Agripedia

तालुक्यातील शेती सिंचनासाठी १० वर्षांच्या कालावधीनंतर राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या सूचनेनुसार खडकवासला कालव्यातून उन्हाळ्यात सलग २१ दिवस मुख्य कालवा सुरू राहिल्याने शेतकऱ्यांना शेती सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाले.

Updated on 10 April, 2022 11:11 AM IST

सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु झाले आहेत. असे असताना शेतीसाठी सध्या पाण्याची गरज भासू लागली आहे. असे असताना आता इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. तालुक्यातील शेती सिंचनासाठी १० वर्षांच्या कालावधीनंतर राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या सूचनेनुसार खडकवासला कालव्यातून उन्हाळ्यात सलग २१ दिवस मुख्य कालवा सुरू राहिल्याने शेतकऱ्यांना शेती सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाले.

यामुळे शेतकरी आनंदात आहे. १० मार्चला सोडलेले आवर्तन इंदापूर तालुक्यातील सुरुवातीच्या शेटफळगढे भागात १३ मार्चला आले. त्यानंतर 'टेल टू हेड' पद्धतीने शेती सिंचनासाठी सर्व वितरकांना जलसंपदा विभागाच्या वतीने पाणी देण्यात आले. यामुळे कालवा हा २१ दिवस सुरूच होता. खडकवासला कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत दत्तात्रय भरणे यांनी तशा सूचना दिल्या होत्या.

सध्या उन्हाळा मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या विहिरी व कूपनलिका यांचे पाणी कमी पडले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना शेती सिंचित करण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे इंदापूर तालुक्‍यातील शेती सिंचनासाठी खडकवासला कालव्यातून वेळेवर आवर्तन सोडण्यात आले होते. यामुळे याचा शेतकऱ्यांना फायदा झाला

सलग २१ दिवस मुख्य कालवा चाललेल्या आवर्तनाच्या पाण्याचा शेती सिंचनासाठी सर्वाधिक फायदा झाला. या कालव्याच्या परिरात असलेल्या गावांना यामुळे चांगलाच फायदा झाला आहे. याआधी केवळ बारा-तेरा दिवसांतच उन्हाळी (Summer) आवर्तन बंद केले जात होते. यामुळे याचा शेतकऱ्यांना जास्तीचा फायदा होत नव्हता. आता मात्र याचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे.

महत्वाच्या बातम्या;
राज्यातील शिल्लक उसाला मिळणार अनुदान
तापमान वाढीने केला कहर, हजारो एकरावरील पिकांना लागत आहे आग..
शेतकऱ्यांनो दुध उत्पादन क्षमता वाढवण्याची चिंता मिटली, बातमी वाचा आणि दूध उत्पादन वाढवा

English Summary: For the first time in Indapur taluka, water for 21 days in a row, satisfaction among farmers ...
Published on: 10 April 2022, 11:11 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)