लवंग हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. एक मसाल्याचे पीक असून स्वयंपाक घरात स्वयंपाक बनवताना स्वयंपाकाची लज्जत वाढवण्याचे महत्त्वाचे काम लवंग करते
तसे पाहायला गेले तर लवंग हे आरोग्याच्या दृष्टीने खूपच फायदेशीर आहे. त्याचे निरनिराळ्या प्रकारचे फायदे आहेत. आपल्या महाराष्ट्रामध्ये हे पीक सहसा घेतले जात नाही. कारण आपल्याकडचे हवामान तितकेसे या पिकासाठी पोषक नाही. परंतु कोकण किनारपट्टीच्या भागात हे पीक घेता येणे शक्य आहे. यामागील महत्त्वाचे कारण म्हणजे केरळ आणि तामिळनाडू येथील हवामान आणि कोकण येथील हवामानामध्ये बरीच समानता आहे. भारतामध्ये केरळ, तामिळनाडू आणि कर्नाटक राज्यामध्ये हे पीक घेतले जात आहे. लवंग हे बहुउपयोगी पीक असून टूथपेस्ट बनवण्याच्या उद्योगात तसेच दातदुखी वरील औषधे, तसेच उत्तम दर्जाची अत्तरे आणि सुवासिक साबण तयार करण्यासाठी देखील लवंगा पासून तयार करण्यात आलेल्या तेलाचा उपयोग होतो. लवंगा पासून 15 टक्के तेल मिळते.
नक्की वाचा:ATM : एटीएममधून कार्ड शिवाय काढा पैसे; रिझर्व्ह बँकेची मोठी घोषणा
लवंगा विषयी महत्त्वपूर्ण माहिती
लवंगा च्या झाडाला उष्ण आणि दमट हवामान मानवते. हे मसाल्याचे पीक समुद्रसपाटीपासून 900 मीटर उंचीपर्यंत येऊ शकते व त्यासोबत 20 ते 30 अंश सेंटिग्रेड तापमान, 1500 ते 2500 मी मी पर्यंत पाऊस आणि 60 ते 95 टक्के पर्यंत आद्रता या पिकासाठी उत्तम असते. या पिकाला प्रखर सूर्यप्रकाश मानवत नाही.
जर प्रखर सूर्यप्रकाशाची या पिकाचा संबंध आला तर लवंगा ची पाने आणि खोडावर दुष्परिणाम होतो व ते करपायला लागतात व साहजिकच झाडाची वाढ खुंटते. प्रखर सूर्यप्रकाशाला हे झाड संवेदनशील असल्यामुळे सावली राहील अशा ठिकाणी या पिकाची लागवड करणे फायद्याचे ठरते. जमिनीचा विचार केला तर कुठल्याही प्रकारच्या जमिनीत हे पीक छान येते. परंतु पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन आणि सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण अधिक आहे अशी जमीन अधिक चांगली राहते.
कोकणात ठरेल लवंगाची लागवड खूपच फायदेशीर
भारतामध्ये लवंगाची लागवड ही भरपूर पाऊस असलेल्या ठिकाणी आणि ज्या ठिकाणी सौम्य हवामान आहे अशा ठिकाणी केली जाते. आपण वरती पाहिले की भारतामध्ये कर्नाटक,तामिळनाडू आणि केरळ राज्यामध्ये लवंग हे मसाल्याचे पीक घेतले जाते. या तीनही राज्यातील सारखेपणा असलेले हवामान आपल्या महाराष्ट्रात कोकण परिसरात आहे. कारण या पिकाच्या झाडास ऊन आणि वाऱ्यापासून संरक्षण जास्त प्रमाणात दिले तर चांगले येते. म्हणजे जर नारळ किंवा सुपारीची बाग, पूर्वेकडे उतार असलेल्या डोंगरउतारावर आणि दोन डोंगरांच्या दरी मधील प्रदेशात ज्या ठिकाणी पाणीपुरवठ्याची सोय आहे अशा ठिकाणी अगदी उघड्यावर देखील लवंगाचे लागवड यशस्वी ठरते. कोकणामध्ये नारळ किंवा सुपारी चे बाग मोठ्या प्रमाणात आहेत. अशा ठिकाणी नारळ आणि सुपारीच्या झाडांमध्ये योग्य अंतरावर सुपारीची लागवड असेल अशा ठिकाणी लवंग हे आंतरपीक म्हणून घेता येते आणि चांगले उत्पादन मिळते. जर नारळ किंवा सुपारीच्या बागेमध्ये आंतरपीक म्हणून लवंगाची लागवड करायची असेल तर चार नारळाची किंवा सुपारीच्या झाडांच्या मध्यभागी लवंगाच्या रोपांची लागवड करावी.
