पिकाच्या पानावर नागमोडी आकाराचे पिवळे / पांढरे पट्टे दिसले की समजावे नाग अळीचा प्रादुर्भाव झाला आहे.या अळीचे प्रौढ रूप काळी माशी असते.काळी माशी पानाच्या मागच्या बाजूने एकावेळी २५० पर्यंत अंडी घालते.सुमारे १० दिवसात अंडी उबून त्यातून छोट्या अळ्या बाहेर पडतात.पानाच्या दोन पापुद्र्या मध्ये शिरून ही अळी एक प्रकारे भुयार तयार करते.ही अळी पानातील टिश्यू खात - खात पुढे सरकत जाते, तो प्रवास म्हणजे नागमोडी पट्टे असतात.
दोन - तीन आठवड्यात अळीची पूर्ण वाढ झाली की ती पानाच्या बाहेर पडून जमिनीवर येते व दोन - तीन इंच मातीत खोल जाऊन तिचे कोषात रुपांतर होते.Three inches deep into the soil, it turns into a cell.१५ दिवसांनी त्या कोषातून काळी माशी बाहेर पडते.
हे ही वाचा - ठिबक वरील वांग्याची शेती आणि भरघोस उत्पन्न वाचा फायद्याची यशोगाथा
या किडीने भाजीपाला पिकाचा दर्जा बिघडतो.किडीच्या प्रादुर्भावामुळे पानांची अन्न तयार करण्याची क्रिया कमी पडते, त्यामुळे उत्पादन घटते.हिवाळ्यात ही कीड सुप्तावस्थेत राहते आणि तापमान वाढू लागताच तिचा प्रादुर्भाव सुरु होतो.
पानाच्या आत या अळीचे वास्तव्य असल्याने कीटकनाशकाच्या फवारणीचा फारसा उपयोग होत नाही.नियंत्रण :- १.बॅसिलस थुरिनजीनसिस :- सोयाबीन पिकावरील नाग अळीच्या नियंत्रणासाठी.२.कार्बोफुरॉन ३% सि.जी. :- लिंबूवर्गीय पिकांवरील नाग अळीच्या नियंत्रणासाठी जमिनीतून देणे.३.सायान्ट्रानिलीप्रोल १०.२६% ओडी :- टोमॅटो पिकावरील नाग अळीच्या नियंत्रणासाठी पिकाच्या
सुरवातीच्या अवस्थेत दहा दिवसांच्या अंतराने दोन फवारण्या घेणे.४.डेल्टामेथ्रीन २.८% ई.सी., लॅम्बडा सायहॅलोथ्रीन ५% ई.सी., क्विनालफॉस २५% ई.सी. :- भुईमूग पिकावरील नाग अळीच्या नियंत्रणासाठी.५.इमिडाक्लोप्रीड १७.८% एस.एल. :- लिंबूवर्गीय पिकांवरील नाग अळीच्या नियंत्रणासाठी.६.क्लोमरानट्रानिप्रोल ८.८ + थायोमिथोझाम १७.५ एस.सी. :- टोमॅटो पिकावरील नाग अळीच्या नियंत्रणासाठी जमिनीतून आळवणी करणे.
Published on: 21 September 2022, 02:45 IST