पुणे, सध्या पावसाळा सुरू झाला असून शेतकऱ्यांची शेतातील कामांसाठीची लगबल सुरू झाली आहे. यामुळे सध्या पिकांचे नियोजन कसे करायचे याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. आपल्या राज्यात मोठ्या प्रमाणावर सोयाबीन केले जाते. आता राज्यात कृषी आयुक्तालयाने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी (Soybean Producer Farmer) महत्त्वाचा सल्ला दिला आहे. त्यानुसार कामे करणे गरजेचे आहे.
यामध्ये असे सांगितले आहे की, चांगली ओल म्हणजे ७४ ते १०० मिलिमीटर पाऊस झाल्यानंतरच सोयाबीनची पेरणी (Soybean Sowing) करावी, यामुळे पेरलेले बियाणे वाया जाण्याची शक्यता कमी राहते. कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी याबाबत माहिती दिली आहे. तसेच ते म्हणाले, सोयाबीन बियाणे प्रतिहेक्टरी सध्या ७५ किलो वापरले जाते. ते ५० ते ५५ किलोपर्यंत आणता येईल.
हे करण्यासाठी शेतकऱ्यांना टोकण पद्धतीने किंवा प्लॅन्टरचा वापर करावा लागणार आहे. तसेच शेतकऱ्यांनी आपले नुकसान टाळण्यासाठी सोयाबीन बियाणे वापरण्यापूर्वी उगवण क्षमतेची चाचणी घ्यावी. अनेकदा बियाणे खरेदी करताना फसवणूक केली जाते. याचा आर्थिक फटका हा शेतकऱ्यांनाच होत असतो. यामुळे दक्षता घेणे गरजेचे आहे.
घोडगंगाच्या मतदार यादीत मृत सभासदांची नावे, कारखान्याने सर्वे केलाच नाही
तसेच ७० टक्क्यांपेक्षा कमी उगवणक्षमता असल्यास अधिकचे बियाणे पेरणीसाठी वापरावे, पेरणी करताना ३ ते ४ सेंटिमीटर खोलीपर्यंत करावी, असेही आवाहन करण्यात आलेले आहे. यामुळे आता शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी. तसेच काही अडचण असल्यास कृषी तज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा. तसेच अजून मोठा पाऊस झाला नाही. यामुळे याचा अंदाज देखील घेतला पाहिजे.
महत्वाच्या बातम्या;
घरात पडेल पैशांचा पाऊस!! 'या' झाडाची करा लागवड, वास्तुशास्त्रात आहे मोठे महत्त्व
एका एकरात 10 लाखांची कमाई!! टोमॅटोने दोन वर्षांचा दुष्काळच हटवला...
राष्ट्रपती पदासाठी पाच नावे चर्चेत, बड्या नेत्यांनी घेतली शरद पवारांची भेट
Published on: 10 June 2022, 03:10 IST