Agripedia

आजकालच्या काळामध्ये शेतकरी जे सगळ्या प्रकारचे भाजीपाला वर्गीय पिके घेत आहेत, त्यामध्ये मिरची एक उत्तम व्यापारी पीक ओळखले जाते. मिरची म्हटले म्हणजे गरिबांपासून ते श्रीमंतांपर्यंत हॉटेलिंग पासून तर रेस्टॉरंटमध्ये मिरचीचा वापर करण्यात येतो.

Updated on 02 June, 2021 1:42 PM IST

आजकालच्या काळामध्ये शेतकरी जे सगळ्या प्रकारचे भाजीपाला वर्गीय पिके घेत आहेत, त्यामध्ये मिरची एक उत्तम व्यापारी पीक ओळखले जाते. मिरची( chilli)म्हटले म्हणजे गरिबांपासून ते श्रीमंतांपर्यंत हॉटेलिंग पासून तर रेस्टॉरंटमध्ये मिरचीचा वापर करण्यात येतो. बाजारामध्ये जसे हिरव्या मिरचीला मागणी असते, तसेच वाळलेल्या मिरचीला ही वर्षभर मोठ्या प्रमाणात मागणी असते. भारतामध्ये जर विचार केला तर बऱ्याचशा राज्यांमध्ये मिरचीचे विक्रमी उत्पादन घेतले जाते. भारतामध्ये सर्वाधिक मिरचीचे उत्पादन हे आंध्र प्रदेश,  महाराष्ट्र कर्नाटक या राज्यांमध्ये होते. महाराष्ट्राचा जर विचार केला तर जळगाव, धुळे, नंदुरबार, उस्मानाबाद, सोलापूर अशा प्रकारच्या अजून इतर जिल्ह्यांमध्ये मिरचीचे उत्पादन घेतले जाते. आजच्या काळामध्ये जर सुधारित तंत्रज्ञान वापरून व व्यवस्थित नियोजन करून जर मिरचीचे पीक घेतले तर चांगल्या प्रकारचा आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत म्हणून मिरचीकडे पाहता येईल.मिरचीमध्ये कॅप सी सिन त्यामुळे मिरची लाल रंग हा प्राप्त होत असतो. मिरचीचा उपयोग मसाल्यांमध्ये, भाजी, आमटी अशाप्रकारे बऱ्याच पदार्थांमध्ये चवीसाठी केला जातो.

मिरची पिकासाठी आवश्‍यक जमीन आणि हवामान:

मिरची पिकासाठी मध्यम ते काळी आणि पाण्याचा उत्तम प्रकारे निचरा होणारी जमीन आवश्यक असते. हलक्‍या जमिनीत योग्य प्रमाणात खतांचा पुरवठा जर केला तर चांगले पीक घेता येऊ शकते. साधारणपणे ७५ सेंटीमीटर पाऊस मांडण्याची पिकासाठी आवश्‍यक असते. काळी कसदार आणि वर धरून ठेवणाऱ्या कोरडवाहू जमिनीमध्ये सुद्धा मिरची पीक चांगले येऊ शकते. सगळ्यात आगोदर मिरची पिकासाठी जमिनीची खोल नांगरट करून कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. आपण कोणती जात लावतो आहे, त्यानुसार अंतर ठेवून सरी-वरंबे तयार करून बांधून घ्यावेत. जर आपण हवामानाचा विचार केला तर मिरची पिकासाठी उष्ण व दमट हवामान जर असले तर मिरचीची वाढ जोमदार होते उत्पादन चांगले मिळते. मिरची लागवडी तिन्ही हंगामात करता येते म्हणजेच पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळ्यात लागवड करता येते. जर आपल्याला हिवाळ्यात लागवड करायचे असेल तर तापमान हे २० ते २५ अंश सेल्सिअसपेक्षा कमी असले तर मिरची पिकाची वाढ चांगली होत नाही त्यामुळे फळधारणा कमी प्रमाणात होते. त्यासाठी ४० इंचापेक्षा कमी पाऊस असणे चांगले असते. उन्हाळी हंगामात जर विचार केला, तर तापमान ३५ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त झाल्यास फुलांची गळ होऊन उत्पादनात घट होऊ शकते.

