Agripedia

जर आपण तंत्रज्ञानाचा वापर केला तर तो आता प्रत्येक क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर होऊ लागला आहे. याला कृषी क्षेत्र देखील अपवाद नाही. कृषी क्षेत्रामध्ये देखील अनेक वेगवेगळ्या प्रकारचे तंत्रज्ञान आले असून या तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतकऱ्यांना आता उत्पादन वाढीसाठी खूप मोठ्या प्रमाणावर मदत झाली आहे. या दृष्टिकोनातून जर आपण शेतीचा विचार केला तर शेतीसाठी पाण्याची नितांत आवश्यकता असते. पाण्याशिवाय शेती शक्यच नाही.

Updated on 27 October, 2022 8:50 PM IST

 जर आपण तंत्रज्ञानाचा वापर केला तर तो आता प्रत्येक क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर होऊ लागला आहे. याला कृषी क्षेत्र देखील अपवाद नाही. कृषी क्षेत्रामध्ये देखील अनेक वेगवेगळ्या प्रकारचे तंत्रज्ञान आले असून या तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतकऱ्यांना आता उत्पादन वाढीसाठी खूप मोठ्या प्रमाणावर मदत झाली आहे. या दृष्टिकोनातून जर आपण शेतीचा विचार केला तर शेतीसाठी पाण्याची नितांत आवश्यकता असते. पाण्याशिवाय शेती शक्यच नाही.

नक्की वाचा:Tractor News: फार्मट्रॅकचा 'हा' छोटा ट्रॅक्टर शेती कामासाठी आहे मजबूत अन ठरेल शेतकऱ्यांसाठी फायदेशीर, आता वैशिष्ट्ये आणि किंमत

बऱ्याचदा आपल्याला माहिती आहे की पाऊस कमी पडल्यामुळे पिकांना पाण्याचा ताण पडतो किंवा दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण होते व शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान होते.

परंतु या दृष्टिकोनातून देखील एक महत्वपूर्ण तंत्रज्ञान येऊ घातले असून  पाण्याची टंचाई जरी शेतीसाठी असली तरी या तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकरी बंधू चांगले उत्पादन घेऊ शकतात. हे तंत्रज्ञान म्हणजे हायड्रोजल तंत्रज्ञान होय.

 काय आहे नेमके हायड्रोजल तंत्रज्ञान?

 शेतकरी बंधूंनी हायड्रोजल तंत्रज्ञानाचा वापर जर केला तर शेतकरी बंधू कमीत कमी खर्चात आणि कमी पाण्यात देखील अधिक उत्पादन घेऊ शकतात.

करण्यात आलेल्या दाव्यानुसार या तंत्रज्ञानाचा वापर करून 30% पर्यंत अधिक शेती उत्पादन मिळणे शक्य आहे. पाण्याचे टंचाई असताना भारतीय शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून हायड्रोजल तयार केले असून जे दुष्काळग्रस्त भागाच्या शेतीसाठी खूप महत्त्वाचे ठरू शकते.

सिंचनाची कमी साधने किंवा पाण्याची कमतरता असलेल्या ठिकाणी हायड्रोजन तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे आहे. हायड्रोजल एक जल असून ते पाण्यात मिसळतात जास्तीत जास्त पाणी शोषून घेते.

नक्की वाचा:Tractor News: शेतीकामासाठी ट्रॅक्टर घ्यायचा प्लान आहे? तर स्वराज कंपनीचा 'हा' ट्रॅक्टर तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण, वाचा डिटेल्स

 ते झाडाच्या मुळांजवळ राहते व मुळाना पाण्याची सर्वाधिक कमतरता असते. हायड्रोजनचा वापर तीन ते चार वेळा करता येणे शक्य आहे. हे जेल सहसा गवार गम किंवा त्यापासून बनवलेल्या पावडर पासून बनवले जाते. हायड्रोजल तंत्रज्ञान हे रांची येथील इंडियन नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रेसिन अँड गम मध्ये विकसित करण्यात आले आहे. तंत्रज्ञानाचा वापर पिकासाठी कॅप्सूल किंवा गोळ्यांच्या स्वरूपामध्ये केला जातो.

समजा तुम्हाला या हायड्रोजनचा एका एकर क्षेत्रासाठी वापर करायचा आहे तर दोन ते तीन किलो हायड्रोजल पुरेसे ठरते. अगदी उन्हाळ्यामध्ये 40 ते 50° c तापमानात देखील ते खराब होत नाही. प्रदूषणमुक्त असलेले हे तंत्रज्ञान शेतीत वापरल्याने शेतीतील व परिसरातील भूजल पातळीत देखील सुधारणा करता येणे शक्य आहे. हायड्रोजलचा वापर केल्याने 50 ते 70 टक्के पाणी जमिनीत मुरण्यास मदत होते.

नक्की वाचा:Agri News: काय म्हणता! आता ओले सोयाबीनचे टेन्शन नाही!डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने तयार केले सोयाबीन सुकवण्यासाठी ड्रायर, वाचा डिटेल्स

English Summary: hydrojel technology is so useful in deficiency of water to crop and drought area
Published on: 27 October 2022, 08:50 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)