दोन डोंगरांच्या दरीतील लागवड करायची असेल तर सहासष्ट मीटर अंतरावर करावी. तुम्ही जागा निवडली असेल त्या ठिकाणी 45 सेंटिमीटर लांब× रुंद × खोल खड्डे उन्हाळ्यात खोदून ठेवावी आणि खड्ड्याच्या मातीतील दगड वेचून काढून मातीमध्ये दोन ते तीन छोटी पाटी शेणखत मिसळावे आणि खड्डा भरावा. खड्डा भरताना जमिनीच्या पातळीपासून थोडा वर भरावा. विशेष म्हणजे लवंगाचे लागवड तुम्ही कोणत्याही हंगामात करू शकतात. परंतु भरपूर पाऊस आल्यानंतर लागवड करणे फायद्याचे ठरते. लवंगा ची लागवड करताना दोन वर्षे वयाचे रोप वापरावे. तो खड्डा तुम्ही अगोदर भरून ठेवलेला असतो त्याच्या मध्यभागी रोपांच्या पिशवीच्या आकाराचा खड्डा खोदावा. ज्या प्लास्टिक पिशवी मध्ये रोप तयार केलेले असते ती पिशवी, मातीमध्ये हुंडी फुटणार नाही अशा पद्धतीने काढून तयार करावी. लागवड केलेल्या च्या पहिल्या वर्षी सावलीची व्यवस्था करणे गरजेचे आहे.
नक्की वाचा:दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांसाठी 2 लाखापर्यंत कर्ज, आजच आपले कार्ड बनवून घ्या..
पाणीपुरवठा
लवंगा च्या झाडाला पाणी पुरवठा करताना जमीन सतत ओलसर ठेवावी. परंतु यामध्ये एक महत्त्वाचे काळजी घ्यावी ती म्हणजे ओलावा ठेवताना जास्तच चिखल म्हणजेच दलदल होणार नाही याची दक्षता घ्यावी. जर असे झाले तर मररोग येण्याची दाट शक्यता असते व रोपे मरतात. त्यामुळे ओलावा टिकवून ठेवण्यासाठी 45 ते 60 सेंटिमीटर पर्यंत पालापाचोळ्याचे आच्छादन करावे.
लागवडीनंतर उत्पादन केव्हा सुरू होते?
लवंगाची लागवड केल्यानंतर चार ते पाच वर्षात लवंगा च्या झाडाला फुले येतात व हे दोन हंगामामध्ये येतात. पहिला हंगाम म्हणजे फेब्रुवारी मार्च च्या दरम्यान आणि दुसरा म्हणजे सप्टेंबर ते ऑक्टोबर महिना हा असतो. झाडाचे नवीन पालवी वर उत्पन्नाच्या कळ्या येतात. जेव्हा कळीचा अंकुर दिसायला लागतो तेव्हापासून पाच ते सहा महिन्यात कळी काढण्यासाठी तयार होते. कळ्यांचा घुमट पूर्ण वाढल्यानंतर त्यांना फिक्कट नारंगी रंग प्राप्त होतो. अशाच कळ्यांची काढणी करावी लागते व त्या चार ते पाच दिवस उन्हात वाळवाव्यात. जेव्हा लवंगाचे झाड पंधरा ते वीस वर्षाचे होते तेव्हा त्या झाडापासून दोन ते तीन किलो वाळलेल्या लवंग मिळतात.
Published on: 09 April 2022, 02:45 IST