हेही वाचा :वाचा ! पिकांमध्ये झिंकचे काय असतं कार्य

मिरची लागवडीचा हंगाम

मिरची हे पीक आपण वरती पाहिले त्यानुसार तिन्ही हंगामात येते. खरीप हंगामामध्ये बियांची पेरणी मे महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून जून अखेरपर्यंत करतात. तर उन्हाळी हंगामासाठी जानेवारी फेब्रुवारीमध्ये बियाण्याची पेरणी करावी.

मिरची लागवडीसाठी बियाण्यांचे प्रमाण

मिरचीच्या योग्य जातीची निवड केल्यानंतर रोपे तयार करण्यासाठी चांगली उगवण क्षमता असलेले उत्कृष्ट दर्जाचे बियाणे खरेदी करावे. साधारणपणे हेक्‍टरी एक ते १.२५ किलो बियाणे पुरेसे असते. मिरचीसाठी रोपवाटिका तयार करण्याच्या अगोदर बियाण्याला बीजप्रक्रिया करणे कधीही चांगले असते. बियाण्याची पेरणी करण्यापूर्वी प्रति किलो बियाण्यास दोन ते तीन ग्रॅम थायरम चोळून घ्यावे. रोपवाटिका तयार करण्यासाठी गादीवाफे यांचा वापर करणे कधीही फायद्याचे असते. त्यामुळे उत्तम प्रतीच्या गादीवाफे तयार करून घ्यावेत. साधारणतः बियाण्याची पेरणी केल्यापासून चार ते पाच आठवड्यांनी आणि पंधरा ते वीस सेंटीमीटर वाढली की लागवड करून टाकावी.

हेही वाचा : मिरची प्रक्रिया उद्योगातून मिळवा पैसा : बनवा मिरची लोणचं, मिरची सॉस

 


मिरची लागवडीची पद्धत

मिरची पिकाची लागवड सरी वरंब्यावर करणे कधीही फायद्याचे असते. उंच हनी पसरट वाढणार्‍या जातीची लागवड ७५ बाय साठ किंवा ६० बाय साठ सेंटिमीटर अंतरावर तर बुटक्या जातींची लागवड ६० बाय ४५  सेंटिमीटर अंतरावर करणे फायद्याचे असते. काळया कसदार भारी जमिनीमध्ये लागवडीचे अंतर जास्त ठेवावे. उन्हाळी हंगामातील मिरची पिकाची लागवड फेब्रुवारी मार्च महिन्यात करावी. तर खरीप हंगामातील मिरचीची लागवड जून ते जुलैमध्ये करावी. जेव्हा पण मिरची लागवड करू त्याअगोदर एक दिवस रोपवाटिकेत हलके पाणी द्यावे.  त्यामुळे रोपांची काढणी करणे सुलभ होते आणि रोपांची मुळे तुटत नाही. लागवड करीत असताना रोपांची मुळे जर जास्त लांब असतील. तर ती कापून काढावीत किंवा जास्त उंचीची रुपये असल्यास त्यांचे शेंडे खोडून काढावेत नंतर लागवडीसाठी वापरावे. रोपांची लागवड तर सायंकाळी करावी. तिसऱ्या दिवशी  हलकेसे पाणी द्यावे. त्यामुळे रोपांची मर होत नाही किंवा कमी प्रमाणात होती आणि त्या नंतर जमिनीच्या मगदुराप्रमाणे आणि हंगामानुसार पाणी देत राहावे.

