Agripedia

पिकांची लागवड ते काढणीपर्यंत केलेले व्यवस्थापन हा भरघोस उत्पादन वाढीचा पाया असतो. यामध्ये खतांचे व्यवस्थापन खूप महत्त्वाचे असून पिकांच्या विविध अवस्थांमध्ये ज्या खतांची आवश्यकता असते त्यांचाच पुरवठा करणे खूप गरजेचे असते. आता पिके असो या फळबागा यांचे उत्पादनाची सुरुवात हि फुलधारणेपासून होते हे आपल्याला माहिती आहे. फुलधारणा भरघोस झाली तर हातात येणारे पिकाचे उत्पादन देखील भरघोस मिळते. त्यामुळे या लेखात आपण पिकाच्या सुदृढवाढीपासून तर फुले धरण्याच्या अवस्थेमध्ये कोणत्या खताचा पुरवठा महत्त्वाचा ठरतो, याबद्दल या लेखात माहिती घेऊ.

Updated on 30 September, 2022 11:22 AM IST

पिकांची लागवड ते काढणीपर्यंत केलेले व्यवस्थापन हा भरघोस उत्पादन वाढीचा पाया असतो. यामध्ये खतांचे व्यवस्थापन खूप महत्त्वाचे असून पिकांच्या विविध अवस्थांमध्ये ज्या खतांची आवश्यकता असते त्यांचाच पुरवठा करणे खूप गरजेचे असते.

आता पिके असो या फळबागा यांचे उत्पादनाची सुरुवात हि फुलधारणेपासून होते हे आपल्याला माहिती आहे. फुलधारणा भरघोस झाली तर हातात येणारे पिकाचे उत्पादन देखील भरघोस मिळते. त्यामुळे या लेखात आपण पिकाच्या सुदृढवाढीपासून तर फुले धरण्याच्या अवस्थेमध्ये कोणत्या खताचा पुरवठा महत्त्वाचा ठरतो, याबद्दल या लेखात माहिती घेऊ.

नक्की वाचा:Fertilizer Tips: उसापासून हवे भरपूर उत्पादन तर 'सिलिकॉन' आहे गरजेचे, वाचा याचे फायदे

पिकाची सुदृढ वाढ होण्यासाठी खते

 कोणत्याही पिकाच्या लागवडीआधी जमिनीचा पोत सुधारायचा असेल तर कोंबडी खत,चांगले कुजलेले शेणखत, हिरवळीचे खते  यांचा वापर कौशल्याने केला तर जमिनीचा पोत सुधारतो आणि पिकांची वाढ चांगली होती. मुख्य अन्नद्रव्यांमध्ये नत्र, स्फुरद आणि पालाश यांचा वापर हा सुद्धा फूल व फळ धारणेवर खूप मोठा परिणाम करतो.

जर आपण नत्र या पोषक घटकांचा विचार केला तर पिकाची कायिक वाढ होण्यासोबत पानांचा आकार आणि नवीन फुटवे वाढवतो. सहाजिकच पानांचा आकार वाढल्यामुळे पिकाला अन्नपुरवठा खूप चांगला होतो. नत्राच्या पुरवठ्यासाठी अमोनियम सल्फेट, युरिया आणि कॅल्शिअम अमोनिअम नायट्रेट ही खते उपयोगाचे आहेत.

नक्की वाचा:Crop Technology: फळबागेमध्ये हवे भरपूर उत्पादन तर करा संजीवकांचा वापर, होईल आर्थिक फायदा

 फुल फळ धारणेसाठी आवश्यक अन्नद्रव्य

 पिकांची सुदृढ वाढ होत असताना पुढचा टप्पा येतो तो फुल व फळ धारणेचा. यासाठी पालाश खूप महत्त्वाचे अन्नद्रव्य आहे. पालाश मुळे मुख्यत्वे पिष्टमय पदार्थांची निर्मिती होते व त्यांचे साखरेत रूपांतर होण्याची जी क्रिया आहे ती जलद गतीने होते.

त्यामुळे रताळी, ऊस आणि इतर शर्करायुक्त फळपिकांना या अन्नद्रव्याची खूप गरज असते. या अन्नद्रव्यांच्या वापरामुळे साखरेचे प्रमाण वाढते व फळ व फुलांना खूप चांगला रंग आणि आकार येतो.

महत्त्वाचे म्हणजे पालाशमुळे पालेभाज्या व फुले त्यासोबतच फळांचा साठवणूक कालावधी देखील वाढतो. म्हणजे एकंदरीत मालाचा दर्जा सुधारण्यासाठी पालाश मदत करतो.

नक्की वाचा:Important: 'संत्रा फळगळ'होण्यामागील ही आहेत प्रमुख कारणे, वाचा आणि समजून घ्या

English Summary: important fertilizer management for good growth of crop and fruit setting
Published on: 30 September 2022, 11:22 IST