाहणार आहोत.

नक्की वाचा:शेतशिवार! आता प्लास्टिक मल्चिंगला करा बाय बाय अन वापरा कोकोपीट मल्चिंग, वाचा सविस्तर

इंडोअर केशर लागवड

 जर आपण केशर लागवडीचा विचार केला तर ती जून ते सप्टेंबर या दरम्यान करता येते. हा कालावधी केशर लागवडीसाठी महत्त्वाचा आणि योग्य मानला जातो.

केशर पिक काढण्यासाठी पक्व व्हायला तीन ते चार महिने लागतात. या कालावधीमध्ये चांगला सूर्यप्रकाश असला तर हे पीक चांगले विकसित होते. लागवडीसाठी जर आपण जमिनीचा विचार केला तर चिकन माती आणि वालुकामय,रेव जमीन याच्या लागवडीसाठी चांगली असते.

परंतु आता काही ठिकाणी शेतकऱ्यांनी या सगळ्या कटकटीतून मुक्ती मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी इंडोवर फार्मिंग अर्थात एका बंद खोलीत केशर लागवड सुरू केली आहे. जर आपण या तंत्रज्ञानाचा विचार केला तर यामध्ये केशर लागवडीसाठी गडद बंद खोलीची  आवश्यकता असते.

सूर्यप्रकाश अजिबात या खोलीत येणार नाही याची काळजी घ्यावी लागते नाहीतर प्रकाश पोहोचल्याने केशर पीक खराब होण्याची शक्यता जास्त असते.या पद्धतीत तीन महिने केशर चे तुकडे बंद अंधाऱ्या खोलीत ठेवले जातात व त्या खोलीचे तापमान 20 अंशाच्या आसपास ठेवणे आवश्यक असते.एका खोलीत केशर लागवड केल्यामुळे वेळ, कष्ट आणि पैसा या तीनही महत्त्वाच्या गोष्टींची बचत होते.

तसेच बऱ्याचदा होणाऱ्या प्रतिकूल हवामानाचा परिणाम हा केशर पिकावर होत नाही. याचा फायदा असा होतो की, शेतकऱ्यांना त्यांनी केलेल्या खर्चापेक्षा काही पटीने जास्त नफा मिळतो. आपल्याला माहित आहेच कि केशर चा वाळलेल्या फुलांना केशर कुमकुम किंवा सॅफरॉन असे म्हणतात.

नक्की वाचा:नवयुवकांनो! करत असाल शेतीत पदार्पण तर मिरची' लागवडी'पासून करा सुरुवात,सुरुवात ठरेल यशस्वी

 एवढी असते केशर ची किंमत

आपल्याला बर्‍याच जणांना माहिती आहे की बाजारात एक किलो केशर ची किंमत जवळजवळ तीन लाख रुपयांपर्यंत असते.

या सगळ्या बाजार परिस्थितीचा विचार केला तर दर महिन्याला दोन किलो केशर या माध्यमातून म्हणजे बंद खोलीत केशर लागवड तंत्रज्ञान आत्मसात केल्यानंतर उत्पादित केले तर एका महिन्यात सहा लाख रुपये सहज कमावता येणे शक्य आहे

आणि केशरची विक्री तुम्ही जवळपासच्या कुठलाही बाजारपेठेत किंवा अगदी ऑनलाईन पद्धतीने देखील येऊ शकतात. आता गरज आहे या तंत्राचे सखोल माहिती घेण्याची व धाडस करण्याची.

नक्की वाचा:कोण म्हणते सफरचंद थंड वातावरणात येते? खटाव तालुक्यातील 'या' शेतकऱ्याने माळावर फुलवली सफरचंदाची शेती, वाचा माहिती

English Summary: indoor saffron cultivation give more profit and production of saffron
Published on: 05 July 2022, 11:10 IST