​हेही वाचा :  मिरची बिज निष्कासन यंत्राची माहिती; जाणून घ्या यंत्राचे फायदे 

 

मिरची पिकासाठी खत व्यवस्थापन

मिरची पिकासाठी २० ते ४० गाड्या कुजलेले शेणखत मशागतीच्या वेळी जमिनीत मिसळले. तर एकदम फायदा मिळू शकतो. साधारणतः कोरडवाहू पिकासाठी ८० किलो नत्र, तीस ते पस्तीस किलो स्फुरद आणि ५० किलो पालाश द्यावे. साधारण दहा नत्राची मात्रा दोन हप्त्यात विभागून दिली तर फायद्याचे असते. पहिला फुले येण्याच्या सुरुवातीला द्यावा हो तिसरा हप्ता हा त्यानंतर आठवड्यांनी द्यावा. बागायती क्षेत्रावर लागवड केली असेल तर १०० किलो नत्र आणि ५० किलो स्फुरद व पालाशची पूर्ण मात्रा आणि नत्राची अर्धी मात्रा रोपाच्या लागवडीच्या वेळी द्यावे. नत्राची उर्वरित मात्रा लागवडीनंतर २५ ते ३० दिवसांनी बांगडी पद्धतीने द्यावे व वरुन माती टाकून व्यवस्थित दाबून द्यावे.

मिरची पिकासाठी आंतरमशागत

मिरची पीक गवत मुक्त ठेवणे हे उत्पन्न वाढीच्या दृष्टीने महत्त्वाचे असते. गवत दिसू लागल्यास तात्काळ खुरपणी करून गवत काढून घ्यावे व जमिनीत हवा खेळती ठेवावी. जेव्हा साधारणता मिरचीला फुले येण्याचा कालावधी असतो. तेव्हा उभी-आडवी कोळपणी करून पिकाला चांगल्याप्रकारे भर द्यावी. लागवड करण्यापूर्वी जर तणनाशक फवारले तर परिणामकारक फरक दिसतो. साधारणतः दोन लिटर बासलीन ५०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी केली तर तणांचा बंदोबस्त करणे शक्‍य होते.

मिरची पिकासाठी संजीवकांचा वापर

 मिरचीमध्ये जी फुलगळ होते ही जास्त करून नैसर्गिकरित्या असते. जर आपण साधारणता फुल गळतीचे गणित पाहिले तर असे लक्षात येते की तीस ते चाळीस टक्के फुले फक्त झाडावर राहतात आणि त्यापासून फळे मिळतात. उरलेले फुले हे नैसर्गिकरित्या करून जातात ढगाळ वातावरण राहिले तर फुलांची गरज जास्त प्रमाणात होते. हे टाळण्यासाठी जर २५ ते ५० पीपीएम एनएए फवारले किंवा २० मिली प्लानोफिक्स १०० लिटर पाण्यात फवारले तर फुल गळतीचे प्रमाण बर्‍यापैकी कमी होते.

 मिरचीवरील रोग व किडी

 मिरची पिकावर प्रमुख्याने फुलकिडे, कोळी, फळ पोखरणारी अळी या किडींचा प्रादुर्भाव होतो. फुलकिडे हे पानाच्या खालच्या बाजूस राहतात आणि पानातून रस शोषून घेतात. त्यामुळे पानांच्या कडावरील बाजूस वळतात पाणी लहान होता.  त्यालाच आपण बोकड्या किंवा चुरडा मुरडा असे म्हणतो. या बोकड्या रोगाचा सर्व विचार केला मिरची उत्पन्नातील सर्वाधिक घट या रोगामुळे होते.  या किडीचा जर विचार केला तर कोरड्या हवामानात जास्त प्रमाणात आढळते. कोळी ही कीड सुद्धा पानांतून रस शोषून घेते. त्यामुळेही पानाच्या कडाखालील बाजूस वळतात डेट लांब होतात आणि पाने लहान होतात. फळे पोखरणारी आळी ही फळाच्या देठाजवळील भाग खातात त्यामुळे फळे गळून पडतात.

