सध्या कारखाने सुरू झाले आहेत. यामुळे आता कमी खर्चात निघणाऱ्या खोडव्याची तयारी शेतकऱ्यांनी सुरू केली आहे. यामुळे याबाबत माहिती असणे आवश्यक आहे. यासाठी उसाची तोडणी देखील व्यवस्थित होणे गरजेचे आहे.
तळापासून बुडखे न छाटल्यामुळे जोमदार फुटवे फुटत नाही. खोडव्यासाठी जास्त फुटवे फुटणाऱ्या जातींची निवड केली जात नाही. खोडवा पिकासाठी मुख्य व सूक्ष्म अन्नद्रव्यांचा अपुरा पुरवठा केला जातो. बुडख्यावरील पाचट बाजूला केले जात नाही.
तसेच खोडवा पिकातील पाचट व्यवस्थापनामुळे जमिनीवर अच्छादन होऊन ओलावा टिकून राहतो. पाण्यामध्ये बचत होते. पाण्याची कमतरता असल्यास पीक तग धरण्यास मदत होते आणि सेंद्रिय कर्ब वाढतो.
राजू शेट्टींनी रस्ता केला आणि 2 कॅन दुधाचे झाले 16 कॅन दूध, गावकऱ्यांच्या वैभवात पडणार भर
तसेच उसातील अंतर २ फुटापेक्षा जास्त असल्यास मधल्या मोकळ्या जागेत रोपांची लागवड करावी. उसाचे उत्पादन हेक्टरी १५० टन आणि ऊस संख्या ८० हजारांपेक्षा जास्त आहे अशा उसाचा खोडवा ठेवावा.
तसेच फुटव्यांची क्षमता जास्त असलेल्या जातींची निवड करावी. उदा. को ८६०३२, फुले २६५, फुले १०००१, फुले ११०८२, फुले ऊस १५०१२ या जातीचा खोडवा ठेवावा. यामुळे तुमचे उत्पादन वाढेल.
शेतकऱ्यांनो शेअर्सवरील साखरेच्या मोहापाई हजारो रुपयांचे नुकसान का करुन घेता?
पाचटामुळे खुरपणीचा खर्च पूर्णपणे वाचविता येतो. पाचटामुळे पहिल्या वर्षी २० टक्के तर दुसऱ्या वर्षी ३० टक्के खोडव्याचे उत्पादनात वाढ होते. यामुळे शेतकऱ्यांनी तसे नियोजन करावे. ऊस तोडणीनंतर शेतातील पाचटाचे ढीग पसरून घ्यावेत.
ऊस बुडख्यावर असलेले पाचट बाजूला सरीमध्ये लोटून बुडखे मोकळे करावेत. लागणीच्या उसामध्ये उगवण कमी असल्यास खोडव्यात नांगे पडतात. हे नांगे वेळेवर न भरल्यास हेक्टरी उसाची संख्या कमी भरते.
महत्वाच्या बातम्या;
उसाने भरलेल्या ट्रॅक्टर आंदोलकांनी पेटवला, ऊसदर आंदोलन पेटले..
ब्रेकिंग! नितीन गडकरी यांची तब्येत बिघडली
उस दरासाठी आता दिवसेंदिवस शेतकरी आक्रमक होताना दिसत आहेत
Published on: 18 November 2022, 09:54 IST