भारत हा शेतीप्रधान देश म्हणून जगात ओळखला जातो. भारतात अनेक गोष्टी पिकवल्या जातात. याचा व्यापार देखील मोठ्या प्रमाणावर केला जातो. यामधून मोठी अर्थव्यवस्था चालते. यामध्ये कडधान्यांचे देखील उप्तादन मोठ्या प्रमाणावर केले जाते. तसेच विविध प्रकारच्या कडधान्यांचा वापर आहारात केला जातो. डाळ साठवताना नेहमीच एक समस्या उद्भवते ती म्हणजे डाळीमध्ये लहान दाण्यात किडे अडकतात. यामुळे अनेकदा याचा मोठा त्रास होतो.
यामुळे याबाबत काळजी घेणे आवश्यक आहे. कारण किडे डाळी हळूहळू खातात आणि त्यामुळे कधी कधी संपूर्ण डाळी वाया जातात. काही घरगुती उपाय करून आपण डाळीतल्या किड्यांना लांब ठेवू शकतो. हे काम देखील सोपे आहे. तसेच खडे असतील तर याचा देखील निवडताना त्रास होतो, तसेच जेवताना देखील ते राहिले तर अवघड होते.
तामध्ये जास्त कडधान्ये असेल उदाहरणार्थ 20 किलो डाळी, तर त्यात 4-5 चिमूटभरून हळद टाका. डाळ कीटकांपासून मुक्त ठेवण्याचा हा एक अतिशय सुरक्षित आणि नैसर्गिक मार्ग आहे. हे केवळ काळे कीटकच नाही तर पांढरे किडेही दूर ठेवतात. यामुळे डाळी अजिबात खराब होणार नाहीत. तसेच तुम्ही लसूण देखील वापरू शकता. लसूण अतिशय तीव्र वास देतो ज्यामुळे कीटक पळून जातात. चार ते पाच लसणीच्या पाकळ्या डाळीच्या डब्यात ठेवा.
यामुळे हे देखील फायदेशीर आहे. धान्य साठवणुकीच्या डब्यात नेहमी तमालपत्र ठेवा. यामुळे नवीन किडे येणार नाहीत आणि जे कीटक आहेत तेही निघून जातील. तसेच 2-5 किलो प्रमाणे कमी कडधान्ये साठवायची असताना राईचं तेल वापरा. सर्व प्रथम, 2 किलो डाळीमध्ये 1 चमचे मोहरीचे तेल घाला आणि चांगले मिसळा. त्यानंतर डाळ उन्हात वाळवा. असे केल्याने त्यातील किडे तर निघून जातील.
धान्यामध्ये कीटकांची अंडी झाली तरी याचा त्रास होतो, यामुळे आधीच उपाय करणे गरजेचे आहे. जेव्हा धान्य जास्त काळासाठी साठवले जाते तेव्हा त्यात कीटक होण्याची शक्यता जास्त असते. यामुळे आधीच काळजी घेणे गरजेचे आहे, वरील उपाय केल्यास कीटकांपासून तुमच्या धान्याचे रक्षण होईल. आणि तुमचा तोटा देखील होणार नाही.
महत्वाच्या बातम्या;
माहिती महत्वाची, कडक माती मऊ करण्याचा सोपा मार्ग, जाणून घ्या...
शेतकऱ्यांनो शेतीत जोडव्यवसाय शोधा, गडचिरोलीच्या पट्ठ्याने मोतीच्या शेतीतुन कमवतोय 10 लाख
आनंदाची बातमी! एक मे नंतर गाळप होणाऱ्या उसाबाबत मोठा निर्णय, शेतकऱ्यांना मोठा दिलासा
Published on: 18 May 2022, 05:17 IST