 या सगळ्या प्रकाराने किडींच्या नियंत्रणासाठी कीड प्रतिकारक जातींची निवड केली तर उत्तम असते. तसेच बियाण्यास कार्बोसल्फान ३० ग्रॅम आणि त्याबरोबरीने ट्रायकोडर्मा पाच ग्रॅम प्रति किलो बीज प्रक्रिया करताना वापरावे. रोपवाटिकेमध्ये रोपे उगवल्यानंतर रोपांच्या दोन ओळींमध्ये कार्बोफ्युरॉन दाणेदार ३० ते ४० ग्राम किंवा फोरेट दाणेदार विक्रम टाकावे किंवा डायमिथोएट १० मिली किंवा मिथिल डिमॅट ऑन १० मिली दहा लिटर पाण्यातून फवारावे. लागवडीनंतर १० ते १५ दिवसांनी निंबोळी पेंड हेक्‍टरी ४०० ते  ५०० किलो या प्रमाणात टाकावे. रोपाच्या पुनर्लागवडीनंतर पहिली फवारणी मिथिल डिमेटोन किंवा मेट्या सिस्टोक्स १० ते १५ मिली दहा लिटर पाण्यातून फवारणी करावी. त्यानंतर दोन ते तीन फवारण्या १२ ते १५ दिवसांच्या अंतराने करावी. जर फवारणी कालावधीमध्ये चार टक्के निंबोळी अर्क यांची फवारणी केली तर महत्त्वाचे आहे.

हेही वाचा :वनामकृवित जागतिक मृदा दिन साजरा


मिरची काढणी व उत्पादन

मिरची पिकाची काढणी करताना पूर्ण वाढलेल्या हिरवी मिरची काढणी करावी. वाळलेल्या मिरच्यासाठी पूर्ण पिकून त्या लाल रंगाच्या झाल्यावर तोडणी करावी. मिरची फळे जास्त काळ झाडावर ठेवू नयेत. त्यामुळे मिरची पिकण्याची शक्यता जास्त असते. साधारणता हिरव्या मिरचीचे उत्पादन एकरी १५ टनांपर्यंत येते तर वाळलेल्या मिरचीचे उत्पादन दोन ते तीन टनांपर्यंत येते.

फुले ज्योती चांगल्या प्रतीचे मिरचीचे वाण

फुले ज्योती हेवान १९९५ साली निवड पद्धतीने विकसित करण्यात आले आहे. या जातीची झाडे मध्यम मुदतीची आणि पसरणारी असतात. जमिनीपासून तीन ते चार फांद्या फुटतात पाणी हिरवे आणि आकाराने मोठी असतात. फळे गोसात लागतात आणि एका घोसात  सरासरी चार ते पाच फळे येतात. सर्व फळे एकसारखी वाढतात आणि एकाच वेळी काढणीस तयार होतात. फळांची लांबी ६ ते ७ सेंटीमीटर असते तर जाडी ०.८ ते १.० सेंटीमीटर असते. या जातीच्या फळांचा रंग गर्द हिरवा असून पिकल्यानंतर लाल होतो. रोपांच्या लागवडीनंतर ५५ ते ६० दिवसात हिरव्या मिरचीचा तोरा मिळतो. तर पिकलेल्या मिरचीचा पहिला तोडा ८०  ते ९० दिवसात मिळतो. हिरव्या मिरचीचे सरासरी हेक्‍टरी उत्पादन १८०   ते २२५ क्विंटल मिळते. ही जात भुरी रोगाला बळी पडते. तर फुलकिडे आणि पांढरी माशी या किडींचा चांगल्या प्रकारे प्रतिकार करते. पश्चिम महाराष्ट्रात खरीप आणि उन्हाळी हंगामासाठी शिफारस करण्यात आली आहे. त्याशिवाय फुले सई, अग्निरेखा हे वाणही चांगले आहेत.

 

( संदर्भ- बळीराजा मासिक)

English Summary: Improved technology of chilli cultivation
Published on: 16 September 2020, 05:11 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)