तामिळनाडू राज्याप्रमाणे महाराष्ट्रातही व्यापारी तत्वावर शेवग्याची लागवड सुरु झालेली आहे. शेवग्याच्या शेंगा ग्रामीण भागातील लोकांप्रमाणे शहरवासी सुध्दा आवडीने नेहमीच्या आहारात वापरतात म्हणुन शेवग्याच्या शेंगाला कायमस्वरूपी मागणी आहे. महाराष्ट्रात ८० टक्क्यांपेक्षा जास्त क्षेत्र कोरडवाहू आहे.हवामान व जमीन : शेवगा कोणत्याही हवामानात वाढू शकतो. शेवग्याची लागवड अत्यंत हलक्या ते भारी जमिनीत करता येते. जेथे पावसाचे प्रमाण चांगले आहे अशा ठिकाणी डोंगर उतारावरील हलक्या
जमिनीमध्ये शेवगा चांगला येतो. कोकणातील शेवगा तर केवळ पावसावरच येतो.Shevga in Konkan grows only during rains. पश्चिम महाराष्ट्रातही शेवग्याची लागवड होते परंतू अशा जमिनीत झाडे कोरडवाहूच आढळतात.
तुम्ही ई-पीक पाहणी केली, परंतु ती यशस्वी झाली का? जाणून घ्या सविस्तर
तसेच मराठवाडा आणि विदर्भातील भारी काळ्या जमिनीतही शेवग्याची लागवड होते परंतु अशा जमिनीत झाडे उंच वाढतात. पानांची वाढ जास्त, ताण चांगला बसत नाही. त्यामुळे फुलांचे आणि शेंगांचे प्रमाण कमी होते.लागवड : व्यापारी तत्वावर शेवग्याची लागवड करावयाची असल्यास पावसाच्या पूर्वी ६० से.मी.
लांब, रुंद खोल खड्डे घ्यावेत. खड्ड्यांमध्ये चांगली माती, कुजलेले शेणखत १ घमेले, सुफला १५:१५:१५ (२५० ग्रॅम), ट्रायकोडर्मा प्लस पावडर ५० ग्रॅम टाकावी अशा प्रकारे खड्डा भरुन घ्यावा. लागवड करताना २ झाडांतील व ओळीतील अंतर २.५ ते ३.० मीटर ठेवावे. शेवग्याची अभिवृध्दी फाटे कलम व बियापासून रोपे तयार करुन केली जाते.लागवडीचा हंगाम : कमी पावसाच्या प्रदेशात (खरीपात) जून जुलै मध्ये पहिल्या पावसानंतर वातावरणात अनुकूल बदल होतो. हवेतील आर्द्रता
वाढते. अशी हवा फाटे कलम फुटण्यास किंवा रोपे रुजण्यास अनुकूल असते. तेव्हा याचवेळी लागवड करावी. फाटे कलम अथवा रोपे लावल्यावर त्याच्या जवळील माती पायाने चांगली दाबावी, हातपाणी द्यावे. लागवडीनंतर ६ ते ८ महिने गरज पडेल तेव्हा पाणी देवून झाडे जगवावी किंवा झाडाच्या प्रत्येक खड्डयात २-३ लीटर पाणी बसेल अशा क्षमतेचे मडके जमिनीत गळ्यापर्यंत गाडावे त्यामध्ये ५-६ दिवसांच्या अंतराने पाणी टाकावे. मडक्याच्या तळाशी लहान छिद्र असावे, त्यात कापडाची लहान चिंधी घातलेली
असावी. यासाठी ठिबक सिंचन पध्दतीचा सुध्दा वापर करता येईल. झाडे मोठी झाल्यावर पाण्याची गरज भासत नाही.लागवडीनंतर घ्यावयाची काळजी :लागवडीनंतर आवश्यक बाबी म्हणजे आंतरमशागत, प्रमाणित खतांचा वापर, झाडाची योग्य छाटणी या बाबींची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. आंतरमशागत करावी लागत नाही. तरीसुध्दा झाडाची आळी खुरपून स्वच्छ करावीत. तसेच २ झाडांच्या ओळीत वखरणी करावी. म्हणजे तणांचा उपद्रव होणार नाही. शिवाय पावसाचे पाणी जमिनीत मुरले जाते. शेवग्याला
प्रतिवर्षी प्रत्येक झाडास पावसाच्या सुरुवातीस १० किलो शेणखत, ७५ ग्रॅम नत्र (१६५ ग्रॅम युरिया), ५० ग्रॅम स्फुरद (३१२ ग्रॅम सुफर फॉस्फेट), ७५ ग्रॅम पालाश (१२० ग्रॅम म्यूरेट ऑफ पोटॅश) द्यावे. शेवग्याचे झाडे झापाटयाने वाढणारे असल्यामुळे झाडांना आकार देणे आवश्यक आहे. व्यवस्थ आकार दिला नाही तर झाड उंच वाढते. त्यामुळे शेंगा काढणी अवघड जाते. यासाठी लागवडीनंतर दोन ते अडिच महिने किंवा मुख्य खोड ३-४ फुट झाल्यानंतर पहिली छाटणी करावी. यावेळी खोड जमिनीपासून १
मीटर अंतरावर छाटावे, ४ दिशाला ४ फांद्या वाढू द्याव्यात. झाडांची उंची कमी होवून शेंगा काढणे सोपे जाईल.काढणी व उत्पादन : सुधारीत जातींच्या लागवडीपासून सुमारे ६ ते ७ महिन्यांनी शेंगा मिळू लागतात पूर्ण वाढीच्या आणि ज्यांचा पीळ पूर्ण उलगडला आहे अशा शेंगा लांबीनुसार जुळवून घ्याव्यात. प्लास्टिक कागद गोणपाटावर गुंडाळल्यास शेंगाचा तजेला जास्त काळ टिकून राहतो व अशा प्रकारे सहा सात महिन्यानंतर प्रत्येक हंगामात एक चांगल्या झाडापासून सुमारे २५ ते ५० किलो शेंगा मिळतात.
अधिक माहितीसाठी संपर्क ०२४२६-२४३३४२
डॉ.सखेचंद अनारसे, प्रा.सोमनाथ पवार
Published on: 23 October 2022, 04:47 IST