जर आपण वांगे लागवडीचा विचार केला तर महाराष्ट्राच्या बऱ्याच जिल्ह्यांमध्ये शेतकरी वांग्याची लागवड मोठ्या प्रमाणावर करतात. या पिकाचे योग्य नियोजन केले तर वर्षभर पीक चालते व त्या माध्यमातून शेतकरी बंधूंना चांगला आर्थिक नफा देखील मिळतो. परंतु वांगे लागवडीपासून भरघोस उत्पादन हवे असेल तर त्याअगोदर वांगी लागवडीसाठी जातींची निवड फार महत्त्वाचे आहे. जेणेकरून आपल्या हातात भरघोस आणि दर्जेदार उत्पादन मिळेल याची शाश्वती म्हणजेच दर्जेदार जातींची निवड ही होय.
जर आपण वांग्याच्या जातींचा विचार केला तर भरपूर प्रमाणात वांग्याच्या जाती आहेत.परंतु त्यामध्ये देखील काही महत्त्वाच्या जाती असून त्या माध्यमातून इतर जातीच्या तुलनेत जास्त उत्पादन मिळते. त्यामुळे शेतकरी बंधुंनी चांगल्या संकरित जातींची निवड करणे खूप गरजेचे असते. या लेखामध्ये आपण अशाच एका वांग्याच्या महत्त्वाच्या व जास्त उत्पादन देणाऱ्या संकरित जातीची माहिती घेणार आहोत.
वांगी लागवडीतून भरघोस उत्पादन देईल वांग्याची DBL( डीबीएल)-175 ही जात…
जर आपण या जातीविषयी मिळालेल्या माहितीचा विचार केला तर आयसीएआर - आयएआरआय, नवी दिल्ली या संस्थेने 2018 साली ही जात विकसित केली आहे. वांग्याची हायब्रीड म्हणजे संकरित जात असून वांग्याच्या उत्पादनासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे.
या जातीपासून मिळणारे वांगे लांब असतात तसेच दंडगोलाकार, चमकदार जांभळ्या रंगाचे असतात. या जातीच्या लागवडीतून मिळणाऱ्या उत्पादनाचा विचार केला तर हेक्टरी 400 क्विंटलपर्यंत उत्पादन वांग्याचे मिळते.
तसेच लागवडीसाठी एका हेक्टरसाठी 400 ते 500 ग्रॅम बियाण्याची आवश्यकता असते. या जातीचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या जातीच्या संकरित वांग्याची लागवड फक्त खरीप हंगामातच करणे महत्त्वाचे आहे.
संकरित जातीच्या वांग्याची लागवड हरियाणा, दिल्ली, महाराष्ट्र, मध्यप्रदेश तसेच गुजरात, राजस्थान या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर केली जाते. जर तुमचासुद्धा वांगे लागवडीचा विचार असेल तर तुम्ही या जातीचा विचार नक्कीच करू शकतात. कारण चांगले उत्पादन आणि कमाई देण्याची क्षमता या जातीत आहे. परंतु तरीसुद्धा शेतकऱ्यांनी कृषी क्षेत्रातील तज्ञांचा एकदा सल्ला घेऊन मग वांग्याची लागवड करावी.
नक्की वाचा:कौतुकास्पद! शेतकऱ्याने नवीन पद्धतीच्या वापराने १६ फूट ऊस वाढवला; घेतोय दुप्पट उत्पादन
Published on: 15 October 2022, 02:58 IST