मुळे जमिनीतून पाणी व अन्नघटक शोषून झाडाला पुरवतात. झाडाला मातीध्ये घट्टपणे उभे राहण्यात मदत करतात.अन्न आणि अन्नघटक साठवून ठेवतात.काही प्रजातींमध्ये नवीन रोपांची निर्मिती मुळांमधून पण होते.मुळांद्वारे शोषून घेतल्या जाणाऱ्या पाण्यात जर अन्नद्रव्ये विरघळलेली असतील तर ती पण झाडाच्या खोडातून पानांपर्यंत पोहोचतात आणि झाडाच्या वाढीला मदत होते. इथे हा मुद्दा समजून घेणे फार
महत्त्वाचे आहे की मुळे पाण्यात विरघळलेली अन्नद्रव्ये शोषून घेतात.Importantly, roots absorb nutrients dissolved in water. म्हणून जेव्हा आपण झाडांना खत घालतो तेव्हा त्यांना पाणी देणेही गरजेचे असते.
हे ही वाचा - ठिबक वरील वांग्याची शेती आणि भरघोस उत्पन्न वाचा फायद्याची यशोगाथा
पाणी दिल्यामुळे खतातील अन्नद्रव्ये पाण्यात मिसळतात आणि झाडांची मुळे ती अन्नद्रव्ये शोषून घेऊ शकतात. मेथी तसेच काही कडधान्ये पिकांच्या मुळांवर सूक्ष्मजीवांच्या गाठी असतात. यात असलेले सूक्ष्मजीव हवेतील नत्र जमिनीत बंदिस्त करतात.
असा नत्र मुळांद्वारे झाडाला मिळून त्याची वाढ चांगली होते. कोणत्याही झाडाच्या शाकीय वाढीसाठी नत्राची गरज असते.खोड : झाडाचे खोडदेखील खाली दिलेली महत्त्वाची कामे करते.मुळांद्वारे शोषलेले पाणी हे खोडामधून पानांपर्यंत पोहोचविले जाते. त्याचबरोबर हे पाणी वापरून पानांनी तयार केलेले अन्न याच खोडामधून मुळांपर्यंत पोहोचविले जाते. पाणी व अन्न याच्या खालून वर या
वरून खाली अशा वहनासाठी नलिका असतात. असे हे वहनाचे कार्य झाडाच्या शरीरात सतत चालू असते.या वहनाव्यतिरिक्त खोड हे झाडांना आधार देण्याचे महत्त्वाचे कार्य करते. खोडामुळेच झाडे सरळ उभी राहू शकतात तसेच पाने, फुले व फळे हे एका ठरावीक उंचीवर वाढू शकतात.खोडामुळे झाडांना एक ठरावीक आकार प्राप्त होतो. हा आकार झाडाला त्याची वेगळी ओळख पण देतो.वनस्पतीने तयार केलेल्या अन्नाचा साठा खोडातदेखील केला जातो.
Published on: 21 September 2022, 02:16 IST